मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कर्जापेक्षा जास्त माझी संपत्ती ED ने जप्त केलीय; तरी माझं नाव वारंवार घोटाळेबाज म्हणून घेतलं जातंय

कर्जापेक्षा जास्त माझी संपत्ती ED ने जप्त केलीय; तरी माझं नाव वारंवार घोटाळेबाज म्हणून घेतलं जातंय

कर्जबुडव्या विजय मल्यानं असा दावा केला आहे की, त्याच्या कर्जापेक्षा अधिक किंमतीची संपत्ती आपल्याकडून जप्त केली गेली आहे. याबाबत त्यानं एक ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे.

कर्जबुडव्या विजय मल्यानं असा दावा केला आहे की, त्याच्या कर्जापेक्षा अधिक किंमतीची संपत्ती आपल्याकडून जप्त केली गेली आहे. याबाबत त्यानं एक ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे.

कर्जबुडव्या विजय मल्यानं असा दावा केला आहे की, त्याच्या कर्जापेक्षा अधिक किंमतीची संपत्ती आपल्याकडून जप्त केली गेली आहे. याबाबत त्यानं एक ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 8 जून : न्यायालयाच्या आदेशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नेतृत्त्वाखालील बँकांचा ग्रुप विमान कंपनी किंगफिशरशी संबंधित बुडीत कर्जे वसूल करण्यासाठी पळपुटा उद्योगपती विजय मल्ल्याची (Vijay Mallya) रिअल इस्टेट मालमत्ता आणि सिक्युरिटीज विकू शकतात. एसबीआयच्या नेतृत्वात 11 बँकांच्या कन्सोर्टियमने मल्ल्याला कर्ज दिलं होतं. बँकांच्या या ग्रुपनं मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याद्वारे (पीएमएलए) संबंधित विशेष न्यायालयात संपर्क साधला होता आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जप्त केलेली संपत्ती परत देण्याची विनंती केली होती.

यानंतर या कर्जबुडव्या उद्योगपतीनं असा दावा केला आहे की, त्याच्या कर्जापेक्षा अधिक किंमतीची संपत्ती आपल्याकडून जप्त केली गेली आहे. याबाबत त्यानं एक ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे.

मी सध्या टीव्ही पाहत होतो, न्यूज चॅनेलमध्ये माझं नाव वारंवार घोटाळेबाज म्हणून घेतलं जात आहे. किंगफिशर एयरलाइनच्या कर्जापेक्षा अधिक माझी संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. यावर कोणी विश्वास ठेवणार आहे की, नाही. मी कित्येक वेळा सांगितलंय की, माझ्यावर असलेली सर्व उधारी मी 100 टक्के परत करेन. मग यामध्ये चीटिंग किंवा फ्रॉड कुठं आहे, असा प्रश्न करणारे ट्विट, विजय मल्याने केले आहे.

कोर्टाने काय आदेश दिले आहेत?

तत्पूर्वी, मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयानं बँकांना 5,646.54 कोटींची मालमत्ता परत करण्याची परवानगी दिली आहे. या आदेशात उल्लेख केलेल्या संपत्तीचा संकेतस्वरुप ताबा घेण्यासाठी सर्व नियम आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतर कर्जदात्याद्वारे घेतली जाईल, असे SBI च्या एका अधिकाऱ्यानं सांगितले.

हे वाचा - राजीव सातव यांच्या जागेवर आता कोण? राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यात नावावरून मतभेद

बँकांमधील याबाबतची वसुली प्रक्रिया ही सिक्युरीटीजेशन अँड रीनस्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अ‍ॅसेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, 2002 च्या मार्गदर्शन सूचनांनुसार असते.  मार्गदर्शक सूचनांनुसार त्या ठिकाणांचा लिलाव किंवा विक्री योग्य वेळी केली जाईल. किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या 6,900 कोटी रुपयांच्या मूळ कर्जापैकी स्टेट बँकेने सर्वाधिक 1,600 कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय अन्य बँकांनी विजय मल्या्च्या कंपनीला कर्ज दिले आहे, त्यांच्यामध्ये पंजाब नॅशनल बँक (800 कोटी रुपये), आयडीबीआय बँक (800 कोटी रुपये), बँक ऑफ इंडिया (650 कोटी रुपये), बँक ऑफ बडोदा (550 कोटी), सेंट्रल बँक इंडिया (410 कोटी रुपये) यांचा समावेश आहे.

First published:

Tags: Business News, SBI