ट्रम्प-मोदी भेटीकडे बुलेटप्रेमींचं आहे बारिक लक्ष; काय आहे ‘हार्ले डेव्हिडसन’ नातं.....?

ट्रम्प-मोदी भेटीकडे बुलेटप्रेमींचं आहे बारिक लक्ष; काय आहे ‘हार्ले डेव्हिडसन’ नातं.....?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून भारताच्या ३० तासांच्या दौऱ्यावर आहेत. पण भारतातल्या बुलेट प्रेमींना ट्रम्प यांच्या या दौऱ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून भारताच्या 30 तासांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. तसंच ट्रम्प कुटुंबीयांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी टीम मोदी कोणतीही कसर ठेवत नाहीयेत. ट्रम्प राहणार असलेल्या मौर्य हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी खास ट्रम्प थाळी तयार करण्यात आली आहे. पण ट्रम्प यांच्या या बहुचर्चित दौऱ्यातून नेमकं व्यापाराच्या दृष्टीने काय साधणार याकडे अनेकांचं लक्ष आहे. भारतातल्या बुलेट प्रेमींना ट्रम्प यांच्या या दौऱ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

खरं तर ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या दरम्यान कोणताही व्यापार विषयक करार होणार नाही हे अमेरिकेतून रवाना होण्यापूर्वीच स्वतः ट्र्म्प यांनी स्पष्ट केलं आहे. तरीही भारतातीत बुटेल प्रेमींना अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या या दौऱ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आणि त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. ट्रम्प कायमच पंतप्रधान मोदी माझं चांगले मित्र आहेत असा उल्लेख करत असतात. पण एका मुद्यासाठी ट्रम्प यांनी घातलेली गळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलेली नाही. ट्रम्प यांची तीच मागणी या भारत दौऱ्यात पंतप्रधान मोदी पूर्ण करतात का याकडे बाईक प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

वाचा - ट्रम्प यांच्या तोंडी रोमँटिक DDLJ चं नाव येताच मेलेनिया यांचा चेहरा खुलला

हार्ले डेव्हिडसन ही मोटरसायकल सध्या भारतीय तरुणांध्ये फारच लोकप्रिय आहे. पण हार्ले डेव्हिडसन खरेदी करतांना तरुणाईला सगळ्यात मोठी अडचण येते होती ती या मोटरसायलकवर असलेल्या १०० टक्के कराची.

एका फोनमुळे कमी झाला ५० टक्के कर 

अमेरिकेतून आयात करताना हार्ले डेव्हिडसनवर कर लावला जातो. त्यामुळे त्याची किंमत बरीच वाढते. भारतात हार्ले डेव्हिडसनची किंमत 5 लाखांपासून ते 50 लाखांपर्यंत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी 2019 मध्ये फोनवर बोलतांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या विनंतीला मोदी यांनी तातडीने प्रतिसाद दिला आणि हार्ले डेव्हिडसनवरच्या करांमध्ये थेट ५० टक्के सूट देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला. पण तरीही हार्ले डेव्हिडसनवरच्या किंमतींमध्ये अपेक्षित घट झालेली नाही, असं हार्ले डेव्हिडसन प्रेमींना आणि खुद्द डोनल्ड ट्रम्प यांना वाटतं. यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या या दौऱ्यात ट्रम्प आणि मोदी यांच्यात कोणकोणत्या विषयात चर्चा होणार याकडे हार्ले डेव्हिडसन प्रेमींचं लक्ष लागलं आहे. ट्रम्प यांनी पुन्हा आग्रह धरला तर हार्ले डेव्हिडसनवरच्या किमती कमी होतील अशी आशा हार्ले डेव्हिडसन प्रेमींना आहे. जर ट्रम्प यांनी पुन्हा कर कमी करण्यासाठी आग्रह धरला आणि मोदी यांनी आपल्या या मित्राच्या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद दिला  तर हार्ले डेव्हिडसनवर सध्या असलेला कर आणकी कमी होईल असं अनेकांना वाटतं.

First published: February 24, 2020, 6:41 PM IST
Tags: Trump 2020

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading