मराठी बातम्या /बातम्या /मनी /

रिटेल Digital Rupee म्हणजे काय? जाणून घ्या cryptocurrency आणि डिजिटल रुपीमधला फरक

रिटेल Digital Rupee म्हणजे काय? जाणून घ्या cryptocurrency आणि डिजिटल रुपीमधला फरक

 रिटेल डिजिटल रुपी (e₹-R) हे भारतातील पहिलं सीबीडीसी किंवा डिजिटल किंवा आभासी चलन आहे. किरकोळ खरेदीसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो.

रिटेल डिजिटल रुपी (e₹-R) हे भारतातील पहिलं सीबीडीसी किंवा डिजिटल किंवा आभासी चलन आहे. किरकोळ खरेदीसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो.

रिटेल डिजिटल रुपी (e₹-R) हे भारतातील पहिलं सीबीडीसी किंवा डिजिटल किंवा आभासी चलन आहे. किरकोळ खरेदीसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 01 डिसेंबर : साधारण एका महिन्यापूर्वी भारतात होलसेल सेगमेंटमध्ये डिजिटल रुपयाची चाचणी सुरू झाली होती. या चाचणीला एक महिना पूर्ण होण्याच्या आतच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) मंगळवारी, 1 डिसेंबर रोजी रिटेल डिजिटल रुपयाचं (e₹-R) पहिलं पायलट टेस्टिंग लाँच करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे नागरिकांना किरकोळ खरेदीसाठी भारतातील पहिलं केंद्रीय बँक डिजिटल चलन (सीबीडीसी) वापरण्याची परवानगी मिळणार आहे.

काय आहे रिटेल डिजिटल रुपी?

रिटेल डिजिटल रुपी (e₹-R) हे भारतातील पहिलं सीबीडीसी किंवा डिजिटल किंवा आभासी चलन आहे. किरकोळ खरेदीसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. भारतातील सध्याच्या कागदी चलनाप्रमाणे, हेदेखील भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलं आहे. "e₹-R हे कायदेशीर निविदांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या डिजिटल टोकनच्या स्वरूपात असेल," अशी माहिती मंगळवारी (29 नोव्हेंबर) आरबीआयनं दिली.

(डिजिटल रुपया कोण वापरू शकतं, खात्यावर व्याज मिळणार का?)

2022-23 च्या अर्थसंकल्पीय भाषणात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं होतं की, डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि कार्यक्षम चलन व्यवस्थापनासाठी आरबीआय चालू आर्थिक वर्षात डिजिटल चलन सादर करेल.

रिटेल डिजिटल रुपीचा वापर कसा कराल?

आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, सध्या डिजिटल रुपी योजनेत सहभागी असलेल्या बँकांद्वारे ऑफर केलेल्या आणि मोबाईल फोन/डिव्हाइसवर साठवलेल्या डिजिटल वॉलेटद्वारे नागरिक e₹-R व्यवहार करू शकतील. व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) आणि व्यक्ती-ते-व्यापारी (P2M) अशा दोन्ही प्रकारचे व्यवहार शक्य आहेत. बँकांद्वारे रिटेल डिजिटल रुपया वितरित केला जाईल.

कोणत्या बँका डिजिटल रुपयाचं वितरण करतील?

आरबीआयच्या निवेदनानुसार, सध्याच्या पायलट टेस्टिंग लाँचमध्ये आठ बँकांना टप्प्याटप्प्याने सहभागी करून घेतलं जाणार आहे. पहिला टप्पा देशभरातील चार शहरांमध्ये (दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि भुवनेश्वर) सुरू होईल. या चार शहरांतील स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक डिजिटल रुपया वितरित करतील. त्यानंतरच्या टप्प्यात बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक यामध्ये सहभागी होतील. "सध्या कागदी चलन आणि नाणी ज्या मूल्यांमध्ये जारी केली जातात त्याच मूल्यांमध्ये डिजिटल रुपया जारी केला जाईल," असं आरबीआयनं म्हटलं आहे.

1 डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात डिजिटल चलन सुरू होईल का?

आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, रिटेल डिजिटल रुपयाच्या पायलट टेस्टिंगमध्ये सुरुवातीला मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वर या चार शहरांचा समावेश करण्यात आला आहे. नंतर अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, कोची, लखनौ, पाटणा आणि शिमलापर्यंत त्याचा विस्तार होईल. अधिक बँका, वापरकर्ते आणि ठिकाणं समाविष्ट करण्यासाठी आवश्यकतेनुसार पायलट टेस्टिंगची व्याप्ती हळूहळू वाढविली जाऊ शकते.

(Digital Rupee चा तुमच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम? वाचा फायदे आणि तोटे)

"पायलट टेस्टिंगमध्ये निवडलेल्या ठिकाणांमधील क्लोज्ड युजर ग्रुप (सीयूजी) ग्राहक आणि व्यापारी यांचा समावेश असेल," असं आरबीआयनं सांगितलं आहे.

डिजिटल रुपया क्रिप्टोकरन्सी सारखाच आहे का?

डिजिटल रुपया हे सीबीडीसी किंवा आभासी चलन आहे. हे गेल्या दशकात वाढलेल्या खासगी आभासी चलन किंवा क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन, इथरियम इत्यादींपेक्षा वेगळं आहे. खासगी व्हर्च्युअल चलनं कोणत्याही व्यक्तीचं कर्ज किंवा दायित्व दाखवत नाहीत कारण त्यांना इश्युअर नाही. इथं आरबीआय हे चलन इश्यु करत आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

रिसर्जंट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ज्योती प्रकाश गडिया म्हणाले, "जगभरातील इतर केंद्रीय बँकांच्या तुलनेत आरबीआय सातत्यानं प्रयत्न करून डिजिटल चलनाची कार्यक्षम, युजर फ्रेंडली यंत्रणा तयार करत आहे."

गडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिटेल रुपयासाठी निवडलेलं मॉडेल हे आधी जाहीर केलेल्या होलसेल रुपयापेक्षा वेगळं आहे. बँका सरकारी सुरक्षा व्यवहारांसाठी होलसेल रुपया वापरतात. ते म्हणाले, "आरबीआयनं रिटेलसाठी घोषित केलेली टोकन-आधारित यंत्रणा सामान्य किरकोळ ग्राहकांसाठी अधिक अनुकूल आहे. निवडक व्यापार्‍यांसह वैयक्तिक व्यवहारांसाठी, एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीसोबत व्यवहार करण्यासाठी याचा अधिक फायदा होईल."

बीसीटी डिजिटलच्या सीईओ जया वैद्यनाथन म्हणाल्या, "भारतीय रिझर्व्ह बँकनं आणलेलं सीबीडीसी सर्वांसाठी परवडणारं आणि सुरक्षित आहे. सुलभ पेमेंट व्यवस्था प्रदान करण्याची ती वचनपूर्ती आहे. हे चलन बाजारात क्रिप्टोकरन्सींना एक नियमन केलेला पर्याय उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे, कॅशवरील अवलंबित्व कमी होऊन अधिक मजबूत आणि विश्वासार्ह पेमेंट व्यवस्था निर्माण होईल."

वैद्यनाथन पुढे म्हणाल्या की, आधारभूत तंत्रज्ञानामुळे व्यवहाराचा खर्च कमी होईल. इतर पेमेंट सिस्टिमसह इंटरऑपरेबल असल्याने, ते यूपीआयसारख्या विद्यमान तंत्रांना पूरक ठरेल. अशाप्रकारे मोबाइल पेमेंट इकोसिस्टम पूर्ण होईल.

First published: