Home /News /money /

रुपया गडगडल्याने महागाईत आणखी भर, या गोष्टींना बसणार फटका

रुपया गडगडल्याने महागाईत आणखी भर, या गोष्टींना बसणार फटका

अमेरिका आणि इराणमधल्या वाढत्या तणावामुळे रुपया चांगलाच घसरलाय. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत 71.80 वर गेलीय.

    मुंबई, 3 जानेवारी : अमेरिका आणि इराणमधल्या वाढत्या तणावामुळे रुपया चांगलाच घसरलाय. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत 71.80 वर गेलीय. याचा अर्थ एका डॉलरसाठी आपल्याला 71 रुपये 80 पैसे मोजावे लागतील. तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे जगभरातल्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातले पैसे काढून सोन्यामध्ये गुंतवायला सुरुवात केलीय. त्यामुळे रुपया कमजोर झालाय. यामुळे आता आयात महागलीय. पेट्रोल - डिझेलसह सगळ्याच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोल - डिझेल का महागलं? भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के पेट्रोलियम वस्तूंची आयात करतो. रुपयाची घसरण झाल्यामुळे पेट्रोलियम उत्पादनांची आयात महागणार आहे. महागाई वाढली डिझेलचे भाव वाढल्यामुळे मालाची वाहतूक महागणार आहे. त्यामुळे महागाई वाढणार आहे. भारत मोठ्या प्रमाणात खाद्य तेल आणि डाळींची आयात करतो. रुपया कमजोर झाल्यामुळे डाळींच्या किंमती वाढू शकतात. (हेही वाचा : अमेरिकेचा हवाई हल्ला, थेट तुमच्या खिशावर होणार हे 6 परिणाम) परदेशातलं शिक्षण आणि फिरणं महाग रुपया गडगडल्याने परदेशातलं शिक्षण आणि पर्यटन महाग होणार आहे. भारतीय विद्यार्थ्यांवर याचा जास्त परिणाम होईल. याशिवाय परदेशात फिरायला जाणाऱ्या भारतीयांनाही याचा फटका बसू शकतो. यांना होणार फायदा रुपया कमजोर झाल्यामुळे भारतातल्या आयटी कंपन्यांसाठी चांगली बातमी आहे. यामुळे त्यांच्या कमाईत वाढ होईल. निर्यातदारांना याचा फायदा होईल तर आयातीला मात्र फटका बसेल. (हेही वाचा : यावर्षी श्रीमंत बनायचंय? या 7 गोष्टी केल्यात तर राहाल टेन्शन फ्री) ================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Money, Rupees

    पुढील बातम्या