मुंबई : सहसा उंदीर कारमध्ये शिरत नाहीत किंवा कारचं नुकसानही करत नाहीत. पण, त्यांना कारमध्ये शिरण्याची संधी मिळाली की ते अजिबात दया दाखवत नाहीत. कारच्या इंटिरिअरमधील सर्व गोष्टींची ते नासधूस करतात. असं झाल्यास मालकाला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे अगदी उंदरांनी केलेल्या नुकसानाची भरपाई मिळवून देईल, असा कार इन्शुरन्स म्हणजेच विमा आपल्याकडे असणं आवश्यक आहे.
जेव्हा आपण कारचा विमा काढतो, तेव्हा त्यात उंदरांनी केलेल्या नुकसानाची भरपाई देण्याची सुविधा दिली जात नाही. अशा प्रकारचा विमा किंवा विमा सुविधा अस्तित्त्वातच नाही, असा अनेकांचा समज आहे. पण, यामध्ये पूर्णपणे तथ्य नाही. उंदरांनी केलेल्या नुकसानाची भरपाई देणारी एक स्वतंत्र विमा पॉलिसी अस्तित्त्वात आहे. 'रॅट बाईट कव्हर' असं पॉलिसीचं नाव आहे. या पॉलिसीमध्ये उंदरांमुळे तुमच्या वाहनाचं झालेलं नुकसान कव्हर होतं.
रॅट बाईट कव्हर ही एक विमा टर्म आहे जी कार खरेदी करताना घेता येते. जर तुमच्याकडे ही पॉलिसी असेल आणि उंदरांनी कारचं नुकसान केलं तर संबंधित विमा कंपनी दुरुस्तीसाठी खर्च देते.
रॅट बाईट कव्हर पॉलिसीचे दोन प्रकार:
1) पहिल्या प्रकारात, विमा कंपनी दुसऱ्याच्या पाळीव प्राण्यांमुळे होणारं नुकसान कव्हर करते.
2) दुसऱ्या प्रकारात, तुमच्या घरातील उंदरांनी तुमच्या कारचं नुकसान केलं असेल तर त्याची भरपाई विमा कंपनी देते.
कार इन्शुरन्समध्ये रॅट बाईट कव्हर का आवश्यक आहे?
अशी अनेक कारणं आहेत ज्यांमुळे रॅट बाईट कव्हर घेणं आवश्यक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर, आपण राहतो त्या ठिकाणी आजूबाजूला खूप उंदीर असण्याची शक्यता असते. हे उंदीर कारचं वायरिंग कुरतडू शकतात. कधी-कधी कारचं वायरिंग पूर्णपणे तुटूदेखील शकतं आणि त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. वायरिंगमध्ये बिघाड असेल तर इंजिन काम करणं थांबवेल किंवा इंजिनमधून धूर निघेल. जर तुमच्याकडे रॅट बाईट कव्हर असेल तर वायरिंग दुरुस्त करण्यासाठी विमा कंपनी पैसे देईल.
कार इन्शुरन्समध्ये रॅट बाईट कव्हर कसं कार्य करतं?
कार इन्शुरन्समधील रॅट बाईट कव्हर हे उंदरांनी खराब झालेल्या कारच्या दुरुस्तीचा खर्च मिळवून देतं. जेव्हा नवीन कार खरेदी केली जाते तेव्हा अशा प्रकारचं कव्हर दिलं जातं. जर एखाद्या उंदरानं कारचं वायरिंग तोडलं असेल किंवा कारचा इतर भाग खराब केला असेल तर या विम्यामुळे कारच्या मालकाला आर्थिक संरक्षण मिळेल. तो विमा कंपनीकडून वाहनाच्या नुकसानाच्या दुरुस्तीचा सर्व खर्च घेऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car