Vodafone Idea च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, या तारखेपासून वाढणार दर

Vodafone Idea च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, या तारखेपासून वाढणार दर

टेलिकॉम क्षेत्र आर्थिक संकटात आहे आणि असं असतानाही मोबाइल डाटा स्वस्त असल्याने आम्हाला दरात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागतोय, असं Vodafone Idea ने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : Vodafone Idea चे दर वाढणार आहेत. या दरात 1 डिसेंबरपासून बदल होतील, असं कंपनीने म्हटलं आहे. मोबाइल डाटाच्या सेवेला मोठी मागणी असली तरी भारतात मोबाइल डाटाचे दर जगभरात सगळ्यात स्वस्त आहेत. 1 डिसेंबरपासून या दरात वाढ केली जाईल, असंही या कंपनीने म्हटलं आहे.

टेलिकॉम क्षेत्र आर्थिक संकटात आहे आणि असं असतानाही मोबाइल डाटा स्वस्त असल्याने आम्हाला दरात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागतोय, असं Vodafone Idea ने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

मोबाइल डाटाच्या दरांबद्दल याआधी CNBC-TV18 ने एक बातमी दिली होती. मोबाइल कॉल्स आणि डाटाचे किमान दर ठरवण्यासाठी सचिवांची एक समिती स्थापन करण्यात येईल, असं त्यात म्हटलं होतं. या समितीने टेलिकॉम खात्याकडून याबद्दल सूचना मागवल्या होत्या.

Vodafone Idea ने गेल्या आठवड्यात आपल्याला 50 हजार 921 कोटींचा तोटा झाल्याचं म्हटलं होतं. यावर्षी सप्टेंबर महिन्यात संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत आतापर्यंतचा सगळ्यात तोटा झाल्याचं कंपनीचं म्हणणं होतं.

(हेही वाचा : मंदीवर तोडगा काढण्यासाठी मनमोहन सिंग यांचा पुढाकार, मोदी सरकारला दिला हा सल्ला)

Airtel, Vodafone Idea आणि इतर टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे 1.4 लाख कोटी रुपये द्यायचे आहेत. टेलिकॉम खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार भारती एअरटेलला 62 हजार 187 कोटी रुपये द्यायचे आहेत तर Vodafone Idea कंपनीला 54 हजार 184 कोटी रुपये द्यायचे आहेत.

Vodafone Idea चे CEO रवींद्र ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, याबद्दल आमची सरकारशी चर्चा सुरू आहे. टेलिकॉम क्षेत्राची चांगली वाढ व्हावी अशीच सरकारची इच्छा आहे. या क्षेत्रात 3 खाजगी कंपन्या आणि एक सरकारी कंपनी असावी, असं सरकारचं स्पष्ट धोरण आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

==========================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: November 18, 2019, 7:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading