'या' सरकारी बँकांची नावं बदलली, ग्राहकांना ताबडतोब करावी लागणार 'ही' कामं

'या' सरकारी बँकांची नावं बदलली, ग्राहकांना ताबडतोब करावी लागणार 'ही' कामं

विजया बँक आणि देना बँकेच्या ग्राहकांना काही महत्त्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. एक नजर टाकू ग्राहकांना काय काय करावं लागणार आहे त्यावर-

  • Share this:

मुंबई, 01 एप्रिल : आज विजया बँक आणि देना बँक या दोन सरकारी बँकांचं बँक आॅफ बडोदामध्ये  विलीनीकरण झालंय. या दोन बँकांच्या विलीनीकरणाबरोबर बँक आॅफ बडोदा देशातली तिसरी सर्वात मोठी बँक झालीय.आजपासून ( 1 एप्रिल ) विजया बँक आणि देना बँक यांच्या सर्व शाखा बँक आॅफ बडोदाच्या शाखा म्हणून काम करणार. म्हणून विजया बँक आणि देना बँकेच्या ग्राहकांना काही महत्त्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. एक नजर टाकू ग्राहकांना काय काय करावं लागणार आहे त्यावर-

ग्राहकांना करावी लागणार ही कामं


  1. या विलीनीकरणानंतर विजया आणि देना बँकांच्या ग्राहकांना अकाऊंट नंबर बदलावा लागेल.

  2. अकाऊंट नंबर बदलल्यामुळे सर्व ग्राहकांना पासबुक आणि चेकबुकही बदलावं लागेल.

  3. दोन्ही बँकांच्या सर्व ग्राहकांना नवं डेबिट आणि एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड घ्यायला लागेल.

  4. बँकांचं नाव बदलल्यामुळे ग्राहकांच्या शाखांचा IFSC कोडही बदलणार.

  5. SIP किंवा लोन EMIसाठी ग्राहकांना नवा इन्स्ट्रक्शन फाॅर्म भरावा लागेल.

  6. बँकांच्या काही शाखा बंद होणार. त्यामुळे ग्राहकांना नव्या शाखांमध्ये जावं लागणार.

देशातली तिसरी सर्वात मोठी बँक

या विलीनीकरणानंतर हा एकत्रित कारभार 14.82 लाख कोटी झालाय. भारतीय स्टेट बँक (SBI ) आणि आयसीआयसीआय  (ICICI ) बँकेनंतर बँक आॅफ बडोदा देशातली तिसरी मोठी बँक झालीय. आता सरकारी बँकांची संख्या कमी होऊन ती 18 झालीय.

1 एप्रिलपासून बँकेतून लोन घेणं स्वस्त होणार आहे. तुम्ही घेतलेल्या कर्जावर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार रेपो रेट लावला जाणार आहे. रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट घटल्यास व्याजदरातही कपात होणार आहे. व्याजदर वाढवणं किंवा कमी करणं आता बँकेच्या हातात राहणार नाही. बँकेच्या व्याजदरांवर रिझर्व्ह बँकेची नजर राहणार आहे.


VIDEO: 'इस्रो'ने पुन्हा रचला इतिहास, एमिसॅट्सह 28 उपग्रहांनी अशी घेतली भरारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 11:57 AM IST

ताज्या बातम्या