मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दिवाळीत दागिन्यांपेक्षा सोन्या-चांदीचं नाणं खरेदी करणं अधिक फायदेशीर

दिवाळीत दागिन्यांपेक्षा सोन्या-चांदीचं नाणं खरेदी करणं अधिक फायदेशीर

दिवाळीत सोनं-चांदी खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. पण यावेळी सोन्या-चांदीच्या दागिन्यांपेक्षा सोनं आणि चांदीच्या नाण्यांची मोठी खरेदी केली जाते. दागिन्यांपेक्षा नाण्याची खरेदी करणं अधिक फायदेशीर मानलं जातं.

  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : दिवाळी  (Diwali) सणाला धनत्रयोदशीपासून अनेक जण सोन्या-चांदीची (Gold- Silver) खरेदी करतात. यादिवासात सोनं-चांदी खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. पण यावेळी सोन्या-चांदीच्या दागिन्यांपेक्षा सोनं आणि चांदीच्या नाण्यांची मोठी खरेदी केली जाते. दागिन्यांपेक्षा नाण्याची खरेदी करणं अधिक फायदेशीर मानलं जातं.

सोन्या-चांदीच्या नाण्यांची मोठी खरेदी -

सोन्या-चांदीचे रिटेल व्यापारी रवि वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सर्वाधिक मागणी सोन्या-चांदीच्या नाण्यांना असते. चांदीमध्ये 1000 हजार रुपयापासून एका शिक्यांची किंमत सुरू होते.

1 किलो चांदीची लक्ष्मी-गणपती मूर्ती -

बाजारात 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम चांदीपासून बनलेल्या लक्ष्मी-गणपतीच्या मूर्ती असतात. त्याशिवाय 1 किलो ते 8 किलोपर्यंतच्या ही मूर्ती आहेत. परंतु 1 ते 8 किलोसाठी ग्राहकांची संख्या कमी असते. 200 ग्रॅम ते 500 ग्रॅमपर्यंत लक्ष्मी-गणपती मूर्ती घेण्याकडे ग्राहकांचा मोठा कल असतो. या दिवसांत सोन्या-चांदीचे दिवेही खरेदी केले जातात.

दागिन्यांपेक्षा सोन्या-चांदीचे शिक्के खरेदी करणं कसं फायद्याचं?

मेकिंग चार्ज -

सोन्याचे दागिने खरेदी केल्यास त्यावर मेकिंग चार्ज द्यावा लागतो. ज्यावेळी हेच दागिने विकले किंवा एक्सचेंज केले जातात, त्यावेळी मात्र मेकिंग चार्जची अमाउंट परत मिळत नाही. त्यामुळे सेव्हिंगसाठी खरेदी करत असाल, तर दागिन्यांपेक्षा सोन्याचं नाणं घेणं जास्त फायद्याचं आहे.

नाण्यापासून दागिने -

जर सोन्याच्या नाण्यापासून कोणतेही दागिने बनवायचे असल्यास, यावेळी मेकिंग चार्जवेळी केवळ सोन्याची किंमत मिळेल. जर तुमच्याकडे शिक्का असेल, तर कोणत्याही नुकसानाशिवाय यापासून दागिने बनवू शकता.

गुंतवणूकीसाठी फायद्याचा सौदा -

गुंतवणूकीमध्ये पैसे प्रॉफिट कमवण्यासाठीच लावला जावा. जर सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास, ते विकताना मेकिंग चार्जचं नुकसान होतं. पण जर सोन्याच्या नाण्यात गुंतवणूक केली, तर भविष्यात सोन्याच्या किंमती वाढल्यानंतर ते विकताना कोणत्याही नुकसानाशिवाय अधिक किंमत मिळेल. सुरक्षेच्यादृष्टीनेही शिक्का फायदेशीर आहे.

First published:

Tags: Gold, Gold and silver prices today