मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी सरकारचा अलर्ट, आजच पूर्ण करा 'हे' काम, नाहीतर होईल मोठं नुकसान

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी सरकारचा अलर्ट, आजच पूर्ण करा 'हे' काम, नाहीतर होईल मोठं नुकसान

शेतकऱ्यांसाठी सरकारचा अलर्ट, आजच पूर्ण करा 'हे' काम, नाहीतर होईल मोठं नुकसान

शेतकऱ्यांसाठी सरकारचा अलर्ट, आजच पूर्ण करा 'हे' काम, नाहीतर होईल मोठं नुकसान

PM Kisan Sanman Nidhi Scheme: 13वा हप्ता यायला अजून बराच अवधी आहे, पण देशभरातील सर्व शेतकरी त्याची वाट पाहत आहेत. तुम्हाला हप्त्यात कोणताही अडथळा नको असेल तर या नियमांचे पालन करा.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 14 नोव्हेंबर: जर तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Scheme) लाभ घेत असाल, तर तुम्हाला त्यासाठी थोडी वाट पहावी लागेल. नुकताच 12वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. 13वा हप्ता यायला अजून बराच अवधी आहे, पण देशभरातील सर्व शेतकरी त्याची वाट पाहत आहेत. या अंतर्गत, प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर 2000-2000 रुपये हस्तांतरित केले जातात. दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमधील पात्र  देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत पीएम किसानच्या 13 व्या हप्त्यासाठी मोठा बदल केला आहे, जेणेकरून कोणीही चुकीच्या पद्धतीनं या योजनेचा लाभ घेऊ नये.

 जमिनीच्या नोंदींची पडताळणी आवश्यक झाली-

खरं तर चुकीच्या पद्धतीनं या योजनेचा लाभ घेणारी अनेक प्रकरणं नोंदवली गेली आहेत. भविष्यातील संभाव्य हेराफेरी लक्षात घेता, पीएम किसान योजनेचे नियम खूप कडक करण्यात आले आहेत. अशा स्थितीत या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी करणं आवश्यक असून याअंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यानं प्रथम आपल्या जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी करणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत लाभार्थी शेतकऱ्यांनी जमिनीच्या नोंदींची पडताळणी करणं आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांनी या नमूद नियमांचं पालन केलं नाही, तर त्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या 13 व्या हप्त्यातून वगळण्यात येईल, ज्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये दिले जातील.

पीएम किसान सन्मान निधीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी फक्त राशन कार्ड अर्थात शिधापत्रिकेची प्रत आवश्यक नाही. जर तुम्हाला 13व्या हप्त्यात जानेवारीपर्यंत कोणताही अडथळा नको असेल तर त्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जावे लागेल आणि शिधापत्रिकेची सॉफ्ट कॉपीची पीडीएफ फाइल अपलोड करावी लागेल.

हेही वाचा: ATMमधून 2000 रुपयांच्या नोटा का झाल्या गायब? RBI ने सांगितलं कारण

 बँक खाते आधार कार्डशी लिंक करा-

शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात 13व्या हप्त्याचा लाभ हवा असेल तर 2000 रुपये मिळवण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. वास्तविक याचा लाभ मिळण्यासाठी संबंधित शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात 13 वा हप्ता म्हणून 2000 रुपये येतील.

 नोंदणी कशी करावी?

किसान सन्मान निधी मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर शेतकऱ्यांना ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल. प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात संबंधित शेतकऱ्याला त्याचा आधार क्रमांक टाकावा लागेल. यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्याची निवड करावी लागेल आणि पुढील प्रक्रिया सूचनांनुसार करावी लागेल.

First published:

Tags: PM Kisan