मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Googleनं UPI पेमेंट केलं आणखी सोपं, काय आहे प्रोसेस, वाचा सविस्तर

Googleनं UPI पेमेंट केलं आणखी सोपं, काय आहे प्रोसेस, वाचा सविस्तर

Googleनं UPI पेमेंट केलं आणखी सोपं, काय आहे प्रोसेस, वाचा सविस्तर

Googleनं UPI पेमेंट केलं आणखी सोपं, काय आहे प्रोसेस, वाचा सविस्तर

UPI Payment: गुगलनं प्ले स्टोरसाठी ऑटोपेची सुविधा देखील सुरू केली आहे. कंपनीनं मंगळवारी याबाबत माहिती दिली. काही वर्षांपूर्वी NPCI नं UPI 2.0 अंतर्गत UPI AutoPay ची सुविधा सुरू केली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 15 नोव्हेंबर: तुम्ही Google UPI द्वारे कोणत्याही सबस्क्रिप्शनसाठी पैसे भरल्यास तुम्ही ते पेमेंट आपोआप करू शकाल. याचा अर्थ आता तुमचं नियमित सबस्क्रिप्शन आपोआप पेमेंट केलं जाईल. यासाठी प्रत्येक वेळी तुम्हाला सबस्क्रिप्शनसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. ही सुविधा फक्त गुगल प्ले स्टोअरसाठी असेल.

खरं तर, 2020 मध्येच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिकरिंग पेमेंट्सबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. या मार्गदर्शक तत्त्वात, सबस्क्रिप्शन बेस्ड पेमेंट मॉडेलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. असे मानले जाते की UPI ऑटोपे हा एक विशेष पर्याय म्हणून उदयास येऊ शकतो.

UPI पेमेंट कसं कार्य करते?

NPCI ने UPI 2.0 अंतर्गत UPI ऑटोपे लाँच केलं. या अंतर्गत युजर्स कोणत्याही UPI ऍप्लिकेशनद्वारे आवर्ती पेमेंट करू शकतात. यामुळे वापरकर्त्यांना सबस्क्रिप्शनसाठी पैसे देणं सोपं होतं. कोणत्याही गोष्टीसाठी सबस्क्रिप्शन प्लॅन निवडल्यानंतर युजर्सना कार्टमधील पसंतीच्या पेमेंट पद्धतीवर टॅप करावं लागेल. येथे वापरकर्त्यांना Pay with UPIवर टॅप करावं लागेल.

हेही वाचा: टाटांच्या एअर इंडियाला मोठा झटका! प्रवाशांना रिफंडच्या रूपात द्यावे लागणार तब्बल 10 अब्ज रूपये

भारत, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील Google Play रिटेल आणि पेमेंट अ‍ॅक्टिव्हेशनचे प्रमुख सौरभ अग्रवाल म्हणाले की, “आम्ही नेहमी पेमेंटसाठी विविध मार्ग शोधत असतो. आता प्लॅटफॉर्मवर UPI ऑटोपे लाँच करून आम्ही सबस्क्रिप्शन-आधारित खरेदीसाठी UPI द्वारे पैसे देण्याची सुविधा देखील जोडत आहोत."

UPI ऑटोपे म्हणजे काय?

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं जुलै 2020 मध्ये UPI ऑटोपे लाँच केलं. या फीचर अंतर्गत युजर्स UPI ऍप्लिकेशनद्वारे ई-मँटेड देऊ शकतात. हे आदेश मोबाईल बिल, वीज बिल, ईएमआय, ओटीटी सबस्क्रिप्शन इत्यादी पेमेंटसाठी केले जाऊ शकतात. यासह, वापरकर्ते कोणत्याही दंड किंवा विलंब शुल्काशिवाय सदस्यता सहजपणे अदा करू शकतात. यामध्ये, वापरकर्ते मासिक, त्रैमासिक याप्रमाणे नियमित आधारावर पेमेंट पर्याय देखील निवडू शकतात आणि 1 ते 5,000 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतात. ते तुमच्या स्वतःनुसार बदलताही येते.

First published:

Tags: Google, Upi