मराठी बातम्या /बातम्या /मनी /

मुदतपूर्व कसं फेडायचं गृह आणि वैयक्तिक कर्ज? जाणून घ्या याचे आर्थिक फायदे

मुदतपूर्व कसं फेडायचं गृह आणि वैयक्तिक कर्ज? जाणून घ्या याचे आर्थिक फायदे

तुम्ही जर लवकरात लवकर कर्ज (loan) फेडलं तर आनंदात आणि तणावाशिवाय जगू शकता. आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचं कर्ज लवकरात लवकर फेडू शकता.

तुम्ही जर लवकरात लवकर कर्ज (loan) फेडलं तर आनंदात आणि तणावाशिवाय जगू शकता. आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचं कर्ज लवकरात लवकर फेडू शकता.

तुम्ही जर लवकरात लवकर कर्ज (loan) फेडलं तर आनंदात आणि तणावाशिवाय जगू शकता. आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचं कर्ज लवकरात लवकर फेडू शकता.

नवी दिल्ली 08 मे : लोन (loan) म्हणजेच कर्ज. अनेकांना आपल्या जीवनातील आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यास कर्ज घ्यावं लागतं. घर खरेदीसाठी, शिक्षणासाठी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी याशिवाय आणखी बऱ्याच कामांसाठी लोन मिळतं. मात्र, घेतलेलं कर्जवेळेवर फेडणं ही आपली नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. आर्थिक आरोग्याच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचं आहे. कारण, तुम्ही जर लवकरात लवकर कर्ज फेडलं तर आनंदात तणावाशिवाय जगू शकता. आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचं कर्ज लवकरात लवकर फेडू शकता.

जर तुम्ही वैयक्तिक कर्ज (personal loan) घेतलंय आणि ते वेळेआधी फेडायचं असेल तर जाणून घ्या त्यासाठीचे पर्याय -

वेळेआधी कर्ज फेडण्याचे फायदे

1.व्याजाचं ओझं कमी राहील.

2.पूर्णपणे कर्जातून मुक्त होण्यास मदत करेल.

3.लोन घेऊन दुसरी गुंतवणूक करण्यात मदत होईल

पर्सनल लोन फेडण्याचे 3 पर्याय -

1. रेग्युलर क्लोजर (Regular Closure)

2. प्री क्लोजर किंवा फोर क्लोजर (Preclosure/Foreclosure)

3. पार्ट पेमेंट (Part payment)

रेग्युलर क्लोजर (Regular Closure) कसं करायचं?

रेग्युलर क्लोजर म्हणजे दिलेल्या मुदतीत कर्ज फेडणं. तुम्ही बँकेने दिलेल्या मुदतीत एकही हप्ता न चुकवता कर्ज फेडलं असेल तर एकदा बँकेसोबत झालेले अॅग्रीमेंट नीट वाचून घ्या. त्यातील मुदत आणि EMI याची पडताळणी करा. शेवटचा EMI भरताना बँकेशी संपर्क साधून सर्व कागदपत्रे बँक अधिकाऱ्यांजवळ जमा करा. अधिकारी तुमचे लोन क्लोज करताना कागदपत्रांची पडताळणी करून डॉक्युमेंटेशन करतील. सर्व खातरजमा केल्यानंतर बँक तुम्हाला एनओसी (NOC) देईल.

प्री-क्लोजर (Preclosure/Foreclosure)

प्री-क्लोजर म्हणजे वेळेआधी कर्ज फेडून टाकणं. जर तुम्ही एका विशिष्ट मुदतीत कर्ज घेतलं असेल आणि तुमच्याकडे पैसे असल्यामुळे ते तुम्हाला एकदाचं फेडून टाकायचं असेल तर त्यासाठी काही बँका एक विशिष्ट रक्कम आकारतात. प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम आहेत. प्री-क्लोजरमुळे तुम्हाला व्याजाच्या दराचं ओझं कमी पडेल. मात्र, बँकेला व्याजाच्या रकमेचं नुकसान होतं. बँकेकडून आकारण्यात येणारा चार्ज हा 2 ते 4 टक्के असतो.

प्री-क्लोजर कसं करायचं?

तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेत सर्व कागदपत्रं (documents) घेऊन जा. सोबतच तुमची जेवढी बाकी रक्कम आहे, तेवढ्याचा चेक किंवा डिमांड ड्राफ्ट घेऊन जा. जेणेकरून तुम्ही उर्वरित कर्जाची रक्कम देऊ शकाल. यासाठी बँक तुमच्याकडून प्री चार्ज घेईल. पूर्ण पैसे घेतल्यानंतर बँक तुम्हाला अॅक्नॉलेजमेंट लेटर देईल.

पर्सनल लोनचे पार्ट पेमेंट (Part payment)

आपण पर्सनल लोन घेतल्यानंतर ते हप्त्यात फेडत असतो. त्याला पार्ट पेमेंट असं म्हणतात. मात्र, लोन घेऊन काही हप्ते भरल्यानंतर जर तुम्हाला कर्ज लवकर फेडायचं असेल तर अशा परिस्थितीत एक तर तुमचा EMI वाढेल किंवा कर्ज फेडण्याचा कालावधी कमी होईल. जर तुम्हाला पार्ट पेमेंट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना विनंती करावी लागेल. बँकेने तुमची विनंती स्वीकारल्यानंतर तुम्हाला नवीन EMI सांगितला जाईल. त्यानुसार तुम्हाला तुमचं उर्वरित कर्ज फेडावं लागेल.

First published:

Tags: Home Loan, Money, Pay the loan