20 रुपयात उघडा Post Office मध्ये खातं आणि मिळवा मोफत 'या' सुविधा

Post Office - पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतात. जाणून घ्या त्याबद्दल

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 06:00 PM IST

20 रुपयात उघडा Post Office मध्ये खातं आणि मिळवा मोफत 'या' सुविधा

मुंबई, 31 जुलै : पोस्ट ऑफिस म्हटलं की पूर्वी फक्त पत्र पाठवणं इतकंच असायचं. पण आता बराच बदल झालाय.पोस्ट ऑफिसमध्ये बँकेसारख्या सुविधा मिळतात. तुम्ही फक्त 20 रुपये भरून पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाउंट सुरू करू शकता. हे दर बँकेपेक्षा खूप कमी आहेत. पोस्ट ऑफिसच्या या सेव्हिंग अकाउंटमध्ये 50 रुपये कमीत कमी बॅलन्स ठेवावा लागतो. तुम्हाला इथे ATM आणि चेक बुकच्या सुविधा मिळतात. आम्ही तुम्हाला सांगतो या अकाउंटची खासीयत-

टॅक्स फ्री होतं 10 हजार रुपयापर्यंतचं व्याज

हे सेव्हिंग अकाउंट देशातल्या सर्व पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करता येतात. पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमधून मिळणारं 10 हजार रुपयांचं व्याज पूर्ण टॅक्स फ्री असतं.

'या' कर्मचाऱ्यांना मिळणार खूशखबर, 10 हजार रुपयांनी वाढणार पगार

असं उघडा पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाउंट

Loading...

पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाउंट उघडण्यासाठी एक फाॅर्म भरावा लागतो. हा फाॅर्म पोस्ट ऑफिसच्या साइटवरून हा फाॅर्म डाउनलोड करता येतो. सेव्हिंग अकाउंट उघडण्यासाठी KYC ची कारवाई पूर्ण करावी लागेल.

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची मोठी संधी, 'असा' करा अर्ज

लागणारी कागदपत्रं

आयडी प्रूफ म्हणून मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी. अॅड्रेस प्रूफ म्हणून पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, विजेचं बिल, आधार कार्ड इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत. शिवाय पासपोर्ट आकाराचे फोटोज लागतात.

चेक पेमेंट करताय? मग ही चूक करू नका, नाही तर जाल तुरुंगात

पोस्ट ऑफिसच्या या अकाउंटची खासीयत

चेकबुकसाठी 500 रुपयांत खातं उघडू शकता. त्यानंतर कमीत कमी 500 रुपयांचा बॅलन्स ठेवणं आवश्यक आहे. चेकबुक नको असेल तर 20 रुपयांमध्ये कमीत कमी 50 रुपये बॅलन्स ठेवून खातं सुरू ठेवू शकता. खातं चालू राहण्यासाठी 3 आर्थिक वर्षात कमीत कमी 1 तरी आर्थिक व्यवहार करावा लागतो.

मुंबईत बेस्ट बसला लागली आग, दुर्घटनेचा पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 05:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...