मराठी बातम्या /बातम्या /मनी /

अल्पवयीन गुंतवणूकदार सज्ञान झाल्यावर Mutual Fund मधील नाव बदल करण्याची प्रक्रिया कशी आहे?

अल्पवयीन गुंतवणूकदार सज्ञान झाल्यावर Mutual Fund मधील नाव बदल करण्याची प्रक्रिया कशी आहे?

आजकाल म्युच्युअल फंडाच्या (Mutual Fund) माध्यमातून गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढत असल्यानं म्युच्युअल फंडानीही अल्पवयीन मुलांच्या नावे गुंतवणूक करण्याच्या योजना आणल्या आहेत. अर्थात मुलं 18 वर्षांची झाल्यानंतर त्या गुंतवणुकीचे अधिकार त्यांच्याकडे येतात. तोपर्यंत पालकांना आर्थिक व्यवहार करण्याचा अधिकार असतो.

आजकाल म्युच्युअल फंडाच्या (Mutual Fund) माध्यमातून गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढत असल्यानं म्युच्युअल फंडानीही अल्पवयीन मुलांच्या नावे गुंतवणूक करण्याच्या योजना आणल्या आहेत. अर्थात मुलं 18 वर्षांची झाल्यानंतर त्या गुंतवणुकीचे अधिकार त्यांच्याकडे येतात. तोपर्यंत पालकांना आर्थिक व्यवहार करण्याचा अधिकार असतो.

आजकाल म्युच्युअल फंडाच्या (Mutual Fund) माध्यमातून गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढत असल्यानं म्युच्युअल फंडानीही अल्पवयीन मुलांच्या नावे गुंतवणूक करण्याच्या योजना आणल्या आहेत. अर्थात मुलं 18 वर्षांची झाल्यानंतर त्या गुंतवणुकीचे अधिकार त्यांच्याकडे येतात. तोपर्यंत पालकांना आर्थिक व्यवहार करण्याचा अधिकार असतो.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 29 नोव्हेंबर : मुलांसाठी (Children) भविष्यातील आर्थिक तरतूद म्हणून गुंतवणूक करता तेव्हा ती मुलांच्या नावाने करण्याला पालक प्राधान्य देतात. आजकाल म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढत असल्यानं म्युच्युअल फंडानीही अल्पवयीन मुलांच्या नावे गुंतवणूक करण्याच्या योजना आणल्या आहेत. अर्थात मुलं 18 वर्षांची झाल्यानंतर त्या गुंतवणुकीचे अधिकार त्यांच्याकडे येतात. तोपर्यंत पालकांना आर्थिक व्यवहार करण्याचा अधिकार असतो. मुले 18 वर्षांची झाल्यानंतर त्यांच्या नावावर गुंतवणूक होण्यासाठी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करावी लागते. काय असते ही प्रक्रिया याविषयी जाणून घेऊ या.

मुलं लहान असतानाच आई-वडील किंवा पालक (Natural Guardian) आपल्या मुलांसाठी गुंतवणूक सुरू करतात. यासाठी विविध पर्याय आहेत. बँक एफडी, पोस्टातील योजना, एलआयसी तसेच म्युच्युअल फंडही. पण बहुतांश योजनांमध्ये आई-वडील हेच त्या गुंतवणूकीचे अधिकृत हक्कदार असतात. कारण प्रथम गुंतवणूकदार म्हणून त्यांचेच नाव असते किंवा संयुक्त नावानेही गुंतवणूक केली जाते. तिथेही पालकच प्रथम अधिकृत हक्कदार असतात. त्यामुळे योजनेची मुदत संपल्यानंतर करताना मिळणारी रक्कमही पालकांच्या खात्यात जमा होते. पण काही योजनांमध्ये अल्पवयीन मुलांच्या (Minors) नावानेच गुंतवणूक करता येते आणि मुले सज्ञान (Major) म्हणजे 18 वर्षांची झाल्यानंतर त्या गुंतवणूकीचे सर्व अधिकार त्यांना मिळतात. तोपर्यंत पालक फक्त गार्डीयन म्हणून व्यवहार करू शकतात, मुल 18 वर्षांचे झाल्यावर मात्र सर्व व्यवहार त्यालाच करावे लागतात.

म्युच्युअल फंड कंपन्यांच्या अशा विविध योजना उपलब्ध आहेत. या योजनांमध्ये पालकांना मुलांच्या नावाने गुंतवणूक करता येते. या योजनेमध्ये ज्याच्या नावाने गुंतवणूक करायची आहे, तो अल्पवयीन मुलगा किंवा मुलगीच एकमेव (Sole) आणि पहिला खातेधारक (First) असतो. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठीच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नसते. या फंडात संयुक्त नावांनी गुंतवणूक करता येत नाही. या फंडासाठी चालक म्हणून पालक म्हणजे आई-वडील किंवा न्यायालयाने नियुक्त केलेला पालक (Legal Guardians) असणे आवश्यक आहे. न्यायालयाने नियुक्त केलेले कायदेशीर पालक असलेली मुले 21 व्या वर्षी सज्ञान होतात असं कायदा सांगतो.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी NAV म्हणजे काय? समजून घ्या नाहीतर तोटा होईल

ही गुंतवणूक करण्यासाठी पालकांना मुलाच्या वयाचा पुरावा आणि मुलासोबत असलेल्या नातेसंबंधाचा वैध पुरावा सादर करावा लागतो. अल्पवयीन मुलाचा जन्मदाखला, पासपोर्ट आदी कागदपत्रे यासाठी चालू शकतात. गुंतवणुकीला सुरुवात करताना ही कागदपत्रे देणे आवश्यक असते, नंतर त्याच कंपनीच्या इतर योजनांमध्ये किंवा मुदत संपल्यानंतर पुढे गुंतवणूक करण्यासाठी नव्याने पुरावे देण्याची आवश्यकता नाही. तसेच पालकांनी केवायसी नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

अल्पवयीन मुलांच्या नावाने एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) आणि एसडब्ल्यूपी सिस्टिमॅटिक विड्रावल प्लॅन (SWP) किंवा एसटीपी म्हणजे सिस्टीमॅटिक ट्रान्सफर प्लॅनद्वारेही (STP) गुंतवणूक करता येते. मात्र, ज्याच्या नावाने गुंतवणूक केली आहे ते मूल 18 वर्षाचे म्हणजे कायदेशीरदृष्ट्या सज्ञान झाल्यानंतर ही गुंतवणूक आपोआप खंडित होते. कायदेशीर पालक असलेली मुले 21 व्या वर्षी सज्ञान होतात. पालकांच्या बँक खात्यातून फंड खात्यात पैसे हस्तांतरित करण्याच्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स (SI) दिलेल्या असतील तर त्यासुद्धा थांबवल्या जातात.

Business Idea : Amul सोबत व्यवसाय सुरु करा आणि कमवा लाखो रुपये

ज्याच्या नावाने गुंतवणूक केली आहे ते मूल 18 वर्षांचे होते तेव्हा फंड कंपनीकडून पालकांनी पत्रव्यवहारासाठी दिलेल्या पत्त्यावर अथवा ई-मेलद्वारे त्याच्या नावाने सर्व अधिकार होण्याकरता आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करण्याविषयी पूर्वसूचना दिली जाते. तेव्हा फंड कंपनीकडून मूल सज्ञान झाल्याविषयी माहिती देणारा अर्जही (Form) पाठवला जातो. संबंधित मुला-मुलीने स्वतः हा अर्ज भरून फंड कंपनीकडे पाठवणे आवश्यक असते. या अर्जावर मुला-मुलीचं स्वतंत्र बँक खातं जिथं आहे, त्या बँकेच्या अधिकार्‍याची स्वाक्षरी, बँकेचा शिक्का असणं अनिवार्य आहे. याशिवाय केवायसी प्रक्रियाही पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय या गुंतवणुकीचे अधिकार त्या मुला-मुलीला मिळत नाहीत. ही प्रक्रिया ऑनलाइन किंवा ऑफलाइनही करता येते.

केवायसी पूर्ण करण्यासाठी त्या मुला-मुलीला आपले अपडेटेड पॅन कार्ड देणे आवश्यक असते. कारण 18 वर्षांच्या आधी काढलेले असेल तर त्यावर फोटो आणि सही नसते. चेंज ऑफ पॅन डिटेल्स हा अर्ज भरूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येते. सज्ञान मुला-मुलीला स्वतःच्या बँक खात्याचे डिटेल्सही फंड कंपनीला द्यावे लागतात. फंड कंपनीकडे अर्ज आणि केवायसीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर 20 ते 30 दिवसात अल्पवयीन गुंतवणूकदार सज्ञान म्हणून त्याच्या नावाने सर्व अधिकार झाल्याची नोंद केली जाते. त्यानंतर संबधित मुलगा-मुलगी त्या योजनेतील व्यवहार स्वतः करण्याचे हक्कदार होतात. ते आई-वडिलांना किंवा अन्य कोणालाही संयुक्त खातेदार म्हणूनही नियुक्त करू शकतात.

Personal Loan: या बँकांमध्ये मिळतंय सर्वात कमी दराने पर्सनल लोन, इथे तपासा यादी

गुंतवणूकदार अल्पवयीन असेपर्यंत फंड खात्यातील सर्व उत्पन्न आणि लाभ आईवडील किंवा पालकांच्या उत्पन्नामध्ये जोडले जातात. आईवडील किंवा पालकांना त्यावर कर (Tax) द्यावा लागतो. ज्या वर्षी अल्पवयीन गुंतवणूकदार सज्ञान (Major) होतात, त्या वर्षापासून फंड खात्यातील सर्व उत्पन्न आणि लाभ त्यांच्या उत्पन्नात जोडले जातात आणि त्यांना त्यासाठी कर भरावा लागतो. यामुळे मुलांना म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणूकीचा लाभ मिळतो. त्यांना स्वतः त्याच कंपनीत गुंतवणूक करताना पुन्हा कागदपत्रांची प्रक्रिया करावी लागत नाही. कायदेशीरदृष्ट्या त्यांना गुंतवणुकीचे व्यवहार करण्याचा अधिकार मिळाल्याने हव्या त्या पद्धतीने त्याचा वापर करता येतो.

First published:

Tags: Investment, Money, Mutual Funds