Home /News /money /

Mutual Fund गुंतवणुकीदरम्यान कोणत्या चुका टाळाल, वाचा सविस्तर माहिती

Mutual Fund गुंतवणुकीदरम्यान कोणत्या चुका टाळाल, वाचा सविस्तर माहिती

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक (Mutual Fund Investment ) कमी कालावधीसाठी कधीही फायदेशीर ठरत नाही. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी संयम आणि जोखीम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे.

    मुंबई, 29 जानेवारी : म्युच्युअल फंड (Mutual Funds) हा नेहमीच चांगला गुंतवणुकीचा पर्याय (Investment Option) राहिला आहे. कमी जोखमीसह जास्त नफ्यासाठी गुंतवणूकदारांचा कल म्युच्युअल फंडकडे असतो. म्युच्युअल फंड सरकारी योजनांमध्ये (Government Schems) गुंतवणूक करण्यापेक्षा जास्त परतावा देतात. म्युच्युअल फंडांना 5-7 वर्षांच्या गुंतवणुकीवर 12 ते 15 टक्के परतावा मिळतो. परंतु, म्युच्युअल फंड गुंतवणुकीत (Investment Risk)धोका असतो. योग्य माहितीशिवाय गुंतवणूक केल्याने लोकांचे मोठे नुकसानही होऊ शकते. म्हणूनच म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची चांगली माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्युच्युअल फंडाचा अभ्यास करून, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक केली तर निश्चितच चांगला परतावा मिळेल आणि जोखीमही (Investment Risks) कमी होईल. परंतु काही वेळा जाणकार लोकांकडूनही अशा चुका होतात, ज्यामुळे त्यांना नुकसान सहन करावं लागतं. केवळ टॅक्स वाचवण्यासाठी खरेदी करू नका विमा पॉलिसी, होईल मोठं नुकसान संयम आणि वेळ म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कमी कालावधीसाठी कधीही फायदेशीर ठरत नाही. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी संयम आणि जोखीम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडात किमान 7 वर्षे गुंतवणूक करावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बाजारातील रॅलीमुळे उत्साहित होऊन, गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड (MFs) च्या इक्विटी विभागात मोठी गुंतवणूक करू नये. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना बहुतेक लोक जी चूक करतात ती म्हणजे ते तेजीच्या बाजारात गुंतवणूक करतात. ही चूक टाळली पाहिजे. प्रथम गुंतवणूक गुंतवणूकदारांनी बॅलन्स्ड फंडात गुंतवणूक करणे चांगले. नवीन गुंतवणूकदारांनी अशा फंडात गुंतवणूक करावी जिथे जोखीम कमी असते. यात प्युअर इक्विटी फंडांपेक्षा कमी अस्थिरता आहे. म्युच्युअल फंडामध्ये, बहुतेक लोक मिड आणि स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. या फंडांमध्ये जोखीम आणि नुकसानाचा धोका वाढतो. हे जास्त परतावा देतात परंतु, ते बाजारातील जोखमींवर अधिक अवलंबून असतात. Budget 2022: 1950 सालामध्ये इतकाच होता Income Tax, आता कितीपर्यंत वाढला आहे? मोठी रक्कम गुंतवू नका इक्विटीमध्ये मोठ्या रकमेची गुंतवणूक करणे टाळा. बाजारातील घसरण तुम्हाला अडचणीत आणते. थोडे नुकसान झाले की नवीन गुंतवणूकदार घाबरतात. अशा परिस्थितीत हे गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढण्याचा निर्णय घेतात, ज्यामुळे त्यांना तोटा सहन करावा लागतो. म्हणूनच, इक्विटी ओरिएंटेड फंडांमध्ये गुंतवणूक ही पद्धतशीर गुंतवणूक योजनेद्वारे केली पाहिजे. बाजारातील अस्थिरतेची भीती अनेक वेळा बाजारातील चढ-उतार पाहून लोक खूप घाबरतात. अनेक वेळा घाबरून लोक SIP (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) थांबवतात. ही एक मोठी चूक आहे जी तुम्ही करणे टाळावे. जेव्हा बाजार घसरतो तेव्हा एसआयपीचा परतावा घसरू लागतो. अशा स्थितीत काही गुंतवणूकदार घाबरतात. तर, SIP दीर्घ मुदतीत मजबूत परतावा देते. त्यामुळे घसरणीतही एसआयपी कायम ठेवावी. ट्रेडिंगच्या दृष्टीने एसआयपीकडे कधीही पाहिले जाऊ नये.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Mutual Funds

    पुढील बातम्या