• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • फाटलेल्या नोटा कशा बदलायच्या? RBI च्या 'या' नियमाची होईल मदत, काय आहे प्रोसेस?

फाटलेल्या नोटा कशा बदलायच्या? RBI च्या 'या' नियमाची होईल मदत, काय आहे प्रोसेस?

जर तुमच्याकडे लहान मूल्याच्या नोटा असतील म्हणजेच 5,10,20,50 रुपयांच्या नोटा असतील आणि त्या फाटलेल्या असतील तरी चालेल. परंतु या नोटांचा किमान 50 टक्के भाग असणे आवश्यक आहे.

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर : तुमच्याकडे फाटलेल्या नोटा (torn notes) असतील तर त्या बाजारात कशा वापरात आणायच्या याचं टेन्शन तुम्हाला असेल. असं असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण कोणतेत अतिरिक्त पैसे वजा न करता तुम्हाला तुमच्या फाटलेल्या नोटा बदलता येणार आहेत. बँकेत या नोटा बदलता येणार आहेत. तसेच त्यामध्ये कोणतेही अतिरिक्त पैसे कापले जाणार नाहीत. म्हणजे तुमच्याकडील नोट फाटलेली जरी असेल तरी तीचं मुल्य तेवढंच राहणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) या फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. जे सामान्य माणसासाठी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फाटलेल्या नोटा देशातील कोणत्याही बँकेत बदलल्या जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या होम ब्रँचमध्येच जावे लागेल असे नाही. बँकांनी नोट बदलून देण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. पण हे लक्षात ठेवावे लागेल की नोटेची स्थिती जितकी वाईट असेल तितकी तिची किंमत कमी होईल. याबाबतची सर्व माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Note Refund) नियम, 2009 अंतर्गत देण्यात आली आहे. Cardless Cash Withdrawal: ICICI बँकेचे ग्राहक विना कार्ड काढू शकणार पैसे, पाहा कसं? नोटा बदलण्याचे नियम जर तुमच्याकडे लहान मूल्याच्या नोटा असतील म्हणजेच 5,10,20,50 रुपयांच्या नोटा असतील आणि त्या फाटलेल्या असतील तरी चालेल. परंतु या नोटांचा किमान 50 टक्के भाग असणे आवश्यक आहे. असे असल्यास नोट 100 टक्के मुल्यासह बदलून मिळेल. म्हणजेच जर तुमच्याकडे 10 रुपयांची फाटलेली नोट असेल आणि ती 50 टक्के सुरक्षित असेल तर संपूर्ण 10 रुपयांची नोट बदलून दिली जाईल. जर तुमच्याकडे 20 पेक्षा जास्त फाटलेल्या नोटा असतील, त्या बदलून घ्यायच्या असतील आणि नोटांची एकूण किंमत 5000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन फी भरावी लागेल. नोट बदलण्याचा साधा नियम असा आहे की जर त्यात गांधीजींचे वॉटरमार्क, गव्हर्नरची सही आणि अनुक्रमांक असे सुरक्षा चिन्ह दिसत असेल तर बँकेला ती नोट बदलावी लागेल. Business Idea: रेल्वेसह सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल 80000 रुपयांपर्यंत कमाई नोटांचे बरेच तुकडे झालेले असल्यास, तरी सुद्धा ती बदलून घेण्यांसदर्भात नियम आहे. परंतु या प्रक्रियेस वेळ लागतो. यासाठी तुम्हाला ही नोट पोस्टाने RBI च्या शाखेत पाठवावी लागेल. ज्यामध्ये खाते क्रमांक, शाखेचे नाव, IFSC कोड, नोटेची किंमत याबद्दल माहिती द्यावी लागेल. फाटलेल्या नोटांचे RBI काय करते? आरबीआय या फाटलेल्या नोटा चलनातून काढून टाकते, त्या जागी नवीन नोटा छापण्याची जबाबदारी आरबीआयची आहे. पूर्वीच्या काळी या नोटा जाळल्या जायच्या आणि आताच्या काळात त्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये रिसायकल केल्या जातात. या नोटापासून नंतर कागदाच्या वस्तू बनवल्या जातात, ज्या बाजारात विकल्या जातात.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: