मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसमध्ये गु्ंतवणूक करुन दरमाह 5000 मिळवा, काय आहे स्कीम? वाचा सविस्तर

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसमध्ये गु्ंतवणूक करुन दरमाह 5000 मिळवा, काय आहे स्कीम? वाचा सविस्तर

दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न हवे असल्यास, पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम अकाउंट (POMIS) एक चांगली योजना ठरू शकते. या योजनेत (Post Office Scheme) एकरकमी गुंतवणूक करावी लागेल.

दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न हवे असल्यास, पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम अकाउंट (POMIS) एक चांगली योजना ठरू शकते. या योजनेत (Post Office Scheme) एकरकमी गुंतवणूक करावी लागेल.

दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न हवे असल्यास, पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम अकाउंट (POMIS) एक चांगली योजना ठरू शकते. या योजनेत (Post Office Scheme) एकरकमी गुंतवणूक करावी लागेल.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 8 नोव्हेंबर : भविष्य सुरक्षित करण्यासाठी खात्रीशीर उत्पन्न असणे आवश्यक आहेत. अशा काही अनेक योजना (Investment Planning) आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित करु शकता. यातील एक स्कीम म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना  (Post Office Monthly Income Scheme ). दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न हवे असल्यास, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) एक चांगली योजना ठरू शकते. या योजनेत एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत पैसे 100 टक्के सुरक्षित आहेत. या योजनेत विवाहितांना दुप्पट फायदा मिळतो. यामध्ये सिंगल आणि जॉईंट खाते (Single And Joint Account) उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे.

टीव्ही 9 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, सिंगल गुंतवणूकदारांना किमान 2475 रुपये किंवा 29,700 रुपये प्रति महिना वार्षिक उत्पन्न गॅरंटी मिळते. तर जॉईंट खात्यात हा नफा दुप्पट होतो. तुम्ही POMIS खात्यात सिंगल खाते उघडल्यास, 4.5 लाख रुपये एकरकमी जमा करावे लागतील. त्याच वेळी, जॉईंट खात्याद्वारे जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. यामध्ये 6.6 टक्के वार्षिक व्याजाने संपूर्ण वर्षभरात मिळणारी रक्कम 12 महिन्यांत विभागली जाते. प्रत्येक महिन्याची रक्कम ही तुमचे मासिक उत्पन्न असते. योजनेची परिपक्वता 5 वर्षे आहे, परंतु पुढील रिइनवेस्टमेंट अंतर्गत ती आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येऊ शकते.

Short Term Pick : 'या' स्टॉक्समधून मिळू शकतात चांगले रिटर्न, 3-4 आठवड्यात होऊ शकते चांगली कमाई

व्याज किती मिळते?

>> पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) 6.6 टक्के वार्षिक व्याज देते

>> उघडल्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यावर आणि मुदतपूर्ती होईपर्यंत व्याज देय असेल

>> दरमहा देय असलेल्या व्याजावर खातेदाराने दावा केला नसेल, तर अशा व्याजातून कोणतेही अतिरिक्त व्याज जमा होणार नाही.

>> पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यात ऑटो क्रेडिट किंवा ईसीएसद्वारे व्याज काढले जाऊ शकते.

>> ठेवीदाराला मिळणारे व्याज करपात्र आहे.

MIS खाते कसे उघडायचे?

तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचे MIS खाते उघडू शकता. POMIS फॉर्म भरताना, तुम्हाला ओळखीचा पुरावा, निवासी पुरावा, 2 पासपोर्ट फोटो आवश्यक असतील. फॉर्म भरताना, तुम्हाला साक्षीदाराची देखील आवश्यकता असेल. फॉर्मसह खाते उघडण्यासाठी ठरवलेल्या रकमेसाठी रोख किंवा चेक जमा करा.

Nykaa IPO : शेअर अलॉटमोंट आज होणार, डिटेल कसे चेक कराल?

दरवर्षी सुमारे 60 हजार रुपये मिळतील

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत एका खात्याद्वारे किमान 4.5 लाख रुपये जमा करू शकता येते. वार्षिक 6.6 टक्के व्याजदरानुसार या रकमेवर एकूण 29,700 रुपये व्याज मिळेल. तर या योजनेत जॉईंट अकाऊंटद्वारे जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. व्याजदरानुसार या रकमेवर एकूण 59,400 रुपये व्याज मिळेल.

प्री-मॅच्युअर खाते बंद करण्याचे नियम

ठेवीच्या तारखेपासून 1 वर्षाची मुदत संपण्यापूर्वी कोणतीही ठेव काढता येत नाही. खाते 1 वर्षापूर्वी आणि खाते उघडण्याच्या 3 वर्षापूर्वी बंद केले असल्यास, मूळ रकमेच्या 2% च्या एवढी रक्कम कापली जाईल आणि शिल्लक रक्कम दिली जाईल.

खाते उघडल्याच्या तारखेपासून 3 वर्षांनंतर आणि 5 वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, मूळ रकमेच्या 1 टक्के इतकी रक्क वजा केली जाईल आणि शिल्लक रक्कम दिली जाईल. संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पास बुकसह अर्ज जमा करून खाते मुदतपूर्व बंद करता येते.

First published:

Tags: Money, Post office