मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Pashu Aadhar: आधार कार्डमुळे होणार 'लम्पी' नियंत्रित? केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल

Pashu Aadhar: आधार कार्डमुळे होणार 'लम्पी' नियंत्रित? केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल

Pashu Aadhar: आधार कार्डमुळे होणार 'लम्पी' नियंत्रित? केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल

Pashu Aadhar: आधार कार्डमुळे होणार 'लम्पी' नियंत्रित? केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल

Pashu Aadhaar Card: प्रत्येक व्यक्तीप्रमाणं आता पशुधनाला ‘आधार’ची ओळख मिळणार आहे. पशुधनालाही आता युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक दिला जाईल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 14 सप्टेंबर: देशातील नागरिकांची योग्य प्रकारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक देऊन प्रत्येकाला विशिष्ट ओळख देण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीप्रमाणं आता पशुधनाला ‘आधार’ची ओळख मिळणार आहे. पशुधनालाही आता युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक (Pashu Aadhaar Card) दिलं जाईल. याद्वारे पशुधनाची संख्या आणि त्यांच्या आरोग्याची माहिती एकत्रित केली जाणार आहे. पशुधनाला बायोमेट्रिक ओळख देण्यासाठी ‘पशु आधार’ काढलं जाणार आहे. डेअरी क्षेत्राशी निगडीत पशुधनाची मोठ्या प्रमाणात आकडेवारी या माध्यमातून संकलित केली जाणार आहे. 12 सप्टेंबर रोजी ग्रेटर नोएडा इथं जागतिक डेअरी शिखर संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात माहिती दिली होती. पशु आधारच्या निमित्ताने पशुधनाच्या आरोग्याबद्दलही माहिती अपडेट ठेवता येणार आहे. डेअरी क्षेत्राच्या विस्ताराच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल असणार आहे.

काय आहे पशु आधार?

आधार कार्डवरील आयडेंटिफिकेशन क्रमांकाप्रमाणे पशुंना विशिष्ट क्रमांक देत सरकारकडून डेअरी क्षेत्रातील पशुधनाची संख्या आणि त्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडून पशुधनाचे आरोग्य आणि उत्पादकता यासंबंधी माहितीचे नेटवर्क उभे करण्यासाठी म्हणजेच पशु आधारसाठी काम केले जाणार आहे. या प्रक्रियेतंर्गत सर्व पशुधनाला एका ईअर टॅगसह 12 क्रमांकाचं युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक दिलं जाईल. म्हणजे जनावरांच्या कानाला टॅग बसवला जाईल. प्राण्यांच्या प्रजाती, जाती आणि त्यांच्या वशांशी संबंधित सर्व डेटा आयएनएपीएचकडं असणार आहे. याशिवाय गायींच्या विण्याचा काळ, झालेली वासरं, दुग्ध उत्पादन व पशुधनाचे लसीकरण यासंबंधीची माहिती या योजनेअंतर्गत सरकारकडे नोंदवली जाणार आहे.

पशुधनाची तस्करी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात 2015 मध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचवेळी पशू आधार कार्ड तयार करावं असा प्रकल्प तयार करण्याची शिफारस सरकारी समितीने पहिल्यांदा केली होती. इंडियन एक्स्प्रेसनं 2019 मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सरकारकडून 94 दशलक्ष दूध देणाऱ्या गायी व म्हशींना पशू आधार कार्ड देण्यात येणार होतं. यानंतरच्या टप्प्यात दूध देणारी दुसरी जनावरे, वासरं, बैल, रेडा, भटक्या जनावरांचा समावेश केला गेला. 2019 पर्यंत 22.3 दशलक्ष गायी, म्हशींना यूआयडी दिला गेला आहे. या पशुधनाची पूर्ण माहिती आयएनएपीएच वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत सद्यस्थितीत आयएनएपीएच वेबसाइटवर 22,67,63,928 पशुधनाची नोंदणी झाली आहे.

हेही वाचा: Fraud Alert: आयुष्मान कार्ड बनवण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक, ‘या’ तीन गोष्टींची घ्या काळजी

असा होणार ‘लम्पी’च्या नियंत्रणासाठी उपयोग: 

सद्यस्थितीत पशुधनाला ‘लम्पी’ या आजारानं ग्रासलंय. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार दोघे सोबत काम करत आहेत. या आजारामुळे देशातील राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि पंजाबसह आठ राज्यांमध्ये पशुधनाचा मृत्यू होत आहे. लम्पी हा एक वेगाने पसरत असलेला विषाणू संसर्गजन्य (Contagious Viral Disease) त्वचेचा आजार असून ताप आणि जनावराच्या शरीरावर गाठी अशी याची लक्षणं दिसून येतात. दूध उत्पादकतेवर याचा परिणाम होत असून, पशुधन दगावण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वदेशी लस निर्मितीवर वेगाने काम सुरू असून, या रोगाचा प्रसार वाढणार नाही यासाठी पशुधनाला ट्रक करण्यासाठीही पावलं उचलली जात असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. डिजीटल आयडेंटिफिकेशनच्या मदतीने पशुधनाला ट्रक करणं सोप जाईल. त्यांच्या कानात लावलेल्या टॅगमुळे ती गाय किंवा तो पशू कुठे गेला याचं ट्रॅकिंग करता येतं.

पशु आधारसाठी अशी आहे प्रक्रिया:

पशुधन असलेल्या शेतकऱ्यांनी IANPH पोर्टलवर जाऊन सर्वप्रथम नवीन अकाउंट पर्यायावर क्लिक करून आपली नोंदणी करावी लागेल. मोबाइलवर व्हेरीफिकेशन कोड येईल. तो कोड पोर्टलवर टाकावा. पशुधनाची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी दोन मार्ग आहेत. यात ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाइन नोंदणी केली असेल त्यांना फोनवर एसएमएसद्वारे लॉग इन माहिती आणि लिंक दिली जाईल. या लिंकवर क्लिक करून INAPH फार्मर अँड्राइड अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. मोबाइलवरून थेटही हे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करण्याची सुविधा आहे.

ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मोबाइलवर टेक्स मॅसेजद्वारे लॉग इन माहिती प्राप्त होईल. ती भरून पोर्टलच्या INAPH फार्मर वेब अ‍ॅप्लिकेशनवर जाता येईल.

आपल्या पशूची आधार नोंदणी करण्यासाठी INAPH च्या वेबसाईटवर जाऊन Animal Registration या पर्यायावर क्लिक करावं आणि पशूच्या मालकाची आणि पशूची माहिती तिथल्या अर्जात भरावी. त्यानंतर पशू मालक किंवा शेतकऱ्याला पशू आधार UID मिळू शकेल.

First published:

Tags: Aadhar card