SBIच्या ATM कार्डावर फक्त 15 मिनिटांत लावू शकता तुमच्या व्हॅलेंटाइनचा फोटो

SBIच्या ATM कार्डावर फक्त 15 मिनिटांत लावू शकता तुमच्या व्हॅलेंटाइनचा फोटो

प्रत्येक व्हॅलेंटाइन्स डेला आपला जोडीदार काय गिफ्ट देतो, हे प्रत्येक जण वाट पहात असतं. यावेळी तुम्ही एक संस्मरणीय गिफ्ट देऊ शकता.

  • Share this:

मुंबई, 14 फेब्रुवारी : प्रत्येक व्हॅलेंटाइन्स डेला आपला जोडीदार काय गिफ्ट देतो, हे प्रत्येक जण वाट पहात असतं. यावेळी तुम्ही एक संस्मरणीय गिफ्ट देऊ शकता. देशाची सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक आॅफ इंडिया (SBI )नं ग्राहकांसाठी एक सुविधा आणलीय.

ग्राहक डेबिट कार्डावर आपला फोटो छापू शकतात. त्यासाठी बँकेनं SBI इन टच शाखा उघडलीय. या शाखेत खातं उघडल्यानंतर तुम्हाला अनेक सुविधा मिळतील. शिवाय बँकेची कामं लाइनमध्ये उभं न राहता झटपट होऊ शकतात. या शाखेत जाऊन तुम्ही मिनिटभरात आपलं खातं उघडू शकता.  या शाखेत पुढील सुविधा मिळताल.

डेबिट कार्डावर फोटो लावून मिळेल

तुम्हाला डेबिट कार्डावर तुमचा फोटो फक्त 5 मिनिटात लावता येईल. त्यासाठी तुम्हाला बँकेच्या ब्रँचमध्ये जावं लागेल. त्यासाठी तुम्हाला एडओन कार्डासाठी अप्लाय करावा लागेल. तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंड, बाॅयफ्रेंडला गिफ्ट द्यायचं असेल तर त्यांचं खातं उघडावं लागेल.

काही मिनिटांत होतील महत्त्वाची कामं

ही सुविधा SBIच्या 143 शाखांमध्ये उपलब्ध आहे. ज्या कामांना महिनोमहिने लागायचे, ती कामं आता 15 मिनिटांत होतील. याशिवाय आॅनलाइन ट्रेंडिंगही करता येईल.

इनटच ब्रँचमध्ये होतील ही कामं

SBIनं इन एसबीआय इन टच शाखेत अगदी सहज सेव्हिंग्ज अकाऊंट, करंट अकऊंट, पीएफ अकाऊंट उघडता येतील. ‘AOK’ कियोस्क या खास फीचरद्वारे तुम्ही 15 मिनिटांत सर्व कामं करू शकता. डेबिट कार्डवर तुमचा फोटोही लावू शकता. 24 तासात पैसे आणि चेक जमा होतील. SBIच्या सर्व शाखेत एसबीआय इन टच ही सुविधा मिळेल.

ताबडतोब करा हे काम, नाहीतर LIC मध्ये अडकतील तुमचे पैसे

First published: February 14, 2019, 12:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading