मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Income Tax: ITR मुदतीत न भरल्यास काय होतात परिणाम? वेळेत भसल्यास काही फायदेही होतात

Income Tax: ITR मुदतीत न भरल्यास काय होतात परिणाम? वेळेत भसल्यास काही फायदेही होतात

ITR म्हणजे एका आर्थिक वर्षातलं तुमचं उत्पन्न (Annual Income) आणि तुम्ही भरत असलेले कर याबद्दलची माहिती असणारी महत्त्वाची कागदपत्रं असतात. निर्धारित तारखेनंतर ITR भरला तर त्याला उशिरा भरलेला रिटर्न (Belated Return) असं म्हटलं जातं.

ITR म्हणजे एका आर्थिक वर्षातलं तुमचं उत्पन्न (Annual Income) आणि तुम्ही भरत असलेले कर याबद्दलची माहिती असणारी महत्त्वाची कागदपत्रं असतात. निर्धारित तारखेनंतर ITR भरला तर त्याला उशिरा भरलेला रिटर्न (Belated Return) असं म्हटलं जातं.

ITR म्हणजे एका आर्थिक वर्षातलं तुमचं उत्पन्न (Annual Income) आणि तुम्ही भरत असलेले कर याबद्दलची माहिती असणारी महत्त्वाची कागदपत्रं असतात. निर्धारित तारखेनंतर ITR भरला तर त्याला उशिरा भरलेला रिटर्न (Belated Return) असं म्हटलं जातं.

पुढे वाचा ...
>> आदिल शेट्टी, सीईओ, बँकबाझार 2021-22 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 होती. तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर ITR भरणं बंधनकारक असतं. दिलेल्या मुदतीपर्यंत इन्क टॅक्स रिटर्न (ITR) भरला नाही तर टॅक्स डिपार्टमेंटचं (Tax Dept.) तुमच्याकडे लक्ष वेधलं जाऊ शकतं. काही वेळा ही मुदत वाढू शकते. गेली दोन आर्थिक वर्षं सरकारनं ही मुदत वाढवली होती. कोरोनामुळे अनेक आव्हानं उभी राहिली होती. त्यामुळे करदात्यांना दिलासा देण्यासाठी या मुदतीत वाढ करण्यात आली होती; मात्र नेहमी मुदत वाढेलच या भरवशावर राहण्यात अर्थ नाही. दंड टाळण्यासाठी, (To Avoid Penalty) तसंच न भरलेल्या करावरचं व्याज टाळण्यासाठी किंवा कायदेशीर सुरक्षिततेच्या (Legal Security) दृष्टीने अंतिम तारखेआधी ITR भरणं कधीही चांगलं. ITR म्हणजे एका आर्थिक वर्षातलं तुमचं उत्पन्न (Annual Income) आणि तुम्ही भरत असलेले कर याबद्दलची माहिती असणारी महत्त्वाची कागदपत्रं असतात. निर्धारित तारखेनंतर ITR भरला तर त्याला उशिरा भरलेला रिटर्न (Belated Return) असं म्हटलं जातं. तुम्ही ठरलेल्या तारखेआधी रिटर्न भरला नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे. दंड भरावा लागू शकतो (Penalty) वेळेवर कर परतावा भरणं हा करशिस्तीचा (Tax Compliant) एक भाग आहे. काही अपरिहार्य कारणामुळे तुमची ही डेडलाइन चुकली तरी तुम्ही 31 डिसेंबर 2022 पर्यंत तुमचा रिटर्न भरू शकता. त्या वेळी तुम्हाला दंडही (Penalty) भरावा लागू शकतो. तुमचं उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर 1 हजार रुपये आणि तुमचं उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर 5000 रुपये दंड भरावा लागतो. त्याशिवाय कलम 234F या अंतर्गत 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये कोणत्याही करपात्र उत्पन्नावर (Taxable Income) न भरलेल्या कराचं व्याजही (Interest On Unpaid Tax) भरणं आवश्यक आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल आणि तुम्ही तुमच्या काही कागदपत्रांसाठी म्हणून रिटर्न भरत असाल तर तुम्हाला कोणताही दंड लावला जात नाही. व्याज निर्धारित तारखेनंतर रिटर्न भरला तर जितकी थकबाकीची रक्कम आहे त्याच्या 1% व्याज भरावं लागेल हे लक्षात ठेवा. 31 जुलैपासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने (Retrospectively) ही थकबाकीची रक्कम व्याजासह तुम्हाला भरावी लागते. ज्या दिवशी (Deadline) अंतिम तारीख संपते त्या दिवसापासूनचं व्याज मोजलं जातं. त्यामुळे तुम्ही रिटर्न भरायला जितका उशीर कराल तितकी व्याजाची जास्त रक्कम तुम्हाला भरावी लागेल. त्यामुळे वेळेवर रिटर्न फाइल करणंच उत्तम. इन्कम टॅक्स रिटर्न भरायला उशीर केलात, तर टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला कायदेशीर नोटीस (Legal Notice) पाठवू शकतं. तुम्हाला तुमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही कायदेशीर नोटीस पाठवली जाते. तुम्ही दिलेल्या स्पष्टीकरणावर टॅक्स डिपार्टमेंटचं समाधान झालं नाही, तर हे प्रकरण कायदेशीर अधिकाऱ्यांकडे पाठवलं जातं. वेळेवर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे काही फायदे आहेत. वेळेवर रिटर्न भरला नाही तर हे फायदे तुम्हाला मिळत नाहीत. अगदी नजिकच्या भविष्यकाळात कर्ज घेण्याचं नियोजन करत असाल तर त्यासाठी आधीच्या वर्षाच्या ITR वरून तुमच्या उत्पन्नाची पडताळणी केली जाते. यावरून तुम्ही कर्जाची परतफेड (Repayment Of Loan) करू शकाल की नाही हे बँका ठरवतात. वेळेवर रिटर्न भरल्याने तुमच्या आर्थिक वर्षातलं नुकसान जाहीर करता येऊ शकतं. रिटर्न भरताना, तुम्ही एक तर या नुकसानाबद्दल सवलत देण्यासाठी दावा करू शकता किंवा पुढच्या आर्थिक वर्षापर्यंत पुढे नेऊ शकता. त्याशिवाय परदेशात जाण्याचा व्हिसा मिळवण्यासाठीही विविध देशांच्या कॉन्सुलेट (Consulate) ITR स्टेटमेंटच्या आधारेच तुमचं उत्पन्न आणि नोकरीबद्दलची पडताळणी करतात. त्यावरूनच तुम्हाला व्हिसा (Visa) दिला जातो. त्यामुळे तुम्हाला करपरतावा मिळण्यासही मदत होऊ शकते. त्यामुळे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलं, तरीही हे सगळे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही वेळेवर ITR भरणं गरजेचं आहे.
First published:

Tags: Income tax, Money, Tax

पुढील बातम्या