सोन्यात कधी आणि किती गुंतवणूक करावी? वाचा काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

सोन्यात कधी आणि किती गुंतवणूक करावी? वाचा काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव दर दहा ग्रॅम मागे 57 हजार रुपयांवर पोहोचला होता, तो सध्या 44 ते 45 हजारांपर्यंत आहे. सोन्याच्या दरात सुमारे 22 टक्के घट झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 एप्रिल : सध्या सोन्याचे (Gold) दर कमी झाले असल्याने त्यात गुंतवणूक (Investment) करण्याकडे कल वाढला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव दर दहा ग्रॅम मागे 57 हजार रुपयांवर पोहोचला होता, तो सध्या 44 ते 45 हजारांपर्यंत आहे. सोन्याच्या दरात सुमारे 22 टक्के घट झाली आहे. त्यामुळे सध्या सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञही देत आहेत. मात्र सोन्यात गुंतवणूक करताना ती किती प्रमाणात आणि कधी करावी हे महत्त्वाचे ठरते.

फायनान्शिअल एक्स्प्रेसनुसार, शेअर्स असो वा सोनं किंवा इतर मालमत्ता यांच्या किंमती वाढण्याची चिन्हे दिसतात तेव्हा त्यात गुंतवणूक करण्याची इच्छा निर्माण होते. याला रेसेन्सी बायस (Recency Bias) म्हणतात. किंमती वाढत असल्याचे दिसते तेव्हा लोकांना असे वाटते की आता याच्या किंमती वाढतच राहतील. त्यामुळे या वाढत्या किमतीचा फायदा घेण्यासाठी लोक अनेकदा किंमतीनी उच्च स्तर गाठलेला असतो त्या वेळी गुंतवणूक करतात आणि नेमकी त्यानंतर त्यात घसरण होऊ लागते.

कोणताही तज्ज्ञ विकत घेण्यासाठी सर्वोत्तम किंमत पातळी आणि विक्री करण्यासाठी उत्तम किंमत सांगू शकत नाही. बाजार अमुक एका टप्प्यानंतर आणखी वर चढेल की खाली उतरेल हे ठामपणे सांगणे अत्यंत कठीण असते. सोन्याच्या बाबतीतही सध्या अशीच स्थिती आहे.

(वाचा - तु्म्ही खरेदी केलेलं GOLD असली की नकली? घरच्या घरी या पद्धतीने करा सोन्याची पारख)

काही काळापूर्वी सोन्याचा भाव तेजीत होता, तेव्हा किंमती आणखी किती वाढू शकतात याची माहिती लोकांना हवी होती. त्या आधारावर त्यांनी गुंतवणूकीचा निर्णय घेतला असता. त्या टप्प्यावरून आणखी किती वाढ होईल, याचा अंदाज आला असता तर गुंतवणूकदारांनी (Investor) परतावा (Returns) किती मिळेल याचा अंदाज घेत गुंतवणूक केली असती. ऑगस्टमध्ये सोन्याच्या किंमतीनी अत्युच्च पातळी गाठली, तरीही त्यात अजून वाढीला जागा आहे अशी आशा गुंतवणूकदारांना होतीच.

सोन्यातील गुंतवणूकीचे प्रमाण -

वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करताना आपला पोर्टफोलिओ (Portfolio) अस्थिर होईल अशी गुंतवणूक केली जात नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. सगळी गुंतवणूक एकाच वेळी वाढत किंवा घसरत नाही. आपल्या गुंतवणुकीत संतुलन राखताना प्रत्येक पर्यायात योग्य प्रमाणात गुंतवणूक करणं महत्त्वाचं असतं. सोन्यात गुंतवणूक करतानाही हे तारतम्य बाळगले पाहिजे. परतावा चांगला मिळण्याच्या दृष्टीने जोखीम घेऊन काही गुंतवणूक केली जाते. ती जोखीम कमी व्हावी यासाठी कमी परतावा असला तरी जोखीमही कमी असणाऱ्या काही पर्यायांमध्ये गुंतवणूक करणं महत्त्वाचे ठरतं.

तुमच्या पोर्टफोलीओतील अस्थिरता कमी करण्यासाठी सोन्यात योग्य प्रमाणात गुंतवणूक करणं इष्ट ठरतं. तुमची गुंतवणूकीची उद्दीष्टं आणि अपेक्षा यानुसार सोन्याला पोर्टफोलीओत स्थान दिलं पाहिजे. ती अगदी कमीही नसावी आणि पोर्टफोलिओचा मोठा भागही नसावी. तुमच्या गुंतवणूकीत शेअर्स आणि कर्ज हे महत्वाचे घटक असतील तर, शेअर्स म्हणजे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचा मार्ग असतो. तसंच कर्जही स्थिर परतावा आणि संपत्ती निर्मितीसाठीच घेतलं जातं. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये केवळ इक्विटी आणि कर्ज असेल तर ही अस्थिरता निर्माण होईल, ती कमी करण्यासाठी काही प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करणं योग्य ठरतं.

(वाचा - ATM मधून कॅश काढताना फाटलेल्या नोटा आल्यास काय कराल;जाणून घ्या महत्त्वाची माहिती)

सोन्यात कमी गुंतवणूक करावी यामागचे कारण देताना असं म्हटलं जातं, की सोन्यामुळे कोणतीही संपत्ती निर्माण होत नाही. भारतातच दागिन्यांसाठी सोन्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, पण फायदा मिळवण्यासाठी दागिने विकण्याचं प्रमाण फारच कमी आहे. तसंच सोन्याचा उपयोग स्टील किंवा अ‍ॅल्युमिनियमसारखा औद्योगिक क्षेत्रात होत नाही. भू-राजकीय अस्थिरता, युद्ध स्थिती, साथ रोगामुळे आलेली मंदी, अमेरिकन डॉलरमधील घसरण अशा घटना घडतात तेव्हा जागतिक गुंतवणूकदार मुख्य गुंतवणूक पर्यायांपासून लांब राहतात तेव्हा सोन्याच्या किमती वेगाने वाढतात, एरवी त्यात फार झपाट्याने वाढ होत नाही.

ऑगस्ट 2020च्या तुलनेत सध्या सोन्याचे दर कमी झाले आहेत. त्यात यापुढील काळात चांगली वाढ होऊ शकेल. आता किमती थोड्या कमी झाल्या तर तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी योग्य संधी मिळेल. गेल्या काही महिन्यांत अमेरिकन डॉलर्सच्या किमतीत घट झाली आहे. त्यामुळे गुंतवणूक न करण्यामागे हे कारण असेल तर तो जरतरचा खेळ ठरेल. तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओवर नियंत्रण ठेवू शकता बाह्य घडामोडींवर नाही, हे लक्षात घेऊन योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता.

First published: April 6, 2021, 6:00 PM IST

ताज्या बातम्या