अमेरिकेनं चीनच्या विरोधात घेतला 29 वर्षातला मोठा निर्णय, भारतावर 'असा' होणार परिणाम

अमेरिकेनं चीनच्या विरोधात घेतला 29 वर्षातला मोठा निर्णय, भारतावर 'असा' होणार परिणाम

America, China, Trade War - अमेरिका-चीन या महाशक्तींमधलं व्यापार युद्ध वाढलंय. त्याचा परिणाम भारतावर होतोय

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट : जगातल्या सर्वात मोठ्या आर्थिक महाशक्तींमधलं ट्रेड वाॅर अजून वाढलंय. अमेरिकेनं 1990 नंतर मोठा निर्णय घेत चीनच्या चलनाला ब्लॅकलिस्ट ठरवलंय. अमेरिकेनं म्हटलंय, चीननं आपलं चलन युआन चुकीच्या पद्धतीनं वापरतोय. चीननं आपल्या चलनाची किंमत कमी केलीय. आपलं उत्पादन बाजारात विकण्यासाठी त्याची किंमत कमी केलीय.त्यामुळे चीनची उत्पादनं आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त झालीयत. तज्ज्ञांच्या मते यामुळे जगभरच्या चलनाच्या बाजारावर याचा परिणाम झालाय. भारतीय रुपयाची एका दिवसात 6 वर्षांतली सर्वात जास्त घसरण झाली. जगभरातले शेअर बाजारही कोसळले.

चीननं काय केलं?

चीनचं चलन युआनमध्ये एका दशकामधली सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी ( 6 ऑगस्ट ) सुरुवातीच्या कारभारात युआन अमेरिकन चलनाच्या तुलनेत कमी होऊन 7 युआन प्रति डाॅलर खाली आलंय. ऑगस्ट 2010नंतर हा सर्वात खालचा स्तर आहे.

SBI नं ग्राहकांना केलं सावध, तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी 'हे' करायलाच हवं

चीनचं चलन युआन कसं काम करतं?

एक गोष्ट समजून घ्या की युआन जगातल्या इतर चलनाप्रमाणे नाही. चीनची केंद्रीय बँक पिपल्स बँक ऑफ चायना रोज चलन युआनची किंमत ठरवते.

बँक एका मिडपाॅइंटद्वारे या दरावर नियंत्रण ठेवते. म्हणून बाजार वरखाली जाऊ शकतो.

चीनला बाजाराप्रमाणे दर ठरवायचा असतो. आता युआन कमी झाल्यानं चीनची निर्यात स्वस्त होणार.

लागोपाठ 6व्या दिवशी पेट्रोलच्या दरात घट, जाणून घ्या तुमच्या शहरातले भाव

कॅपिटल सिंडिकेटचे मॅनेजिंग पार्टनर सुब्रमण्यम पशुपती यांनी सांगितलं की, चिनी चलनावर येणाऱ्या दिवसांत दबाव राहील. चीनच्या पिपल्स बँक ऑफ चायनानं अमेरिकेचा टॅरिफ वाढल्यानं हा निर्णय घेतलाय. यामुळे भारतासह जगभरातल्या चलनामध्ये घट होणार.

भारतावर परिणाम

सुब्रमण्यम पशुपती यांनी सांगितलं की अमेरिकेकडून वाढत जाणाऱ्या ट्रेड वाॅरविरोधात चीन हे पाऊल उचलू शकतो. त्यामुळे भारतीय रुपया कमजोर होणार. अर्थातच, भारतीय अर्थव्यवस्थेला झटका लागणार. कच्चं तेल महाग होणार. यामुळे पेट्रोल-डिझेलही महाग होण्याची शक्यता आहे.

ITR भरताना चूक केलीत तर ती 'अशी' सुधारा

सर्वसामान्यांवर होईल परिणाम

1. भारत जवळजवळ 80 टक्के पेट्रोलियम उत्पादनं आयात करतं

2. रुपयाची घसरण झाल्यानं पेट्रोलियम उत्पादनांची आयात महाग होणार

3. तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या घरगुती किमती वाढवतील

4. डिझेलचा वाढल्यानं महागाई वाढेल

5. भारत मोठ्या प्रमाणावर खाद्य तेल आणि डाळी आयात करतं

6. रुपया कमजोर झाल्यानं घरगुती बाजारात खाद्य तेल आणि डाळींच्या किमती वाढू शकतात

एक अमेरिकन डाॅलरची किंमत वाढल्यावर - पूर्ण बजेटच्या आधी केलेल्या सर्वेक्षणात सांगितलं होतं की रुपया एक डाॅलर कमजोर झाला तर तेल कंपन्यांवर 8 हजार कोटी रुपये ओझं पडतं. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवाव्या लागतात. पेट्रोलियम प्राॅडक्टच्या किंमतीत 10 टक्के वाढ झाली तर महागाई 0.8 टक्के वाढते. याचा परिणाम खाणं-पिणं आणि प्रवासावर पडतो.

VIDEO: तो एक क्षण आणि थोडक्यात बचावले मुख्यमंत्री!

Published by: Sonali Deshpande
First published: August 6, 2019, 1:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading