मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कचऱ्यात टाकलेल्या लॉटरी तिकिटांनी बदललं नशीब, रात्रीत करोडपती झाला भाजी विक्रेता

कचऱ्यात टाकलेल्या लॉटरी तिकिटांनी बदललं नशीब, रात्रीत करोडपती झाला भाजी विक्रेता

काही लोकांनी भाजी विक्रेत्याला तु जिंकलेला नाहीस असं सांगितलं होतं. तेव्हा त्याने तिकिटं कचरा कुंडीत टाकून दिली होती.

काही लोकांनी भाजी विक्रेत्याला तु जिंकलेला नाहीस असं सांगितलं होतं. तेव्हा त्याने तिकिटं कचरा कुंडीत टाकून दिली होती.

काही लोकांनी भाजी विक्रेत्याला तु जिंकलेला नाहीस असं सांगितलं होतं. तेव्हा त्याने तिकिटं कचरा कुंडीत टाकून दिली होती.

  • Published by:  Suraj Yadav

नवी दिल्ली, 06 जानेवारी : कधी कोणाचं नशीब रात्रीत बदलेल सांगता येत नाही. रंकाचा राव आणि रावाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. एका भाजी विक्रेत्याला तब्बल एक कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. कोलकात्यात भाजीचं दुकान चालवणाऱ्या व्यक्तीला नव्या वर्षात धनलाभ झाला आहे. नागालँड लॉटरी खरेदी कऱणाऱ्या या भाजी विक्रेत्याला लॉटरी लागली असली तरी त्याआधी काही लोकांनी त्याला तु जिंकलेला नाहीस असं सांगितलं होतं. तेव्हा त्याने तिकिटं कचरा कुंडीत टाकून दिली होती. त्यानंतर त्यातल्याच एका तिकिटावर एक कोटी रुपये लागले होते अशी माहिती त्याला मिळाली.

भाजी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कऱणाऱ्या सादिकने नव्या वर्षात लॉटरीची पाच तिकिटे विकत घेतली होती. 2 जानेवारीला लॉटरीची सोडत निघाली तेव्हा त्याला काहींनी सांगितलं की तुला बक्षिस लागलेलं नाही. तेव्हा निरास झालेल्या सादिकनं त्याची तिकिटं कचऱ्यात फेकून दिली. पुढच्याच दिवशी सादिक बाजारात गेला होता. तेव्हा लॉटरी दुकानदारानेच सादिकला 1 कोटी लागल्याचं सांगितलं.

दुकानदाराने सादिकला लॉटरी लागल्याचं सांगितल्यानंतर त्याने घरी बायकोला सांगितले. तेव्हा दोघांनी कचऱ्यात तिकिटं शोधायला सुरुवात केली. बरीच शोधाशोध केल्यानंतर तिकिटे सापडल्यावर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सादिकने 5 तिकिटं घेतली होती त्यातील एका तिकिटावर 1 कोटी तर इतर चार तिकिटांवर प्रत्येकी एक एक लाख रुपये लागले होते.

लॉटरी लागल्यानंतर सादिकने मुलांसाठी एक कार बूक केली. सादिकची पत्नी म्हणाली की, यामुळे आमचं जीवन बदलेल. मुलांना शिक्षणासाठी चांगल्या शाळेत पाठवायचं आहे. या लॉटरीमुळे आम्ही सर्व कुटुंबीय आनंदी आहे असंही सादिकच्या पत्नीने सांगितलं.

36 लाख रुपये कमवण्याची सुवर्णसंधी! तुमच्या फोनमध्ये करावं लागेल 'हे' काम

First published:

Tags: Lottery