मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Health Insurance रिन्यू करताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या, फायदा होईल

Health Insurance रिन्यू करताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या, फायदा होईल

Health Insurance नूतनीकरणाच्या वेळी तुमची विमा रक्कम वाढवण्याचा पर्याय निवडू शकता. वाढत्या वैद्यकीय गरजांमुळे, असे होऊ शकते की तुम्ही सुरुवातीला निवडलेली विमा रक्कम पुढील वर्षांसाठी अपुरी असेल.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 4 डिसेंबर : कोरोनाच्या संकटानंतर (Corona Crises) लोकांमध्ये आरोग्य विम्याबाबत (Health Insurance) जागरुकता वाढली आहे. लोक आता अधिकाधिक आरोग्य विमा घेत आहेत. इतर पॉलिसींप्रमाणे आरोग्य विम्याचेही ठराविक वेळेनंतर नूतनीकरण (Health Insurance renew) करावे लागते. मात्र हेल्थ इन्शुरन्स रिन्यू करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे हे याबाबत आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

विम्याची रक्कम तपासून घ्या

विमा नूतनीकरणाच्या वेळी तुमची विमा रक्कम वाढवण्याचा पर्याय निवडू शकता. वाढत्या वैद्यकीय गरजांमुळे, असे होऊ शकते की तुम्ही सुरुवातीला निवडलेली विमा रक्कम पुढील वर्षांसाठी अपुरी असेल. त्यामुळे, विम्याचे नूतनीकरण करताना, तुम्हाला तुमच्या विम्याच्या रकमेची मर्यादा वाढवायची आहे का याचा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे.

टॉप-अप योजना (Top Up Scheme)

तुम्हाला तुमच्या आरोग्य विम्यामध्ये काही अतिरिक्त कव्हर हवे असल्यास, तुम्ही नूतनीकरणाच्या वेळी टॉप-अप योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनांची किंमत खूपच कमी आहे आणि ते तुम्हाला पॉलिसी व्यतिरिक्त काही अतिरिक्त कव्हरेज देतात. टॉप-अप योजना कोणत्याही विमा कंपनीकडून खरेदी केल्या जाऊ शकतात. विद्यमान विमा कंपनीकडून ते विकत घेणे आवश्यक नाही.

Business Idea : रेल्वेसोबत काम करुन महिन्याला हजारो रुपये कमावण्याची संधी, काय करावं लागले

नवीन आजार

तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा घेतला असेल आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याला नवीन आजार (News disease) झाला असेल, तर नूतनीकरणाच्या वेळी विमा कंपनीला नक्कीच कळवा. तुम्ही असे न केल्यास, नंतर तुम्हाला दावा दाखल करताना त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

पेनी स्टॉकचा धमाका! 2 रुपयांचा स्टॉक 74 रुपयांवर, सहा महिन्यात 1 लाख बनले 34 लाख

वेळेवर विमा पॉलिसीचे नूतनीकरण करा

तुम्ही तुमच्या पॉलिसीचे वेळेवर नूतनीकरण न केल्यास, पॉलिसी संपेल आणि कव्हरच्या कालावधीत मिळणारे फायदे उपलब्ध होणार नाहीत. पॉलिसीचे वेळेवर नूतनीकरण केल्याने विमा कंपनीला तुमचा नूतनीकरण अर्ज स्वीकारण्यास भाग पाडले जाईल. पॉलिसी रद्द झाल्यास, विमाकर्ता कराराचे नूतनीकरण करू शकतो किंवा करू शकत नाही.

First published:

Tags: Health Tips, Insurance