Home /News /money /

अनावश्यक खर्चामुळे होत नाहीये बचत? 3 Day Rule करा फॉलो, सेव्ह होईल मोठा फंड

अनावश्यक खर्चामुळे होत नाहीये बचत? 3 Day Rule करा फॉलो, सेव्ह होईल मोठा फंड

वायफळ खर्च टाळून बचत करण्यासाठी ब्रिटनमधल्या एका महिलेला 'थ्री डे रूल' (3 Day Rule) उपयोगी ठरला. या रूलचा वापर करून आपण दर महिन्याला तब्बल तीनशे पौंड एवढी बचत (Saving Money) केल्याचं तिचं म्हणणं आहे.

मुंबई, 21 जानेवारी: आपण कमावलेल्या पैशांची खूप बचत (Saving Money) व्हावी, वायफळ खर्च होऊ नये, असं सर्वांनाच वाटतं. कोणी नवा फोन घेण्यासाठी, कोणी गाडी घेण्यासाठी, तर कोणी घर घेण्यासाठी पैसे उभे करण्याकरिता बचत करत असतं; मात्र कित्येक वेळा खर्चच एवढा होतो, की बचतीसाठी पैसेच शिल्लक राहत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बचत व्हायला हवी असेल, तर खर्च कमी करणं हा महत्त्वाचा पर्याय आहे. खर्च कमी करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने आणि पद्धतीने प्रयत्न करत असतो. वायफळ खर्च टाळून बचत करण्यासाठी ब्रिटनमधल्या एका महिलेला 'थ्री डे रूल' (3 Day Rule) उपयोगी ठरला. या रूलचा वापर करून आपण दर महिन्याला तब्बल तीनशे पौंड एवढी बचत (Saving Money) केल्याचं तिचं म्हणणं आहे. ब्रिटनमधल्या (UK) वेल्स (Wales) इथल्या स्वान्झी (Swansea) परिसरात राहणाऱ्या अॅनी ले या 24 वर्षांच्या महिलेने वायफळ खर्च (Expenses) टाळण्यासाठी हा फंडा वापरला आहे. House Deposit साठी बचत करण्याचं ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तिने हा थ्री डे रूल अवलंबला होता. आपल्याला एखादी वस्तू खूप आवडते आणि आपण ती लगेच विकत घेऊन मोकळे होतो; पण नंतर लक्षात येतं, की या वस्तूची आपल्याला गरजच नव्हती. असंच काहीसं अॅनीच्या बाबतीतही व्हायचं. मग तिनं यावर तोडगा काढला. तो तोडगा म्हणजेच थ्री डे रूल फॉलो करणं. मिररने याबाबत वृत्त दिलं आहे. हे वाचा-ICICI बँकेने बदलले एफडीचे व्याजदर, कोणत्या योजनेचे व्याजदर किती? थ्री डे रूलचा अर्थ समजावून घेऊ या. तुम्हाला एखादी वस्तू खूपच आवडली असेल, पण तुम्हाला त्या वस्तूची लगेच गरज नाही आहे, असं वाटत असेल, तर अशा वस्तूचा फोटो किंवा स्क्रीनशॉट फोनमध्ये ठेवायचा. त्यानंतर तीन दिवस थांबायचं. तीन दिवसांनंतरही तुम्हाला त्या वस्तूची गरज वाटत असेल, तरच ती विकत घ्यायची, असा तो नियम आहे. अनेकदा असं होतं, की आपल्याला एखाद्या वस्तूची अजिबात गरज नसते; पण दुकानात गेल्यावर तिथल्या सेल्समनच्या बोलण्यात आपण अडकतो आणि गरज नसलेल्या वस्तूंवर पैसे खर्च करून त्या घरी घेऊन येतो. ऑनलाइन मार्केटिंगच्या (Marketing) जाळ्यातही अनेक जण अडकतात. सोशल मीडिया साइट्सवरही अनेक वस्तूंची जाहिरात केली जाते. त्यातूनही अनेकांना मोह होतो. यासाठीच अॅनी सांगते, की आपण सामान खरेदी करण्यासाठी बाहेर जाताना एक यादी बनवली पाहिजे आणि त्या यादीनुसारच आपली खरेदी केली पाहिजे. हा थ्री डे रूल पाळण्यासाठी ही यादी आणि मनाचा पक्का निर्धारच उपयोगी ठरेल. ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) करत असताना प्रोमो कोड्स, डिस्काउंट कोड्स (Discount Codes) यांचा नीट वापर केला तरी खूप बचत होऊ शकते. हे वाचा-PNB Insta Loan: झटपट मिळवा 8 लाखांचं कर्ज, बँक देतेय संधी;हे शुल्क देखील आहे माफ हा थ्री डे रूल आपल्या मनावरचा ताबा ढळू न देण्यास मदत करतो. या तीन दिवसात तुम्ही सारासार विचार करून (Thinking about Purchase) त्या वस्तूची आपल्याला खरंच गरज आहे का याचा विचार करू शकतो. ती वस्तू एकदा वापरल्यानंतर पुन्हा अडगळीच्या खोलीत जाऊन पडणार आहे का, याचा अंदाज तुम्हाला या तीन दिवसांत येऊ शकतो. त्यावरून तुम्ही निर्णय घेऊ शकता. एकदा का तो निर्णय झाला की तुम्ही वायफळ खर्च करून गरजेच्या नसलेल्या वस्तू विकत घेण्यापासून स्वतःला रोखू शकता. अॅनी वापरत असलेला हा थ्री डे रूल वायफळ खर्च होणारे पैसे वाचवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.
First published:

Tags: Money, Savings and investments

पुढील बातम्या