नवी दिल्ली, 4 जानेवारी : अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीसाठीचे पर्याय शोधत असतात. आपले पैसे लवकरात लवकर डबल व्हावे अशीही अनेकांची इच्छा असते. पण पैसे सुरक्षित असणंही तितकंच गरजेचं वाटतं. अशात इंडियन पोस्ट ऑफिसची छोटी बचत योजना फायदेशीर ठरू शकते. पोस्ट ऑफिसच्या या गुंतवणुकीच्या योजनेत पैसे गुंतवणाऱ्या व्यक्तीला चांगल्या रिटर्न्ससह डिपॉझिटवरही सरकारी सुरक्षेचा फायदा मिळतो. किसान विकास पत्र (KVP) या योजनेत 10 वर्ष आणि 4 महिन्यात एकूण 124 महिन्यात जमा केलेली रक्कम दुप्पट करण्याचा दावा करण्यात आला आहे.
काय आहे किसान विकास पत्र योजना?
या 10 वर्ष 4 महिन्यांच्या योजनेत 6.9 टक्के वार्षिक कंपाउंट व्याज मिळतं. किसान विकास पत्रमध्ये सर्टिफिकेट रुपात गुंतवणक केली जाते. 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपयांपर्यंतचे सर्टिफिकेट आहेत, जे खरेदी करता येतात.
KVP या स्किममध्ये कोणताही 18 वर्षांवरील भारतीय व्यक्ती आपलं अकाउंट सुरू करू शकतो. अकाउंट ओपन करण्यासाठी तसं कोणतीही वयोमर्यादा नाही. अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने KVP सर्टिफिकेट खरेदी करता येतं. NRI या स्किमसाठी पात्र नाही.
किसान विकास पत्र सर्टिफिकेट 1000 रुपयांच्या कमीत-कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये खरेदी करू शकता. यासाठी कोणतीही अधिकाधिक मर्यादा नाही. म्हणजे हवे तितके पैसे या स्किममध्ये गुंतवता येतील. या योजनेची सुरुवात 1988 मध्ये शेतकऱ्यांची गुंतवणूक डबल व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. परंतु आता गुंतवणुकीचा हा पर्याय सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे.
KVP योजनेत गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नसल्याने मनी लॉन्ड्रिंचा धोका आहे. त्यासाठी सरकारने 2014 मध्ये 50000 रुपयांहून अधिकच्या गुंतवणुकीवर PAN कार्ड अनिवार्य केलं आहे. त्याशिवाय कोणी 10 लाख किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करत असेल. तर त्यासाठी उत्पन्नाचा पुरावा, ITR, सॅलरी स्लिप आणि बँक स्टेटमेंट असणं गरजेचं आहे. तसंच ओळखपत्र म्हणून आधार कार्डही आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.