Home /News /money /

शेअर बाजार आणखी घसरणार की सावरणार? उद्यापासून सुरु होणाऱ्या आठवड्यात बाजाराची चाल कशी असेल?

शेअर बाजार आणखी घसरणार की सावरणार? उद्यापासून सुरु होणाऱ्या आठवड्यात बाजाराची चाल कशी असेल?

17 जून रोजी संपलेल्या व्यापारी सप्ताहात सेन्सेक्स 5.41 टक्क्यांनी घसरून 51,360 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 5.6 टक्क्यांनी घसरून 15,293 वर बंद झाला.

    मुंबई, 19 जून : भारतीय शेअर बाजारात (Share Market) सध्या मोठी घसरण सुरु आहे. सेन्सेक्स त्याच्या टॉपवरून 10,000 अंकांनी घसरला आहे. शुक्रवारी संपलेल्या व्यापारी आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी (Sensex and Nifty) दोन्ही 5 टक्क्यांहून अधिक घसरले. सध्या संपूर्ण जग महागाई, मंदीमुळे अस्थिर आहे आणि भारतीय बाजारही यापासून दूर नाही. देशांतर्गत शेअर बाजार सलग दोन आठवडे घसरत आहे. 17 जून रोजी संपलेल्या व्यापारी सप्ताहात सेन्सेक्स 5.41 टक्क्यांनी घसरून 51,360 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 5.6 टक्क्यांनी घसरून 15,293 वर बंद झाला. केवळ लार्ज कॅपच नाही तर मिड आणि स्मॉल कॅप शेअरवरही विक्रीचा दबाव राहिला. पुढील आठवड्यात बाजाराची वाटचाल कशी असेल? मनीकंट्रोलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले यांनी म्हटले आहे की, 15,400 पॉइंटची पातळी निफ्टीवरील ट्रेडर्ससाठी ट्रेंड डिसायडर ठरेल. जर बाजार या पातळीच्या वर गेला तर तो 15,600-15,700 पर्यंत जाऊ शकतो. जर बाजार खाली आल्यास तो 15,200 वर जाईल. शेअर बाजारात विक्री सुरूच राहिली तर ती 15,000 पर्यंत देखील येऊ शकते. बँकिंग क्षेत्रातही घसरण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटलं. UPI आणि क्रेडिट कार्ड लिंक करुन वाढवू शकता तुमचा क्रेडिट स्कोअर; चेक करा कसं? रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणतात की देशांतर्गत बाजारात आता जागतिक ट्रिगर्सवर अस्थिरता दिसून येत आहे. यूएस फेडच्या अध्यक्षांच्या भाषणावर आणि चीनच्या व्याजदरांबाबत करण्यात येणार्‍या घोषणेवर बाजाराचा कल अवलंबून दिसतो. याशिवाय मान्सूनचा परिणामही त्यावर दिसून येतो. सध्या बाजाराबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन निगेटिव्ह आहे. RBI कडून 'या' बँकेचा परवाना सस्पेंड, तुमचंही बँकेत खातं असेल तर काय परिणाम होईल? बँकिंग निर्देशांक सॅमको सिक्युरिटीजच्या येशा शाह म्हणतात की S&P 500 आणि देशांतर्गत बँकिंग निर्देशांक टेक्निकल बियरिश मार्केटमध्ये दाखल झाला आहेत. बाजारात आणखी पडझड होण्याची भीती कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता डॉलर इंडेक्स, कोविड-19 आणि कच्च्या तेलाची किंमत अशा काही घटकांवर बाजाराची हालचाल अवलंबून असेल. येशा शाह देखील बाजाराकडे निगेटिव्ह आणि न्युट्रल दृष्टिकोनाचा सल्ला देत आहेत. कोणत्याही तेजीवर शेअर्स विकून बाजारातून बाहेर पडण्याचा ते सल्ला देतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या