मराठी बातम्या /बातम्या /मनी /WhatsApp वरून ओपन करता येणार डीमॅट अकाउंट; करता येणार आयपीओसाठी अर्ज

WhatsApp वरून ओपन करता येणार डीमॅट अकाउंट; करता येणार आयपीओसाठी अर्ज

सर्वात आधी मोबाइल, लॅपटॉप किंवा कॉप्यूटरवर WhatsApp ओपन करा.

सर्वात आधी मोबाइल, लॅपटॉप किंवा कॉप्यूटरवर WhatsApp ओपन करा.

सेवेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदाराला अपस्टॉक्समध्ये नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. ते आयपीओसाठी व्हॉट्सअॅप विंडो चॅटद्वारे (WhatsApp chat window) अर्ज करू शकतात.

    मुंबई, 4 डिसेंबर : आता तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे ( WhatsApp) डीमॅट अकाउंटही उघडू शकता. तुम्ही अगोदरच डीमॅट अकाउंट (Demat Account) उघडलं असेल, तर तुम्ही आयपीओमध्ये (IPO) गुंतवणूक करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करू शकता. अपस्टॉक्स या इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने (Upstox) ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. व्हॉट्सअॅपद्वारे आयपीओच्या अॅप्लिकेशनसाठी अपस्टॉक्स एंड- टू- एंड सपोर्ट (End to End Suppot) उपलब्ध करून देत आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदाराला अपस्टॉक्समध्ये नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. ते आयपीओसाठी व्हॉट्सअॅप विंडो चॅटद्वारे (WhatsApp chat window) अर्ज करू शकतात.

    5 पट वाढीचं उद्दिष्ट

    अपस्टॉक्सचे सह-संस्थापक श्रीनी विश्वनाथ (Srini Vishwanath) यांनी सांगितलं, की 'या एकत्रीकरणासह आयपीओ अॅप्लिकेशनमध्ये 5 पट वाढ करण्याचं उद्दिष्ट अपस्टॉक्सने ठेवलं आहे. 2022च्या आर्थिक वर्षाअखेरीस एक कोटी ग्राहकांचा आकडा पार करण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. हा आकडा सध्याच्या 70 लाख ग्राहकांपेक्षा खूपच जास्त आहे.'

    ATM Cash withdrawal: 'या' तारखेपासून ATMमधून पैसे काढणं होणार महाग

    व्हॉट्सअॅप ते अपस्टॉक्स असा असेल व्यवहार

    - ग्राहकांनी त्यांच्या मोबाइल फोनमध्ये अपस्टॉक्सचा व्हेरिफाइड व्हॉट्सअॅप प्रोफाइल नंबर सेव्ह करावा.

    - व्हॉट्सअॅपवर या नंबरवर 'Hi' पाठवावा.

    - अपस्टॉक्सचा व्हेरिफाइड व्हॉट्सअॅप प्रोफाइल क्रमांक 9321261098 असा आहे.

    - व्हॉट्सअॅप चॅट बॉट 'Uva' वापरून 'आयपीओ अॅप्लिकेशन'वर क्लिक करा.

    - नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि वन टाइम पासवर्ड ( OTP) द्या.

    -'Apply for IPO'वर क्लिक करा.

    - तुम्हाला सबस्क्राइब करण्याची इच्छा असलेला आयपीओ निवडा.

    असं उघडा व्हॉट्सअॅपवरून अपस्टॉक्सवर डीमॅट अकाउंट

    - व्हॉट्सअॅपमधल्या चॅट विंडोचा वापर करून 'Open an Account'वर क्लिक करा.

    - मोबाइल नंबर टाका आणि ओटीपीद्वारे पडताळणी करा.

    - ई-मेल टाका आणि त्याचीही ओटीपीद्वारे पडताळणी करा.

    - जन्मतारीख टाका.

    - यानंतर तुमचा पॅन तपशील द्या.

    - आता बॉट तुम्हाला काही सामान्य औपचारिकतेसाठी अपस्टॉक्स पृष्ठावर पुनर्निर्देशित करेल. यासह ही प्रक्रिया पूर्ण होईल.

    (टीप : कोणतंही डॉक्युमेंट व्हॉट्सअॅपवर अपलोड करायचे नाही. तसेच कोणतेही डॉक्युमेंट चॅटवर अटॅचमेंट म्हणून पाठवायचं नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

    Gold Price: लग्नसराईत सोनं खरेदी करताय? जाणून घ्या काय आहे गोल्ड रेट

    मागील काही वर्षांपासून गुंतवणुकीच्या प्रक्रियेत आमूलाग्र बदल झाला आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे गोष्टी प्रचंड गतिमान झाल्या आहेत. आज शेअर बाजारातही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाउंट उघडणं अत्यावश्यक असतं. आता त्यासाठी व्हॉट्सअॅपचादेखील वापर करता येऊ शकतो.

    First published:
    top videos

      Tags: Share market, Whatsaap