10 वर्ष बँकेत पडून राहिलेल्या पैशांचं काय होतं?

10 वर्ष बँकेत पडून राहिलेल्या पैशांचं काय होतं?

Unclaimed Money, Bank, Savings - अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितलं की बँक आणि विमा कंपनींमध्ये कोणीही दावा न केलेली रक्कम 32,455 कोटी रुपये आहे

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितलं की बँक आणि विमा कंपनींमध्ये कोणीही दावा न केलेली रक्कम 32,455 कोटी रुपये आहे. बँकांमध्ये अनक्लेम्ड डिपाॅझिटमध्ये गेल्या वर्षी 26.8 टक्के वाढ झालीय. ही रक्कम 14, 578 कोटीपर्यंत पोचलीय. म्हणून आम्ही तुम्हाला बँकांच्या नियमांबद्दल सांगतो.लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या काळात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

बँक खात्यांचा 10 वर्षात उपयोग केला नाही

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितलं  की बँकेतल्या या दावेदार नसलेल्या पैशांना पाहून आरबीआयनं डिपाॅझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड ( DEAF ) योजना सुरू केलीय.

बापरे, 1000 लोकांना कामावरून काढून टाकणार ही टेलिकाॅम कंपनी

यात 10 वर्ष बँकेत पडून असलेली अनक्लेम्ड रक्कम तिच्यावरच्या व्याजासकट डीईएएफमध्ये टाकली जाईल.

ग्राहकानं दावा केला तर

कुठलाही ग्राहक पैशावर दावा करत असेल तर बँक व्याजासकट त्याला पैसे देईल. अशा वेळी बँक डीईएएफकडे रिफंडचा दावा करते.

दर महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे असतील तर सुरू करा 'हा' व्यवसाय

अर्थमंत्री सीतारामण यांनी सांगितलं, डीईएएफमध्ये ट्रान्सफर केलेल्या पैशांवर 4 टक्के व्याज होतं. 1 जुलै 2019पासून ते 3.5 टक्के केलं गेलं. यातल्या जमा असलेल्या रकमेचा उपयोग ग्राहकांसाठीच केला जातो. त्यांच्या उपयोगी गोष्टी केल्या जातात.

काय आहे कायदा?

बँकिंग रेग्युलेशन कायदा 1949 प्रमाणे आरबीआयनं डिपाॅझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड ( DEAF ) योजना  2014 तयार केली. यात बँक 10 वर्ष कुणीही दावा न केलेली रक्कम तिच्या व्याजासहित इथे ट्रान्सफर करते. त्याचा उपयोग व्याजासाठी केला जातो.

LIC कडे तुमचे पैसे पडून तर नाहीत? घरबसल्या करा चेक

इन्शुरन्स क्षेत्रात सप्टेंबर 2018पर्यंत लाइफ इन्शुरन्स क्षेत्रात 16887.66 कोटी रुपये अनक्लेम्ड होते. तर नाॅन लाइफ इन्शुरन्स क्षेत्रात ही रक्कम 989.62 कोटी रुपये आहे.

IRDAI नं एक पत्रक जारी केलं होतं. यात सर्व विमा कंपन्यांना आदेश दिले होते की , 30 सप्टेंबर 2017 पर्यंत 10 वर्षांपेक्षा जास्त काळात पाॅलिसीधारकांनी दावा न केलेली रक्कम वरिष्ठ नागरिक कल्याण कोषात भरावी. हे काम मार्च 2018पर्यंत करायचे आदेश होते.

यळकोट यळकोट जय मल्हार! वारीतील जेजुरीगडाचं महत्त्व सांगणारा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2019 04:50 PM IST

ताज्या बातम्या