मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Share Market Crash : शेअर बाजारातील घसरणीचं नेमकं कारण काय? कोणते घटक ठरले कारणीभूत?

Share Market Crash : शेअर बाजारातील घसरणीचं नेमकं कारण काय? कोणते घटक ठरले कारणीभूत?

Sensex दुपारी 3.12 टक्क्यांच्या घसरणीनंतर 1778 अंकांनी घसरून 55,256 अंकावर ट्रेड करताना दिसला. सेन्सेक्समध्ये नोंदवलेले सर्व शेअर लाल चिन्हात ट्रेड करत होते. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टी (NIFTY 50) देखील 526 अंकांनी घसरून 16,459 च्या पातळीवर ट्रेड करताना दिसला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 20 डिसेंबर : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी बाजार घसरणीसह (Share Market Fall) खुला झाला. निफ्टी 16,500 च्या खाली घसरला आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स 1000 अंकांच्या घसरणीसह 56000 च्या खाली ट्रेड करताना दिसला. Cipla, Asian Paints, TCS आणि Powergrid Corp हे निफ्टीमध्ये टॉप गेनर आहेत, तर Tata Motors, IndusInd Bank, BPCL, Bajaj Finserv and SBI टॉप लूजर्स ठरले.

Sensex दुपारी 3.12 टक्क्यांच्या घसरणीनंतर 1778 अंकांनी घसरून 55,256 अंकावर ट्रेड करताना दिसला. सेन्सेक्समध्ये नोंदवलेले सर्व शेअर लाल चिन्हात ट्रेड करत होते. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टी (NIFTY 50) देखील 526 अंकांनी घसरून 16,459 च्या पातळीवर ट्रेड करताना दिसला.

निफ्टी मिडकॅप 100 3.1 अंकांनी आणि निफ्टी स्मॉलकॅप 250 3 टक्क्यांनी घसरल्याने बाजारावर मोठा परिणाम झाला. वोलॅटिटी इंडेक्स (volatility index) इंडिया VIX ने आज 10 टक्क्यांनी झेप घेत 18.02 च्या पातळीवर पोहोचला.

आयटीसह सर्वच क्षेत्र आज लाल रंगात दिसत आहेत. निफ्टी आयटी, शुक्रवारी हिरव्या रंगात होता, त्यातही आज पडझड पाहायला मिळाली. Metal, Real Estate आणि Finance शेअर बेंचमार्क इंडेक्स खाली खेचत होते. निफ्टी बँक 2.7 टक्के, निफ्टी रियल्टी 2.8 टक्के आणि मेटल इंडेक्स 3 टक्क्यांनी घसरला.

Mutual Fund मधून पैसे काढताना या गोष्टी लक्षात ठेवा, मेहनतीच्या पैशांचं नुकसान होणार नाही

कोणत्या घटकांमुळे बाजाराला फटका

Omicron ची चिंता

ओमिक्रॉन हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोना विषाणूचा नवीन वेरिएंट ओमिक्रॉन भारतासह जगातील 89 देशांमध्ये पसरला आहे. भारतात आतापर्यंत 143 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ओमिक्रॉन ही अर्थव्यवस्था आणि बाजार या दोन्हींसाठी मोठा धोका आहे. जागतिक अर्थव्यवस्था सामान्य झाल्यानंतर अवघ्या वर्षभरात आणखी एका कडक लॉकडाऊनची शक्यता आर्थिक रिकव्हरीला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवू शकते. नेदरलँडने लॉकडाउन लागू केले आहे. यूकेने आधीच प्रवासी निर्बंध लादले असताना आणि जर्मनी आणि ऑस्ट्रियासारखे देश त्यांच्या कोरोना लाटांमधून बरे होत आहेत.

ग्लोबल स्पिलऑफ (जगभरातील बाजारात घसरण)

वॉल स्ट्रीट शुक्रवारी खालच्या पातळीवर बंद झाला तर सर्व तीन प्रमुख यूएस निर्देशांक बुधवारी घसरणीसह बंद झाले. महागाईशी लढण्यासाठी फेडने 2022 च्या अखेरीस तीन वेळा व्याजदर वाढवण्याचे संकेत दिल्यानंतर पडझड पाहायला मिळाली. तर 20 डिसेंबर रोजी, आशियाई निर्देशांक घसरले आणि ओमिक्रॉनच्या चिंतेवर युरोपमध्ये कडक निर्बंधांमुळे तेलाच्या किमती घसरल्या.

केंद्रीय बँकांचे धोरण कडक (Central banks Policy)

जागतिक स्तरावर मध्यवर्ती बँकांच्या कठोर भूमिकेचा आशियातील इक्विटी बाजारांवरही परिणाम झाला आहे. फेडने महामारीच्या काळात प्रोत्साहन देण्याच्या आपल्या भूमिकेपासून मागे हटण्याचा मानस व्यक्त केल्यानंतर महागाईशी लढण्यासाठी अनेक केंद्रीय बँकांनी आपापल्या देशांत दर वाढवले ​​आहेत.

कोविड-19 महामारी सुरू झाल्यापासून बँक ऑफ इंग्लंड गुरुवारी व्याजदर वाढवणारी पहिली प्रमुख केंद्रीय बँक बनली. नॉर्वेने यावर्षी 16 डिसेंबर रोजी कोविड निर्बंधांचा विस्तार करूनही दुसऱ्यांदा दर वाढवले, तर रशियाने 17 डिसेंबर रोजी यावर्षी सातव्यांदा आपले धोरण दर वाढवले. न्यूझीलंडनेही गेल्या महिन्यात आपला व्याजदर वाढवला आहे आणि कॅनडाने लवकरच दर वाढवण्याची सूचना केली आहे.

Investment Tips: 29 रुपयांच्या स्टॉकमध्ये कमाईची संधी, तीन महिन्यात 45 टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता

FII ची सतत विक्री

विकसित बाजारपेठेतील मध्यवर्ती बँकांनी धोरणे कडक केल्याने भारत आणि इतर उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये FII द्वारे अखंड आणि सतत विक्री झाली आहे. केवळ डिसेंबर महिन्यातच, FII ने रोख बाजारात 26,000 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली, जी या वर्षातील एका महिन्यात केलेली सर्वाधिक विक्री आहे. 17 डिसेंबर रोजी त्यांनी रोख बाजारात 2,069 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली.

First published:

Tags: Investment, Money, Share market