Home /News /money /

चेक बाऊन्स झाल्यास काय नुकसान होतं? शिक्षेचीही तरतूद; काय आहेत नियम?

चेक बाऊन्स झाल्यास काय नुकसान होतं? शिक्षेचीही तरतूद; काय आहेत नियम?

चेक बाऊन्स होण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु मुख्य कारण म्हणजे खात्यात पुरेसे पैसे नसणे. आम्ही तुम्हाला सांगतो की चेकवरील सहीमध्ये फरक असला तरीही तो बाऊन्स होतो.

    मुंबई, 16 डिसेंबर : बँकेच व्यवहार (Bank Transaction) करताना काळजी घेणे गरजेचे असते. एक गोष्ट आहे जी लोकांना थोडी कमी माहिती आहे ती म्हणजे चेक बाऊन्स (Cheque Bounce) झाल्यास किंवा नाकारल्यास लोकांना दंड भरावा लागतो आणि त्याचा परिणाम CIBIL रेकॉर्डवर देखील होऊ शकतो. त्याहूनही गंभीर प्रकरणांमध्ये शिक्षेची तरतूद आहे. चेक बाऊन्स झाल्यास किती दंड आकारला जाऊ शकतो याची माहिती घेऊया. जेव्हा कुणी पैसे भरण्यासाठी बँकेला चेक देतो आणि खात्यात (Bank Account) पैसे नसल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे तो नाकारला गेला तर त्याला चेक बाऊन्स म्हणतात. याची अनेक कारणे असू शकतात, परंतु मुख्य कारण म्हणजे खात्यात पुरेसे पैसे नसणे. आम्ही तुम्हाला सांगतो की चेकवरील सहीमध्ये (Signature on Cheque) फरक असला तरीही तो बाऊन्स होतो. चेक बाऊन्स झाला तर किती दंड आहे? चेक बाऊन्स झाल्यास खात्यातून दंड (Cheque Bounce Fined) म्हणून रक्कम कापली जाते. चेक बाऊन्स झाल्यावर, तुम्हाला कर्जदाराला कळवावे लागेल आणि त्या व्यक्तीने तुम्हाला एका महिन्यात पैसे द्यावे लागतील. जर एक महिन्याच्या आत पैसे भरले नाहीत तर त्याला कायदेशीर नोटीस पाठवली जाऊ शकते. त्यानंतरही त्यांनी 15 दिवस कोणतेही उत्तर न दिल्यास Negotiable Instrument Act 1881 च्या कलम 138 अन्वये गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. FD Credit Card: फिक्स्ड डिपॉझिटवरही घ्या क्रेडिट कार्ड; प्रोसेस पाहा, तुमचं काम होईल सोपं चेक बाऊन्स झाल्यास दोन वर्षांच्या कारावासाची तरतूद चेक बाऊन्स होणे हा दंडनीय गुन्हा असून त्यासाठी कलम 138 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. दंड किंवा दोन वर्षे कारावास किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. चेक बाऊन्स झाल्यास, कर्जदाराला 2 वर्षांचा कारावास आणि व्याजासह रक्कम भरावी लागेल. तुमच्या निवासस्थानी गुन्हा नोंदवला जाईल. तुमचा पगार 15 हजारहून कमी असेल तर लगेच इथे रजिस्ट्रेशन करा; 'या' योजनेचा फायदा मिळेल ICICI बँकेचा चेक बाऊन्स झाल्यास किती दंड ग्राहकाने जारी केलेल्या चेकवर 350 रुपये, आर्थिक कारणांमुळे धनादेश एकाच महिन्यात दोनदा परत केल्यास 750 रुपये दंडाची तरतूद आहे. स्वाक्षरी पडताळणी व्यतिरिक्त एखादे कारण असल्यास आणि आर्थिक कारणांमुळे धनादेश परत आल्यास 50 रुपये आकारले जातील.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank, Money

    पुढील बातम्या