मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Income Protection Planने तुमच्या कुटुंबियांचा आर्थिक आधार द्या; संकटात उत्पन्नाची गॅरंटी

Income Protection Planने तुमच्या कुटुंबियांचा आर्थिक आधार द्या; संकटात उत्पन्नाची गॅरंटी

इन्कम प्रोटेक्शन प्लॅन अंतर्गत, पॉलिसीधारकाच्या अनुपस्थितीत, त्याच्या कुटुंबाला त्यांच्या उदरनिर्वाहासाठी इतर कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही आणि कुटुंबाला नियमितपणे उत्पन्न मिळत राहील.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 9 ऑगस्ट : कोरोना महामहारीत अनेकांची घरातील कमावते लोक दगावले. यामुळे अनेकांची संसार उद्ध्वस्त झाले. कोरोनाने आपल्या हे शिकवलं की संकट कधीही येऊ शकतं. त्यासाठी तयार राहणे हा एकमेव पर्याय आपल्याकडे आहे. अशा संकटाच्या काळात टिकून राहायचं असेल तर भविष्याचं नियोजन योग्य प्रकार केलं पाहिजे. जर एका व्यक्तीच्या उत्पन्नावर संपूर्ण घर अवलंबून असेल, तर त्याच्या अनुपस्थितीत कुटुंबाला मोठ्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत या व्यक्तीच्या अनिपस्थितीत नियमितपणे उत्पन्न मिळत राहावे यासाठी आधीच त्याचं नियोजन केले पाहिजेय. सॅलरी पोटेक्शन प्लॅन किंवा इनकम प्रोटेक्शन प्लॅनअंतर्गत हे सहज करता येते. ही योजना खरेदी केल्यानंतर भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडली तरीही कुटुंबाला नियमित अंतराने उत्पन्न मिळत राहील. इन्कम प्रोटेक्शन प्लॅन ही मुदत विमा योजना आहे. इन्कम प्रोटेक्शन प्लॅन अंतर्गत, पॉलिसीधारकाच्या अनुपस्थितीत, त्याच्या कुटुंबाला त्यांच्या उदरनिर्वाहासाठी इतर कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही आणि कुटुंबाला नियमितपणे उत्पन्न मिळत राहील. यामुळे मुलांचे शिक्षण आणि लग्न, आर्थिक योजनेत योगदान, कर्जाचे हप्ते आणि नवीन व्यवसाय यासाठी पैशांची कमतरता भासणार नाही. याशिवाय, महागाईनुसार पगार वाढल्याने नॉमिनीला मिळणारे फायदेही वाढतात. जर तुम्ही याचा पर्याय निवडला तर नॉमिनीलाही वाढत्या महागाईचा सामना करण्यास मदत होते. सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता घरबसल्या अ‍ॅपद्वारे तपासा, तुमच्या मोबाईलमध्ये आहे का 'हे' अ‍ॅप? इन्कम प्रोटेक्शन प्लॅन समजून घ्या इन्कम प्रोटेक्शन प्लॅन अंतर्गत कोणते फायदे मिळतील, ते कंपनीनुसार बदलू शकतात. जवळजवळ प्रत्येकाच्या योजनेची मूळ कल्पना सारखीच असली तरी, कोणतीही अनुचित घटना घडल्यास पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत कशी करावी. ते कसे कार्य करते ते उदाहरणासह समजून घेऊ. बघतच राहावं असा स्मार्टफोन, चार्जरपासून फोनपर्यंत सर्वकाही पारदर्शक; जाणून घ्या वैशिष्ट्यं समजा, वयाच्या 35 व्या वर्षी, एखाद्या व्यक्तीने विमा कंपनीकडून एक योजना खरेदी केली ज्याची प्रीमियम भरण्याची मुदत सात वर्षे आहे, पॉलिसीची मुदत 15 वर्षे आहे आणि त्याने भरलेल्या प्रीमियमच्या 110% हमी परताव्याची निवड केली आहे आणि वार्षिक जवळपास 7 हजार रुपये प्रीमियम भरत आहे. आता जर पॉलिसीच्या चौथ्या वर्षी त्याचा मृत्यू झाला, तर नॉमिनीला वर्षाला सुमारे 33.7 हजार रुपये म्हणजे दरमहा सुमारे 2800 रुपये मिळतील. हे पैसे सुमारे 10 वर्षांसाठी उपलब्ध असतील.
First published:

Tags: Investment, Money

पुढील बातम्या