Home /News /money /

Credit Card स्टेटमेंटमध्ये मिळते खर्चाची डिटेल माहिती, वाचा प्रत्येक शब्दाचा अर्थ

Credit Card स्टेटमेंटमध्ये मिळते खर्चाची डिटेल माहिती, वाचा प्रत्येक शब्दाचा अर्थ

. क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये तुमच्या बिलिंग सायकल दरम्यान केलेल्या व्यवहारांचे तपशील (Transactions), किमान देय रक्कम (Minimum Amount Due), देय रक्कम (Amount Due), देय तारीख (Due Date) इत्यादी माहिती असते.

    मुंबई, 16 जानेवारी : जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला दर महिन्याला क्रेडिट कार्ड स्टेटमेंट मिळालेच असेल. क्रेडिट कार्ड स्टेटमेंट किंवा बिलिंग स्टेटमेंटमध्ये बिलिंग सायकल किंवा बिलिंग पीरियड दरम्यान तुम्ही क्रेडिट कार्ड कसे वापरले याची माहिती मिळते. हे स्टेटमेंट कार्डच्या बिलिंग सायकलच्या शेवटी तयार केले जाते. क्रेडिट कार्ड यूजर्सनी या संबंधित महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जागरूक असले पाहिजे. जर तुम्हाला क्रेडिट कार्ड स्टेटमेंट समजले असेल, तर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या बिलात कोणतीही तफावत देखील पकडू शकता. क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये तुमच्या बिलिंग सायकल दरम्यान केलेल्या व्यवहारांचे तपशील (Transactions), किमान देय रक्कम (Minimum Amount Due), देय रक्कम (Amount Due), देय तारीख (Due Date) इत्यादी माहिती असते. क्रेडिट कार्ड बिलिंग सायकल क्रेडिट कार्ड बिलिंग सायकल हे स्टेटमेंट सायकल म्हणूनही ओळखले जाते. क्रेडिट कार्ड अॅक्टिव्हेट झाल्याच्या दिवसापासून बिलिंग सायकल सुरू होते. बिलिंग सायकल कालावधी 28 ते 32 दिवसांपर्यंत असू शकतो. Credit Card Tips: क्रेडिट कार्ड वापरुन 'ही' कामं करताय का? आर्थिक संकटात अडकण्यापासून स्वत:ला वाचवा पैसे भरण्याची शेवटची तारीख पेमेंट ड्यु डेट क्रेडिट कार्ड बिल भरण्याची ही शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर केलेल्या पेमेंटवर दोन प्रकारचे शुल्क आकारले जाते. प्रथम, तुम्हाला थकित रकमेवर व्याज द्यावे लागेल आणि उशीरा पेमेंट शुल्क (late fee) भरावे लागेल. मिनिमम अमाऊंट ड्यू ही थकबाकी रकमेची टक्केवारी आहे (अंदाजे 5 टक्के) किंवा सर्वात कमी रक्कम जी विलंब शुल्कावर बचत करण्यासाठी भरावी लागते. टोटल आऊटस्टँडिंग तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दरमहा एकूण थकबाकी भरली पाहिजे. एकूण रकमेत बिलिंग सायकल दरम्यान लागणाऱ्या शुल्कांसह सर्व EMI समाविष्ट आहे. Online Fraud : तुमच्या बँक अकाऊंटमधून बेकायदेशीररित्या पैसे गायब झाल्यास काय कराल? क्रेडिट लिमिट तुम्हाला क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये तीन प्रकारचे लिमिट आढळतील, एकूण क्रेडिट लिमिट, उपलब्ध क्रेडिट लिमिट आणि कॅश लिमिट. ट्रान्जॅक्शन डिटेल्स या सेक्शनमध्ये तुमच्या क्रेडिट कार्ड खात्यात किती पैसे आले आणि किती खर्च झाले याची संपूर्ण माहिती आहे. रिवॉर्ड पॉइंट क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये, तुम्हाला आतापर्यंत जमा झालेल्या रिवॉर्ड पॉइंटची स्थिती दिसेल. येथे तुम्हाला मागील सायकलमधून कमावलेल्या रिवॉर्ड पॉइंट्सची संख्या, सध्याच्या बिलिंग सायकलमध्ये मिळवलेले पॉइंट आणि कालबाह्य झालेले पॉइंट दाखवणारा टेबल दिसेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank, Credit card, Money

    पुढील बातम्या