मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Va Tech Wabag शेअरमध्ये आज 7 टक्क्याहून अधिकची तेजी; तज्ज्ञांचा काय आहे सल्ला?

Va Tech Wabag शेअरमध्ये आज 7 टक्क्याहून अधिकची तेजी; तज्ज्ञांचा काय आहे सल्ला?

va tech wabag  हा स्टॉक NSE वर रु. 23.90 (7.22%) च्या वाढीसह 354.95 वर ट्रेड करताना दिसत आहे. BSE वर, हा स्टॉक 23.30 रुपये किंवा 7.03 टक्के मजबूतीसह 354.80 च्या पातळीवर दिसत आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 16 नोव्हेंबर : Va Tech Wabag चे शेअर्स 16 नोव्हेंबर रोजी इंट्राडेमध्ये 7 टक्क्यांहून अधिक वाढले. कंपनीने सप्टेंबर तिमाहीचे निकाल (Va Tech Wabag Q2 result) जाहीर केले आहेत. त्यानुसार या कालावधीत कंपनीचा नफा 25.93 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या आजच्या निकालामुळे या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.

वॉटर ट्रीटमेंटचा व्यवसाय करणाऱ्या या कंपनीने सांगितले आहे की, गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 13.93 कोटी रुपये होता, तर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचा नफा जवळपास दुप्पट वाढून 25.93 कोटी रुपये झाले आहेत.

त्याचप्रमाणे जर आपण 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या सहामाहीतील निकालांवर नजर टाकली तर, कंपनीचा एकत्रित नफा गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील 18.97 कोटी रुपयांवरून 40.50 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

PM KISAN मध्येही होतोय घोटाळा! 'या' शेतकऱ्यांकडून सरकार वसूल करणार पैसे

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील उत्पन्नावर नजर टाकली तर ती वार्षिक आधारावर 610.09 कोटी रुपयांवरून 686.97 कोटी रुपये झाली आहे. सहामाही आधारावर, कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर 1,042.26 कोटी रुपयांवरून 30 सप्टेंबर 2021 च्या सहामाहीत 1,359.25 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

सध्या हा स्टॉक NSE वर रु. 23.90 (7.22%) च्या वाढीसह 354.95 वर ट्रेड करताना दिसत आहे. BSE वर, हा स्टॉक 23.30 रुपये किंवा 7.03 टक्के मजबूतीसह 354.80 च्या पातळीवर दिसत आहे. आज इंट्राडे मध्ये, या शेअरने 361.25 रुपयांचा उच्चांक आणि 344.30 रुपयांचा नीचांक गाठला आहे.

Digital Gold बाबत मोठ्या निर्णयाच्या विचारात सरकार, SEBI आणि RBI आखत आहेत योजना

जपानी रिसर्च फर्म नोमुराने या स्टॉकवर BUY रेटिंग कायम ठेवत आपले टार्गेट 581 रुपये केले आहे. नोमुराला विश्वास आहे की कंपनीचा एक्झिक्युशन ट्रॅक रेकॉर्ड, ऑर्डर बुक खूप मजबूत दिसत आहे. कंपनी आपली क्षमता वाढवण्यावरही काम करत आहे. ज्याचा दीर्घकाळात फायदा होईल.

First published:

Tags: Investment, Money, Share market