मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमची आवडती चपाती महागणार, गव्हाच्या पिठाचे भाव का वाढले?

तुमची आवडती चपाती महागणार, गव्हाच्या पिठाचे भाव का वाढले?

नवीन पीक येईपर्यंत ही वाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

नवीन पीक येईपर्यंत ही वाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

नवीन पीक येईपर्यंत ही वाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

असीम मनचंदा प्रतिनिधी दिल्ली : आधीच महागाई वाढत असताना गव्हाच्या किंमती कमी होण्याचं नाव घेत नाहीत. भारतात अजूनही अनेक ठिकाणी सकाळी नाश्त्याला पोळीभाजी किंवा चहा पोळी खाल्ली जाते. गेल्या वर्षभरता गव्हाचे आणि गव्हाच्या पिठाचे दर 23 टक्क्यांनी वाढले आहेत. एका वर्षात गव्हाच्या दरात 15 टक्के तर पिठाच्या दरात 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नवीन पीक येईपर्यंत ही वाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

गहू आणि पिठाच्या किंमतींनी त्यांची विक्रमी पातळी गाठली आहे. गेल्या एक महिन्यात गव्हाच्या दरात 5 टक्के तर पिठाच्या दरात 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नवीन पीक येईपर्यंत ही वाढ कायम राहू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीठाचे दर तांदूळ आणि साखरेच्या जवळपास पोहोचले आहेत. वर्षभरात गव्हाच्या पिठाचा भाव 36.98 रुपये किलो झाला आहे. त्याचबरोबर तांदूळ 37.96 रुपये प्रति किलो आणि साखर 42.96 रुपये प्रति किलो आहे.

पीठ महाग का होत आहे?

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक पातळीवर कमी उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे भाव वाढले आहेत. सरकारने यावर्षी मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान) प्रत्यक्ष शिपमेंट्स गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाल्या आहेत.

गव्हाच्या दरात 1 महिन्यात 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका वर्षात गव्हाच्या दरात 15 टक्के तर पिठाच्या दरात 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नवीन पीक येईपर्यंत ही वाढ कायम राहू शकते. नवे पीक एप्रिलमध्ये येईल असं सांगितलं जात आहे. याशिवाय अवेळी झालेल्या पावसामुळे देखील गव्हाचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचा परिणाम देखील पिकावर झाला आहे.

सरकारकडे स्टॉकमध्ये किती गहू

सरकारकडील गव्हाचा साठा विक्रमी नीचांकी पातळीवर आला आहे. सरकारकडे २२७ मेट्रिक टन गव्हाचा साठा आहे. बफर स्टॉकपेक्षा केवळ २६ टन जास्त. शेअरची मर्यादा घालण्याचा किंवा खुल्या बाजारात गहू विकण्याचा सरकारचा विचार नाही. गव्हाच्या दरांवर सरकार लक्ष ठेवून आहे. पुढील आठवड्यात आंतर मंत्रालयीन समिती गव्हाच्या दरांचा आढावा घेणार आहे.

First published:

Tags: Money