मराठी बातम्या /बातम्या /मनी /मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताना सुकन्या योजना की PPF? काय आहे फायद्याचं, जाणून घ्या तज्ज्ञांचं म्हणणं

मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताना सुकन्या योजना की PPF? काय आहे फायद्याचं, जाणून घ्या तज्ज्ञांचं म्हणणं

पीपीएफ आणि सुकन्या योजनेमधील आणखी एक मोठा फरक म्हणजे, सुकन्या योजनेमध्ये 10 वर्षांखालील मुलींचंच खातं उघडता येतं. मात्र, पीपीएफ हे 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती खातं उघडू शकते.

पीपीएफ आणि सुकन्या योजनेमधील आणखी एक मोठा फरक म्हणजे, सुकन्या योजनेमध्ये 10 वर्षांखालील मुलींचंच खातं उघडता येतं. मात्र, पीपीएफ हे 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती खातं उघडू शकते.

पीपीएफ आणि सुकन्या योजनेमधील आणखी एक मोठा फरक म्हणजे, सुकन्या योजनेमध्ये 10 वर्षांखालील मुलींचंच खातं उघडता येतं. मात्र, पीपीएफ हे 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती खातं उघडू शकते.

  नवी दिल्ली, 21 जुलै : कोरोना महामारीमुळे सध्या लोक आर्थिक गुंतवणूक, विमा अशा गोष्टींबाबत अधिक जागरुक झाले आहेत. आपल्या मुलांच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी आयुर्विमा हा चांगला पर्याय आहे. पण, त्यांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी बऱ्याच वेळा लोकांना कर्ज काढावं लागतं. ही वेळ येऊ नये यासाठी आर्थिक गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यामधील सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही प्रसिद्ध आहे. मात्र फार कमी लोकांना पीपीएफ (PPF) या पर्यायाबद्दल माहिती आहे. या दोन्ही योजना मुलांच्या भविष्यासाठीची गुंतवणूक करण्याच्या दृष्टिने आहेत. मात्र या दोन्हीपैकी चांगली कोणती?

  सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samridhi Yojana) ही केंद्र सरकारने मुलींसाठी सुरू केलेली बचत योजना आहे. पंतप्रधान मोदींनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजने अंतर्गत ही योजना लाँच केली होती. कमी कालावधीच्या बचत योजनांमध्ये सर्वात चांगला व्याजदर देणारी ही योजना आहे. तर पीपीएफ, म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) ही दीर्घकालीन बचत योजना आहे. या योजनेचा व्याजदरही आकर्षक आहे. सुकन्या योजना ही केवळ मुलींसाठी आहे, तर पीपीएफ ही सर्वांसाठीच आहे. याव्यतिरिक्तही दोन्ही योजनांमध्ये बरेच फरक आहेत. (SSY and PPF difference)

  या दोन्हीही योजना ठराविक कालावधीनंतर करमुक्त रिटर्न्स देतात. सध्या सुकन्या योजनेमध्ये वर्षाला 7.6 टक्के, तर पीपीएफमध्ये 7.1 टक्के व्याज मिळत आहे. हा दर प्रत्येक तिमाहीला काही प्रमाणात बदलतो. सुकन्या योजना ही 21 वर्षांसाठी आहे. यानंतर हे खातं बंद करणं अनिवार्य असतं. पण यामध्ये पैसे केवळ 15 वर्षांपर्यंतच जमा करावे लागतात. पीपीएफमध्येही 15 वर्षांपर्यंतच पैसे जमा करायचे असतात, मात्र त्यानंतरही पाच-पाच वर्षांच्या कालावधीसाठी आपण ही योजना वाढवू शकतो.

  Post Office ची ही योजना ठरेल फायद्याची, कमी गुंतवणुकीतून कसे मिळतील 16 लाख?

  पीपीएफमध्ये तुम्ही एका वर्षामध्ये कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकता. तर, सुकन्या योजनेमध्ये वर्षाला कमीत कमी 250 ते जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात. विशेष म्हणजे, या दोन्ही योजनांमध्ये जमा केलेल्या रकमेवरचं व्याज करमुक्त असतं. पीपीएफचा एक फायदा म्हणजे, त्यातील जमा रकमेवर तुम्ही कर्जही घेऊ शकता. मात्र, सुकन्या योजनेमध्ये तशी सुविधा उपलब्ध नाही.

  गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीपीएफ आणि सुकन्या या दोन्हींपैकी सुकन्या योजनाच जास्त फायदेशीर आहे. सुकन्यामध्ये पीपीएफच्या तुलनेत अधिक व्याज मिळतं. यासोबतच, पीपीएफमध्ये एकाच कुटुंबातील अधिक व्यक्तींचं खातं उघडलं असलं, तरी एकूण मिळून वर्षाला 1.5 लाखांहून अधिक रक्कम जमा करता येत नाही. हेच सुकन्या योजनेमध्ये दोन मुलींची दोन खाती असतील, तर एकूण 3 लाखांपर्यंत रक्कम जमा करता येते. मात्र, 1.5 लाखांपेक्षा अधिकच्या रकमेवर कर लागू होतो.

  पीपीएफचा एक फायदा असाही आहे, की पाच वर्षांच्या कालावधीनंतर ती योजना कधीही बंद करता येते. सुकन्या योजना बंद करण्यासाठी मात्र, मुलीने वयाची 18 वर्षे पूर्ण करणं किंवा हायस्कूल शिक्षण पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही हवं तर 50 टक्के रक्कमही काढून घेऊ शकता.

  Gold Jewellery बाबतचा हा निर्णय होणार रद्द? वाचा काय आहे सरकारचं स्पष्टीकरण

  पीपीएफ आणि सुकन्या योजनेमधील आणखी एक मोठा फरक म्हणजे, सुकन्या योजनेमध्ये 10 वर्षांखालील मुलींचंच खातं उघडता येतं. मात्र, पीपीएफ हे 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती खातं उघडू शकते. तसंच, पीपीएफमध्ये कोणालाही नॉमिनी बनवता येतं. मात्र, सुकन्यामध्ये ही सुविधा उपलब्ध नाही.

  या दोन्ही योजनांमधील सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे, सुकन्यामध्ये आपल्याला केवळ 15 वर्षांपर्यंतच पैसे भरायचे असतात. तरीही 21 वर्षांपर्यंतचं व्याज मिळत राहतं. मात्र पीपीएफ जर 21 वर्षांपर्यंत सुरू ठेवायचा असेल, तर तेवढ्या कालावधीपर्यंत दरमहा रक्कम जमा करणं आवश्यक आहे. म्हणजेच, 21 वर्षांच्या कालावधीमध्ये पीपीएफमधून आपल्याला जास्त रक्कम मिळणार असली, तरी त्यासाठी आपण जमा केलेली रक्कमही अधिक असणार आहे. त्या तुलनेत कमी रक्कम जमा करुन सुकन्या योजनेतून आपल्याला अधिक फायदा होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी मुलींच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी त्यांच्या लहानपणापासूनच बचत करायची असेल, तर सुकन्या योजनाच उत्तम आहे असं म्हणता येईल.

  First published:
  top videos

   Tags: Money, Savings and investments