Home /News /money /

काय आहे Crypto Credit Card? जाणून घ्या याचा वापर आणि फायदे

काय आहे Crypto Credit Card? जाणून घ्या याचा वापर आणि फायदे

cryptocurrency credit cards: ज्याप्रकारे तुम्ही बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करता त्याचप्रमाणं तुम्ही क्रिप्टो क्रेडिट कार्डचाही वापर करू शकता. क्रिप्टो क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचं डेबिट कार्ड आहे.

नवी दिल्ली 20 डिसेंबर : पेमेंट किंवा खरेदी करण्याचा एक सोयीस्कर मार्ग म्हणून क्रेडिट कार्डकडं (Credit cards) पाहिलं जातं. सध्या क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला आहे. साध्या क्रेडिट कार्डसोबतच आजकाल क्रिप्टोकरन्सी क्रेडिट कार्डचीही (cryptocurrency credit cards) जोरदार चर्चा होत आहे. जागतिक स्तरावर बाजारांमध्ये क्रिप्टोकरन्सीच्या रुपात अब्जावधी रुपयांचे व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे क्रिप्टो क्रेडिट कार्डलाही महत्व प्राप्त झालं आहे. ज्याप्रकारे तुम्ही बँकांचे क्रेडिट कार्डचा वापर करता त्याचप्रमाणं तुम्ही क्रिप्टो क्रेडिट कार्डचाही वापर करू शकता. क्रेडिट कार्डनं खरेदी केल्यास रिवार्डस् आणि कॅशबॅक मिळतात. हेच क्रिप्टो क्रेडिट कार्डच्या बाबतीतही लागू होतं का? क्रिप्टो क्रेडिट कार्डवरही व्याज लागू होतं का? असे काही प्रश्न अनेकांना पडले असतील. या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देण्यात आली आहेत. क्रिप्टो क्रेडिट कार्ड काय आहे? सर्वात अगोदर आपण क्रिप्टो क्रेडिट कार्ड काय आहे, हे जाणून घेऊया. क्रिप्टो क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचं डेबिट कार्ड आहे. कुठल्याही बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डसारखीच त्याची रचना असते. फरक फक्त एवढाच आहे की, क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये नोट करन्सी (Note currency) किंवा कॉइन करन्सीचा (Coin currency) वापर होतो तर क्रिप्टो क्रेडिट कार्डमध्ये पूर्णपणे डिजिटल करन्सीचा (Digital currency) वापर होतो. Share Market Crash : शेअर बाजारातील घसरणीचं नेमकं कारण काय? कोणते घटक ठरले कारणी आपण बँकांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड्सच्या व्यवहारात रोख रक्कम न देता कार्ड पुढे करतो. त्याचप्रकारे आपल्याला क्रिप्टो क्रेडिट कार्डमध्ये बिटकॉइन (Bitcoin), इथेरियम (Ethereum) किंवा डॉजकॉइन (Dogecoin) देण्याची गरज भासत नाही. क्रिप्टो क्रेडिट कार्डचा वापर केल्यास अगोदर क्रिप्टोकरन्सी त्या देशाच्या चलनात रूपांतरित केली जाईल आणि नंतर ती पेमेंट करणाऱ्याला दिली जाईल. पेमेंट करणारी व्यक्ती कोणत्याही वस्तूंच्या खरेदीसाठी याचा वापर करू शकते. क्रिप्टो कार्डमध्ये सर्व हायटेक ऑनलाईन सुविधांचा समावेश असल्यानं त्याच्या ट्रान्झॅक्शनलासाठी बँकेच्या कार्डइतकाच वेळ लागतो. रिवॉर्ड्स (Rewards) बँकांच्या क्रेडिट कार्डप्रमाणं क्रिप्टो क्रेडिट कार्डचा वापर केल्यानंतर रिवॉर्ड्स मिळतात. विविध क्रिप्टो कार्ड्स युजर्सला वेगवेगळ्या प्रकारचे रिवॉर्ड्स देतात. जेमिनी क्रेडिट कार्ड बिटकॉइनमध्ये 3 टक्क्यांपर्यंत रिवॉर्ड देतं. हे बक्षीस लगेचच युजरच्या जेमिनी अकाऊंटमध्ये जमा केलं जातं. ब्लॉकफाय (BlockFi) क्रेडिट कार्ड युजरला बिटकॉइन आणि इथेरियमसह 10 प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी पेमेंटवर 1.5 टक्क्यांपर्यंत रिवॉर्ड देतं. खरेदीसाठी जास्त रकमेची मर्यादा या क्रिप्टो कार्डच्या मदतीनं रोख रक्कमही काढता येते. कॉईनबेसनं (Coinbase) सर्वात पहिल्यांदा 'शिफ्ट कार्ड' या नावानं क्रिप्टो क्रेडिट कार्ड जारी केलं होतं. शिफ्ट कार्डमध्ये बिटकॉईनचा बॅलन्स जमा केला जातो. जेव्हा तुम्ही कार्ड वापरून खरेदी करता तेव्हा हा बॅलन्स कमी होत जातो. शिफ्ट क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही एका दिवसात एक हजार डॉलर्सची खरेदी करू शकता. एटीएमकार्डमध्ये (ATM Card) ही मर्यादा 200 डॉलर्स इतकी आहे. कसे मिळवाल क्रिप्टो क्रेडिट कार्ड व्हिसा किंवा मास्टरकार्डद्वारे क्रिप्टो क्रेडिट कार्ड तयार केले जातात. यासाठी तुम्हाला कोणत्याही क्रिप्टो ऑर्गनायझेशनकडून क्रिप्टो क्रेडिट कार्ड घ्यावं लागेल. क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजमध्ये व्यवहार करणाऱ्या कंपन्या अशी क्रिप्टो कार्ड्स देण्याचं काम करतात. Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीला सोने दरात वाढ, तपासा मुंबईतील आजचा भाव पेमेंट लेट झाल्यास द्यावं लागेल जास्त व्याज उशिरा पेमेंट केल्यास क्रिप्टो क्रेडिट कार्ड्सवर जास्त व्याज दर आणि जास्त लेट फी आकारली जाते. उशिरा पेमेंट केल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही (Credit Score) परिणाम होतो. पारंपरिक क्रेडिट कार्डांप्रमाणं क्रिप्टो कार्डसाठीदेखील वार्षिक फी आकारली जाते. फॉरेन एक्सचेंजसाठी एक्स्ट्रा चार्ज लागत नाही नियमित क्रेडिट कार्डसोबत विविध विविध प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारलं जातं. क्रिप्टो क्रेडिट कार्डमध्ये असं होत नाही. क्रिप्टो क्रेडिट कार्डमध्ये दिलेल्या मर्यादेपर्यंत खर्च केल्यास कार्ड चार्ज माफ केला जातो. याशिवाय क्रिप्टो क्रेडिट कार्डमध्ये फॉरेन एक्सचेंजसाठी (Foreign Exchange) एक्स्ट्रा चार्ज लागत नाही.

शेअर बाजारात घसरगुंडी! गुंतवणूकदारांचं 10 लाख कोटींचं नुकसान

रिवॉर्ड पॉईंटची व्हॅल्यू कमी-जास्त होते साध्या क्रेडिट कार्ड खरेदीवर मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅकची व्हॅल्यू वाढत नाही. परंतु, क्रिप्टो कार्डमध्ये असं होत नाही. ज्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सीची व्हॅल्यू वाढेल त्याप्रमाणात क्रिप्टो क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट्सची व्हॅल्यू वाढते. हाच नियम व्हॅल्यूमध्ये घट झाल्यानंतरही लागू होतो. स्टॉक मार्केटसारखी (Stock Market) ही पद्धत आहे. जर तुम्ही क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये सक्रीय असाल तर, क्रिप्टो क्रेडिट कार्डचा वापर करण्यास हरकत नाही. कारण त्याचा वापर आपल्या नियमित क्रेडिट कार्डसारखाचं आहे.
First published:

Tags: Credit card, Cryptocurrency

पुढील बातम्या