रस्त्यात पैशांनी भरलेलं पाकीट मिळालं तर तुम्ही काय कराल? सर्व्हेमध्ये समोर आल्या या गोष्टी

ऑफिसला पोहोचण्याच्या घाईगडबडीत तुम्ही घरून निघालात आणि रस्त्यात जर पैशांनी भरलेलं पाकीट मिळालं तर तुम्ही काय कराल? तुम्ही हे पाकीट उचलाल, तुमच्याकडे ठेवून घ्याल की ते पाकीट ज्याचं आहे त्याला नेऊन द्याल? यावर केलेल्या संशोधनात काय आढळून आलं ते पाहा.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 04:45 PM IST

रस्त्यात पैशांनी भरलेलं पाकीट मिळालं तर तुम्ही काय कराल? सर्व्हेमध्ये समोर आल्या या गोष्टी

मुंबई, 1 ऑगस्ट : ऑफिसला पोहोचण्याच्या घाईगडबडीत तुम्ही घरून निघालात आणि रस्त्यात जर पैशांनी भरलेलं पाकीट मिळालं तर तुम्ही काय कराल? तुम्ही हे पाकीट उचलाल, तुमच्याकडे ठेवून घ्याल की ते पाकीट ज्याचं आहे त्याला नेऊन द्याल? माणसांच्या वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांनी यावर एक अभ्यास केला. या संशोधनात काय आढळलं हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही थक्क व्हाल.

'सिव्हिक ऑनेस्टी' चं हे संशोधन सांगतं, जर पाकीट पैशांनी भरलेलं असेल तर ते ज्याचं आहे त्याच्याकडे पोहोचवलं जाण्याची शक्यता जास्त आहे. भरलेलं पाकीट जर आपल्याकडे ठेवलं तर लोकांना आपण चोर असल्यासारखं वाटतं.

पैशांच्या पाकिटात कमी पैसे असले तर मात्र ते त्याच्या मालकापर्यंत पोहोचवण्याची तसदी कुणी घेत नाही. झुरिक, मिशिगन आणि ऊटा युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी 40 देशांत हा अभ्यास केला. यामध्ये 17 हजारपेक्षाही जास्त पाकिटं त्याच्या मूळ मालकांपर्यंत पोहोचवली गेल्याचं समोर आलं.

रस्त्यावरच्या महिलेचं हे गाणं ऐकून तुम्हाला येईल लतादीदींची आठवण

बँक,सिनेमा हॉल, रेस्टॉरंट अशा गर्दीच्या ठिकाणी अशी पैशाची पाकिटं मुद्दामहून ठेवण्यात आली. त्यानंतर लोक त्यावर कशी प्रतिक्रिया देतात हे पाहिलं गेलं. भरलेली पाकिटं, त्या मालकाच्या लक्षात आणून देऊन, त्याचा फोन नंबर मिळवून त्याच्याकडे आणून देण्याचे प्रयत्न लोकांनी केले. पण त्याचवेळी रिकामी पाकिटं मात्र फारशी कुणी आणून दिली नाहीत.

Loading...

लोकं प्रामाणिक असोत किंवा नसोत पण स्वत:वर चोर असण्याचा ठपका कुणाला लावून घ्यायचा नसतो. या गु्न्ह्यातून वाचण्यासाठीच लोक पाकिटं परत करण्याचा प्रयत्न करतात.

ज्या देशांमध्ये हे संशोधन करण्यात आलं त्यात स्वित्झर्लंडमध्ये पैशाचं पाकिट परत करणाऱ्याचं प्रमाण जास्त होतं. मेक्सिको आणि पेरूमध्ये मात्र हे प्रमाण अगदीच कमी होतं.

============================================================================================

...आणि तिने थेट ब्रिजवरून मारली उडी, पाहा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: money
First Published: Aug 1, 2019 04:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...