मुंबई, 26 डिसेंबर : चौथा शनिवार, रविवार आणि नाताळच्या सुट्टीनंतर बँका बंद राहणार आहेत. सरकारी बँकेच्या सर्व 9 कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. जुन्या खासगी बँकाही बंद राहणार आहेत. देशातले 10 लाख कर्मचारी आणि अधिकारी सुट्टीवर असणार आहेत. पण काळजीचं कारण नाही. कारण मोबाईल आणि ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही महत्वाची कामं करू शकता.