Home /News /money /

शेअर बाजारातील आजचा ट्रेंड कसा असेल? तज्ज्ञांच्या मते दबावातही बाजारात तेजीची शक्यता, काय आहेत कारणे?

शेअर बाजारातील आजचा ट्रेंड कसा असेल? तज्ज्ञांच्या मते दबावातही बाजारात तेजीची शक्यता, काय आहेत कारणे?

अमेरिकेतील फेड रिझव्‍‌र्हने व्याजदर वाढवण्याचे संकेत दिल्यामुळे आणि मंदीच्या भीतीमुळे गुंतवणूकदार खूपच चिंतीत झाले होते, मात्र तूर्तास त्यांनी बाजारात गुंतवणूक करणे सुरूच ठेवले आहे.

    मुंबई, 5 जुलै : भारतीय शेअर बाजाराने (Share Market Update) या आठवड्याची सुरुवात चांगल्या वाढीसह केली परंतु तरीही विक्रीचा दबाव दिसून येत आहे. घसरणीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार आज प्रॉफिट बूक करू शकतात. मात्र, अनेक शेअर्समध्ये दबावातही चांगली कामगिरी करण्याची क्षमता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 327 अंकांच्या वाढीसह 53,235 वर बंद झाला, तर निफ्टी 83 अंकांनी चढून 15,825 वर बंद झाला. आज जागतिक बाजारातील (Global Market) काही बाजारांमध्ये विक्रीचा दबाव दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बहुतांश पाश्चात्य बाजारांमध्ये अमेरिकन शेअर बाजारातील तेजीमुळे वाढताना दिसते आहेत. तरी विदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या माघारीमुळे आशियाई बाजारांवर दबाव आहे. यूएस आणि युरोपियन बाजार अमेरिकेतील फेड रिझव्‍‌र्हने व्याजदर वाढवण्याचे संकेत दिल्यामुळे आणि मंदीच्या भीतीमुळे गुंतवणूकदार खूपच चिंतीत झाले होते, मात्र तूर्तास त्यांनी बाजारात गुंतवणूक करणे सुरूच ठेवले आहे. गुंतवणुकदारांच्या या सकारात्मक भावनेमुळे अमेरिकेतील स्टॉक एक्स्चेंज NASDAQ ने शेवटच्या ट्रेडिंग सत्रात 0.90 टक्क्यांची वाढ नोंदवली. Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? अमेरिकेसह युरोपातील बहुतांश शेअर बाजारही हिरव्या चिन्हावर बंद झाले. युरोपातील प्रमुख स्टॉक एक्स्चेंजमध्ये समाविष्ट असलेल्या जर्मनीच्या शेअर बाजारात शेवटच्या ट्रेडिंग सत्रात 0.31 टक्क्यांची घसरण झाली, मात्र फ्रेंच शेअर बाजार 0.40 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय लंडन स्टॉक एक्सचेंजही 0.89 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह बंद झाला. आशियाई बाजार चमकले आशियातील बहुतांश शेअर बाजार आज सकाळी वाढीसह उघडले आणि हिरव्या चिन्हावर व्यवहार करत आहेत. आज सकाळी सिंगापूर स्टॉक एक्स्चेंजमध्ये 0.41 टक्क्यांनी वाढ होत आहे, तर जपानचा निक्केई 1.02 टक्क्यांनी वधारत आहे. तैवानच्या बाजारातही 1.80 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे, तर दक्षिण कोरियाचा बाजार कोस्पी 1.44 टक्क्यांनी वधारत आहे. आज चीनचा शांघाय कंपोझिट 0.01 टक्क्यांनी घसरत आहे. SBI ग्राहकांची कामं आता घरबसल्या होणार; 'हे' टोल फ्री फोन नंबरवर येतील कामी परदेशी गुंतवणूकदारांची माघार परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढण्याची प्रक्रिया थांबलेली नाही. जूनमध्ये 56 हजार कोटींहून अधिक रक्कम काढल्यानंतर आता जुलैमध्येही सातत्याने पैसे काढणे सुरू आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 2,149.56 कोटी रुपयांचे शेअर विकून पैसे काढले.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या