कार खरेदी करणं होणार महाग, मोदी सरकार आणतंय नवे नियम

कार खरेदी करणं होणार महाग, मोदी सरकार आणतंय नवे नियम

कार खरेदी करणं महाग होण्याची शक्यता खूप आहे. जाणून घ्या त्यामागची कारणं

  • Share this:

मुंबई, 11 जून : तुम्हाला नवी कार खरेदी करायची असेल तर जरा घाई करा. कारण आता येणाऱ्या दिवसांत कारच्या रजिस्ट्रेशनचा दर 10 पट वाढवण्याचा विचार सरकार करतंय. इलेक्ट्राॅनिक कार्सची मागणी वाढावी यासाठी नीती आयोग हे रजिस्ट्रेशन महाग करणार आहे. तुम्ही जेव्हा कार खरेदी करता तेव्हा तुम्हाला फी द्यावी लागते, त्याला रजिस्ट्रेशन फी म्हणतात. हा रोड टॅक्सपेक्षा वेगळा असतो.हा कर सेंट्रल मोटर व्हेइकलद्वारे ठरवला जातो. आरटीओ हा कर स्वीकारतो.

किती होणार फी?

नीती आयोगाच्या नव्या प्रस्तावानुसार रजिस्ट्रेशन फी 10 पट वाढणार आहे. सध्या दोन चाकी वाहनांसाठी 60 रुपये आणि कारसाठी 400 ते 600 रुपये आहे. व्यावसायिक कार्सचीही याच रेंजमध्ये आहे.

जबरदस्त ऑफर! जेवताना, खाताना मोबाईल बाजूला ठेवलात तर इथे मिळेल फ्री पिझ्झा

वाढ झाली की किती होईल फी?

अशी वाढ झालीच तर दोन चाकी कारच्या रजिस्ट्रेशनची फी 60 रुपयावरून 600 रुपये होईल, तर चार चाकी वाहनांच्या रजिस्ट्रेशनची फी 400 ते 600 रुपयांवरून 4000 ते 6000 रुपये होईल.

नवी मुंबई महानगरपालिकेत 'या' पदांसाठी 169 जागांवर भरती

का आला प्रस्ताव?

हा प्रस्ताव नीती आयोगाकडून आलाय. याआधी ग्रीन सेसलंबंधी प्रस्ताव आला होता. त्यावर आॅटो इंडस्ट्रीनं मान्यता दर्शवली नाही. सरकारला इलेक्ट्रिक व्हेइकल मिशनसाठी पैसे हवेत. म्हणून रजिस्ट्रेशन फी वाढवून पैसे मिळवले जातील. यासाठी सरकारला मंजुरीची गरज नाही. मोटर व्हेइकल अॅक्टमध्ये विस्तार करून ही फी वाढवता येईल.

खुशखबर, आता झीरो बॅलन्स खातेधारकांसाठी चेकबुक आणि ATM कार्ड मोफत

कार घेताना त्याचा इन्शुरन्स काढणंही आवश्यक आहे.भारतात Car Insurance शिवाय ड्राइव्ह करणं हे Motor Vehicle Act, 1988 प्रमाणे गुन्हा आहे. त्याला शिक्षा होऊ शकते. अनेकदा आपण कार इन्शुरन्स एक्सपायर होईपर्यंत वाट पाहतो. त्यानंतर अपडेट करायला उशीर करतो.

कार इन्शुरन्सशिवाय ड्राइव्ह करणं म्हणजे जणू संकटालाच आमंत्रण देणं. दरम्यान, तुमच्या सोबत कुठली दुर्घटना घडली, कारला अपघात झाला तर इन्शुरन्स कंपनी तुमचा इन्शुरन्स वैध मानणार नाही. म्हणून तो अपडेट करणं आवश्यक आहे.

बिग बॉसमधून मैथिली जावकरला कोणत्या कारणामुळे बाहेर पडावं लागलं?

First published: June 11, 2019, 8:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading