Home /News /money /

Vodafone-Idea कंपनीला मिळाली नवी ओळख, आतापासून असणार नवीन नाव

Vodafone-Idea कंपनीला मिळाली नवी ओळख, आतापासून असणार नवीन नाव

2018 मध्ये या कंपन्या एकत्र आल्या आणि त्यानंतर व्होडाफोन आयडिया नावाची कंपनी अस्तित्वात आली.

    नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : आज टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आणि आयडियाने (Vodafone Idea) त्यांच्या नावांचं रिब्रांडिंग केलं आहे. ही कंपनी आता vi म्हणून ओळखली जाणार आहे. या कंपनीचा मालकी हक्क यूकेच्या व्होडाफोन आणि आदित्य बिर्ला समूहाकडे आहे. 2018 मध्ये या कंपन्या एकत्र आल्या आणि त्यानंतर व्होडाफोन आयडिया नावाची कंपनी अस्तित्वात आली. V व्होडाफोन आणि I हा आयडियासाठी लिहिला गेला आहे. या दोन्ही कंपनींनी आज त्यांच्यानवीन ब्रँडिंगची घोषणा केली. यावेळी विलीनीकरण हे या दोन ब्रँडचं आतापर्यंतचं जगातील सर्वात मोठं टेलिकॉम इंट्रीगेशन आहे. इतकंच नाही तर आता कंपनीने दर वाढणार असल्याचंही संकेत दिले आहेत. अंत्यसंस्कार करताना मृतदेहाचा चेहरा उघडताच बसला धक्का, पालिकेचा ढिम्म कारभार उघड दोन वर्षांपूर्वी व्होडाफोन आयडियाचं विलीनीकरण करण्यात आलं होतं. आम्ही तेव्हापासून दोन मोठे नेटवर्क म्हणून एकत्रपणे काम करत आहोत. आज या vi ब्रँडची ओळख करुन दिल्याने मला आनंद होत आहे. असं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले आहेत. तर ही एक महत्त्वाचं पाऊल आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. जुन्नरमध्ये व्हायरल होतोय हा मनमोहक VIDEO, या रंगाच्या तुम्हीही पडाल प्रेमात दर वाढीचेही दिले संकेत रवींदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक आणखी मोठं नेटवर्क तयार करण्यासाठी कंपनीने दर वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. या नवीन दरांमुळे कंपनीला एआरपीयू सुधारण्यास मदत होणार आहे. सध्या हा दर 114 रुपये आहे, तर एअरटेल आणि जिओचे एपीआरयू 157 आणि 140 रुपये आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Vodafone idea tariff plan

    पुढील बातम्या