मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Home Loan : घर घेण्यासाठी कोणत्या बँका देतायेत सगळ्यात स्वस्त गृहकर्ज? वाचा सविस्तर

Home Loan : घर घेण्यासाठी कोणत्या बँका देतायेत सगळ्यात स्वस्त गृहकर्ज? वाचा सविस्तर

बिल्डर्स प्रॉपर्टीवर (Offers On new Homes) आकर्षक ऑफर्स देत आहेत. तर दुसरीकडे अगदी कमी दरात होम लोन देऊ करत आहेत. या वेळेस सणासुदीच्या काळात काही बँकांनी होमलोनवर सूट देण्याचं जाहीर केलंय.

बिल्डर्स प्रॉपर्टीवर (Offers On new Homes) आकर्षक ऑफर्स देत आहेत. तर दुसरीकडे अगदी कमी दरात होम लोन देऊ करत आहेत. या वेळेस सणासुदीच्या काळात काही बँकांनी होमलोनवर सूट देण्याचं जाहीर केलंय.

बिल्डर्स प्रॉपर्टीवर (Offers On new Homes) आकर्षक ऑफर्स देत आहेत. तर दुसरीकडे अगदी कमी दरात होम लोन देऊ करत आहेत. या वेळेस सणासुदीच्या काळात काही बँकांनी होमलोनवर सूट देण्याचं जाहीर केलंय.

मुंबई, 28 ऑक्टोबर : आपलं स्वत:चं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्नं (Dream Home) असतं. या हक्काच्या घरात आपल्या जीवलगांबरोबर दिवाळी साजरी करायला कुणाला आवडणार नाही? तुमचंही हे स्वप्नं असेल ना?  हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू शकेल. घर घेण्यासाठीची एक सुवर्णसंधी तुम्हाला मिळू शकते. सध्या देशात गृहकर्जाचे व्याजदर (Home Loan Rate) बऱ्यापैकी कमी आहेत. त्यामुळे आत्ता घर घेणं तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं.

काही बिल्डर्स प्रॉपर्टीवर (Offers On new Homes) आकर्षक ऑफर्स देत आहेत. तर दुसरीकडे अगदी कमी दरात होम लोन देऊ करत आहेत. या वेळेस सणासुदीच्या काळात काही बँकांनी होमलोनवर सूट देण्याचं जाहीर केलंय. होम लोनवर सवलत तर मिळतंच आहे त्याचबरोबर कर्ज घेताना लागणाऱ्या प्रोसेसिंग फीवरही ऑफर दिली जाते आहे.

महत्वाचं म्हणजे गृहकर्ज देण्याआधी बँकांमधील व्याजदरांची तुलना नक्की करून बघा. आता बघूयात कोणकोणत्या बँकांनी सूट जाहीर केलीये.

एसबीआय होम लोन (SBI Home Loan Rate)

देशातील सगळ्यांत मोठी सरकारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांसाठी अगदी स्वस्त दरात गृहकर्ज (SBI Home Loan) देतो. लोकांच्या गरजेनुसार एसबीआय (SBI) होम लोन देऊ करते. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रीव्हिलेज होम लोन, लष्कर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी शौर्य होम लोन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया महिलांना होम लोनवर (Special concession for women) विशेष सूट देते. फक्त 6.70 टक्के व्याजदरावर क्रेडिट स्कोअर लिंक्ड होम लोन स्टेट बँकेच्या वतीनं दिलं जातं.

Gold Price Today: दोन दिवसांच्या घसरणीसह पुन्हा वधारला सोन्याचा भाव, तपासा आजचा दर

युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India Home Loan Rate)

सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियानं (Union Bank Of India) होम लोनसाठी एक चांगली ऑफर आणली आहे. या बँकेने त्यांच्या होम लोनचे व्याजदर कमी करून ते आता 6.40 टक्के करण्याची घोषणा केली आहे. हे नवे दर 27 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. युनियन बँकेचे होम लोनचे व्याजदर आता 6.40 टक्क्यांपासून सुरु होतील असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे. हा बँकेचा आतापर्यंतचा सर्वांत नीचांकी व्याजदर आहे.

आयसीआयसीआय बँक होम लोन (ICICI Bank Home Loan Rate)

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक ICICI ने आपल्या ग्राहकांसाठी नव्या होम लोन आणि अन्य बँकांच्या होम लोन ट्रान्सफरसाठी 6.70 टक्के व्याजदराची (रेपो रेट लिंक्ड) घोषणा केली आहे. होम लोनवर बँकेकेडून 1100 रुपयांपासून सुरु होणाऱ्या प्रोसेसिंग फी चाही फायदा दिला जातोय.

वाढत्या इंधन दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला, पेट्रोल 120 रुपयांवर, डिझेल 111 वर

अँक्सिस बँकेचे गृहकर्ज (Axis Bank Home Loan Rate)

अँक्सिस बँकेनेही गृहकर्जावर (Axis Bank Home Loan) विशेष सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडक घरांच्या कर्जांवर 12 ईएमआयची (EMI) सूट देण्यात येईल असं बँकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

बँक ऑफ इंडियाचे होम लोन (Bank Of India Home Loan)

बँक ऑफ इंडियाने (Bank Of India) त्यांच्या होम लोनच्या व्याजदरात 35 बेसिस पॉईंट कपातीची घोषण केली आहे. त्यामुळे याआधी बँकेचा व्याजदर 6.85 टक्के होता तो आता 6.50 झाला आहे. होम लोनसाठी अर्ज करणाऱ्या नवीन ग्राहकांसाठी आणि अन्य बँकेचे होम लोन ट्रान्सफर करणाऱ्यांसाठीही ही सवलत आहे. त्याशिवाय बँकेने 31 डिसेंबर 2021 पर्यंत होम लोनवर लागणारी प्रोसेसिंग फी सुध्दा माफ केली आहे.

First published:

Tags: Home Loan, Money, बँक