मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Corona च्या संकटकाळात इथे करा गुंतवणूक, केवळ 500 रुपयांत सुरुवात करून मिळवा नफा

Corona च्या संकटकाळात इथे करा गुंतवणूक, केवळ 500 रुपयांत सुरुवात करून मिळवा नफा

कोरोना साथीच्या (Coronavirus Pandemic) या संकटात लोकांना पैशाची कधीही गरज पडू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही गुंतवणूक (Investment) करण्याची योजना आखत असाल तर फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येईल

कोरोना साथीच्या (Coronavirus Pandemic) या संकटात लोकांना पैशाची कधीही गरज पडू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही गुंतवणूक (Investment) करण्याची योजना आखत असाल तर फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येईल

कोरोना साथीच्या (Coronavirus Pandemic) या संकटात लोकांना पैशाची कधीही गरज पडू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही गुंतवणूक (Investment) करण्याची योजना आखत असाल तर फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येईल

नवी दिल्ली, 23 एप्रिल: कोरोना साथीच्या (Coronavirus Pandemic) या संकटात लोकांना पैशाची कधीही गरज पडू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही गुंतवणूक (Investment) करण्याची योजना आखत असाल तर फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येईल, असा एक पर्याय आम्ही आपल्याला सांगत आहोत. या योजनेतून आपल्याला चांगला परतावा मिळेल आणि भविष्यासाठी चांगली तरतूद होईल. हा पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड (Mutual Fund) एसआयपी (Systematic Investment Plan-SIP) अर्थात सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आजकाल एसआयपी हा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. याद्वारे आपण आपल्या सोयीनुसार आवडीच्या म्युच्युअल फंडामध्ये ठराविक रक्कम हप्त्यांमध्ये जमा करू शकता.

2019-20 मध्ये एसआयपीमार्फत म्युच्युअल फंडामध्ये एक लाख कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. यावरून लक्षात येईल की, म्युच्युअल फंडात किती मोठ्या प्रमाणात बचत केली जात आहे.

एसआयपी म्हणजे काय?

थेंबे थेंबे तळे साचे अशी म्हण आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. एसआयपी अर्थात सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय हे स्पष्ट करण्यासाठी ही म्हण अगदी समर्पक आहे. कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेत तुम्ही एसआयपीद्वारे किमान 500 रुपये इतकी रक्कम साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक तत्वावर भरू शकता. जितका जास्त काळ गुंतवणूक कराल तितका जास्त फायदा मिळेल. थोडे थोडे पैसे जमा करत कालांतरानं एक मोठी रक्कम जमा होते. शेअरबाजारात थेट किंवा एक रकमी गुंतवणूक करू न शकणाऱ्या अशा लोकांसाठी एसआयपी हा एक उत्तम पर्याय आहे.

अशी सुरू करा ऑनलाइन एसआयपी

एसआयपी सुरू करण्यासाठी, पॅनकार्ड, अॅड्रेस प्रूफ, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि चेकबुक आवश्यक आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी ‘केवायसी’ (KYC) प्रक्रिया अनिवार्य आहे. ऑनलाइन एसआयपी सुरू करण्यासाठी ज्या फंडात गुंतवणूक करायची आहे, त्या फंड हाउसच्या वेबसाइटवर जाऊन आपल्या आवडीनुसार एसपीआय निवडू शकता. यासाठी आधी केवायसी नियम पूर्ण करणं आवश्यक आहे. नवीन खात्यासाठी आधी रजिस्टर करा या लिंकवर जावे लागेल. तिथं ओपन झालेल्या फॉर्ममध्ये सर्व वैयक्तिक तपशील आणि इतर माहिती भरावी लागेल, मग फॉर्म सबमिट करता येईल.

ऑनलाइन व्यवहारासाठी आपल्याला एक युजर नेम आणि पासवर्ड तयार करावा लागेल. याशिवाय एसआयपी पेमेंटसाठी बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल. त्यानंतर, आपल्या युजरनेमच्या आधारे लॉग इन केल्यानंतर आपण आपल्या आवडीची योजना निवडू शकता. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आणि फंड हाउसकडून त्याची खात्री झाल्यावर एसआयपी सुरू होते. साधारण 15 ते 40 दिवसांच्या कालावधीनंतर एसआयपी सुरू होते.

एसआयपीचे फायदे

कमी जोखीम घेत, इक्विटी (Equity) किंवा डेट फंडमध्ये (Debt Fund) गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एसआयपी हा एक उत्तम पर्याय आहे. याच्या आधारे थोडी रक्कम तीही हप्त्यांमध्ये गुंतवून कोणत्याही त्रासाशिवाय आपण शेअरबाजारात गुंतवणूक करू शकतो. फंड हाउसला स्टॅडिंग इन्स्ट्रक्शन्स (SI) देऊन बँक खात्यातून ऑटो डेबिटची सुविधादेखील वापरता येते. त्यामुळे दरमहा आपल्या बँक खात्यातून हप्त्याची रक्कम आपोआप वजा होईल. एसआयपीमध्ये तुम्हाला कंपाउंडिंग म्हणजेच चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळेल. तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडामध्ये दहा टक्के दराने एक हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला एका वर्षात मिळणारे व्याज शंभर रुपये असेल, तर त्या पुढच्या वर्षी तुम्हाला मिळणारे व्याज हे 1100 रुपयांवर असेल.

First published:

Tags: Coronavirus, Investment, Money