काही दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे दर स्थिरावले; पाहा सध्याचा Gold Rate

काही दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे दर स्थिरावले; पाहा सध्याचा Gold Rate

उत्तर प्रदेशात होळीनंतर मंगळवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर, आता बुधवारी किंमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मार्च : उत्तर प्रदेशात होळीनंतर मंगळवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर, आता बुधवारी किंमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत. लखनऊ (Lucknow) सराफा बाजारातील (Lucknow Sarrafa Association) दरांनुसार, सोने आणि चांदीमध्ये मंगळवारी 500-500 रुपयांच्या घसरणीची नोंद झाली.

आता बुधवारी सोन्याचा बेस रेट 45,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 46,800 आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 45300 रुपये आहे. तसंच 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 41,200 रुपये आहे. तर चांदीचा भाव 67000 रुपयांवर आहे.

यापूर्वी शनिवारी 27 मार्च रोजी सोन्याचा बेस रेट 46,300 रुपये इतका होता, जो शुक्रवारी 200 रुपये अधिक होता. तसंच 24 कॅरेट सोन्याचा दर 47300 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेटची किंमत 45,800 आणि 18 कॅरेटची किंमत 41700 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तर चांदीचा दर 67,500 रुपयांवर होता.

कशी ठरते सोन्याची किंमत -

सोन्याची किंमत, सोन्याची शुद्धता, मेकिंग चार्ज, सोन्याचं वजन आणि जीएसटीच्या आधारे निश्चित केली जाते. एक ग्रॅम दागिन्याच्या सोन्याची किंमत, सोन्याच्या दागिन्याचं वजन, त्यावरील प्रति ग्रॅमसाठीचा मेकिंग चार्ज आणि जीएसटीच्या आधारे ठरते. एवढंच नाही, तर सोन्याचा दागिना खरेदी केल्यानंतर, याच्या किंमतीवर आणि मेकिंग चार्जवर 3 टक्के गुड्स अँड सर्विस अर्थात GST टॅक्सही लागतो.

(वाचा - मोफत LPG कनेक्शनधारकांसाठी मोठी बातमी! सरकार करणार नियमांमध्ये बदल)

लखनऊ 31 मार्च 2021 सोने-चांदी भाव -

24 कॅरेट सोने दर - 46800 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

22 कॅरेट - 45300 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

18 कॅरेट - 41200 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

चांदी - 67000 रुपये (एक किलोग्रॅम)

दागिने -

22 कॅरेट - 43300

18 कॅरेट- 39200

दरम्यान, एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉलरच्या तुलनेत रुपयात कमी आल्याने भारतीय बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. तसंच जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोना वॅक्सिनेशन अभियान वेगात सुरू असून गुंतवणुकदार गुंतवणुकीसाठी इतर पर्यायांकडे वळले आहेत. त्यामुळेच सोन्याचे दर घसरले आहेत. परंतु ही स्थिती अधिक काळ राहणार नसून 2021 मध्ये सोन्याच्या किंमती 63 हजारांपर्यंत पोहचू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सध्याच्या किंमतीत सोन्यात गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं.

Published by: Karishma Bhurke
First published: March 31, 2021, 3:41 PM IST

ताज्या बातम्या