माल्ल्याची हिम्मत बघा, लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानामुळे सरकारकडेच मागितली मदत

माल्ल्याची हिम्मत बघा, लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानामुळे सरकारकडेच मागितली मदत

भारतातून फरार घोषित करण्यात आलेल्या किंगफिशरचा मालक विजय माल्ल्याने पुन्हा एकदा 100 टक्के कर्जाची परतफेड करण्याची भाषा केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मार्च : भारतातून फरार घोषित करण्यात आलेल्या किंगफिशरचा मालक विजय माल्ल्याने पुन्हा एकदा 100 टक्के कर्जाची परतफेड करण्याची भाषा केली आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीबाबत ट्वीट करत त्याने, हे वक्तव्य केले आहे. ट्विटरवर विजय माल्ल्याने लिहिलं  आहे की, भारत सरकार आणि ईडी (Enforcement Department –ED) त्याची मदत करत नाही आहेत. भारतामध्ये सध्या 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. 14 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद आहे. या लॉकडाऊनबाबतही त्याने तक्रारीचा सूर लावला आहे.

विजय माल्ल्या त्याच्या ट्वीटमध्ये म्हणतो आहे की, ‘भारत सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले आहे. कोणालाच वाटलं नव्हतं की असं काही होईल. या निर्णयाचा मी सन्मान करतो. पण यामुळे माझ्या सर्व कंपन्या ठप्प झाल्या आहेत. सर्वप्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग बंद झाले आहे. अस असून देखील आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवले नाही आहे आणि त्याची किंमत मोजत आहोत. सरकारने आमची मदत करणे अपेक्षित आहे.’

माल्ल्याने दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी युके हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. 9000 कोटींच्या मनीलॉड्रिंग प्रकरणावर ही सुनावणी आहे.

First published: March 31, 2020, 11:09 AM IST

ताज्या बातम्या