Home /News /money /

Aadhaar Card सुद्धा होतं Expired; तुमचं 'आधार' वैध आहे की नाही असं चेक करा

Aadhaar Card सुद्धा होतं Expired; तुमचं 'आधार' वैध आहे की नाही असं चेक करा

Aadhar card

Aadhar card

आधार कार्ड किती दिवसांपर्यंत वैध आहे, हे जाणून घेण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया आहे.

मुंबई, 06 जुलै : आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पॅन कार्ड (PAN Card) हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. ओळखीचा पुरावा म्हणून या दस्तऐवजांचा वापर होतो. त्यात आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं आहे. आधार कार्डावर तुमची ओळख पटवणारा सर्व तपशील असतो. हा तपशील आधार क्रमांकाच्या मदतीनं पाहता येतो. शैक्षणिक, आर्थिक बाबींसह शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, तसंच सर्व प्रकारची शासकीय कामं करण्यासाठी आधार कार्डाची गरज भासते. या आधार कार्डाविषयी एक खास बाबदेखील आहे. आधार कार्डलाही एक विशिष्ट मुदत (Validity) असते. हे ऐकून तुम्हाला क्षणभर आश्चर्य वाटेल; पण ही गोष्ट खरी आहे. आधार कार्ड किती दिवसांपर्यंत वैध आहे, हे जाणून घेण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थात यूआयडीएआय (UIDAI) या संस्थेकडून आधार कार्ड जारी केलं जातं. आधार कार्डवर नाव, पत्ता, वय यांसह बायोमेट्रिक तपशील (Biometric Details) असतात. आधार कार्ड हे प्रत्येक व्यक्तीला एकदाच दिलं जातं. त्यामुळे त्याची वैधता नेमकी किती आहे, हे प्रत्येकाला माहिती असणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या मुलांचं ब्लू आधार कार्ड काढलं असेल, तर त्याची मुदत पाच वर्षांनी संपुष्टात येते. त्याचप्रमाणे पाच वर्षांपेक्षा जास्त आणि 15 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचं आधार कार्ड वेळेवर अपडेट (Update) केलं नाही तर त्याची वैधता संपते. त्यामुळे आधार कार्डवर बायोमेट्रिक डेटा अपडेट करणं आवश्यक असतं. हे वाचा - Schemes for Farmers: शेतकर्‍यांसाठी 'या' 5 योजना ठरतायेत वरदान! सोप्या शब्दात समजून घ्या तुम्ही तुमच्या आधार कार्डची वैधता ऑनलाइन अगदी सहजपणे तपासू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. वेबसाइटवरच्या Aadhaar Services या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Verify Aadhaar Number या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर एक नवं पेज स्क्रीनवर दिसेल. या पेजवर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर बॉक्समध्ये Security Code भरावा लागेल. परत Verify या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. तुमचा आधार क्रमांक वैध असेल तर तो दिसेल. तुमच्या आधार कार्डची वैधता संपली असले तर आधार क्रमांक दिसू शकणार नाही. वैधता संपलेलं आधार कार्ड रिन्यू (Renew) करण्यासाठी तुम्हाला ते अपडेट करावं लागेल. ज्या मुलांचं वय 5 वर्षांपेक्षा कमी असताना आधार कार्ड काढलेलं असेल, त्यांच्या आधार कार्डवरचा बायोमेट्रिक डेटा (बोटांचे ठसे आणि डोळ्यांचा स्कॅन) मुलांना 5 वर्षं पूर्ण झाल्यावर अपडेट करावा लागतो. तसंच, वयाची 15 वर्षं पूर्ण झाल्यानंतरही पुन्हा एकदा बायोमेट्रिक डाटा अपडेट करावा लागतो, असं `यूआयडीएआय`नं सूचित केलेलं आहे. हा डेटा अपडेट करण्यासाठी तुम्हाला नजीकच्या आधार सेंटरवर जावं लागेल. या सेंटरवर बोटांचे ठसे, आयरिस आणि फोटो अपडेट केले जातील. तसंच जन्मतारीख, मोबाइल क्रमांक, ई-मेलही आदी गोष्टीही अपडेट करणं शक्य आहे. हे वाचा - अवघ्या काही मिनिटात कागदपत्रांशिवाय कर्जाचे पैसे अकाऊंटमध्ये येतील, 'या' सरकारी बँकेची खास सुविधा आधार कार्डची वैधता संपली असेल, तर ते तातडीनं अपडेट करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक कामासाठी आधार कार्ड गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आधार कार्डची वैधता तपासावी आणि मुदत संपली असेल तर आधार कार्ड तातडीनं अपडेट करावं.
First published:

Tags: Money, Technology

पुढील बातम्या