मुंबई, 02 जुलै : सर्वात कमी दर असलेली विमानकंपनी स्पाइसजेटनं घरगुती आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी मान्सून सेलची घोषणा केलीय. स्पाइसजेट मान्सून सेलमध्ये घरगुती तिकिटांची सुरुवात 888 रुपयांपासून सुरू आहे. तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांचं तिकीट 3, 499 रुपयांपासून सुरू होतं. हा सेल 2 जुलैपासून सुरू होतो आणि 6 जुलैला संपणार.
कमी पैशात प्रवास करण्याची संधी
स्पाइसजेट मान्सून सेलमध्ये 25 सप्टेंबर 2019पर्यंत प्रवास केला तर हे दर लागू आहेत. या सेलची घोषणा अशा वेळी केलीय जेव्हा विमान इंधन एटीएफच्या दरांमध्ये 5.8 टक्के मोठी कपात केलीय.
दुसऱ्या दिवशीही सोनं झालं स्वस्त, 'हा' आहे 10 ग्रॅमचा भाव
नियम आणि अटी
तुम्ही आॅनलाइन, काउंटरवर तिकीट बुकिंग करू शकता.
ही सूट फक्त एका बाजूच्या तिकिटावर आहे.
ही आॅफर अजून कुठल्या आॅफर्ससोबत तुम्ही जोडू शकत नाही. शिवाय ग्रुप बुकिंगलाही ही सवलत नाही.
नाॅर्मल कॅन्सलेशन दराबरोबर रिफंड मिळू शकतो.
देशातल्या तीन मोठ्या बँकांची ग्राहकांना खास भेट, आता वाचतील तुमचे पैसे
ही सवलत नाॅन स्टाॅप उड्डाणांसाठी आहे.
तिकीट फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह यावर आहे.
ब्लॅक आउट डेट्स लागू आहेत.
50 टक्के सवलतही मिळतेय
याशिवाय स्पाइसजेट मेगा मान्सून सेल अंतर्गत सीट, जेवण, स्पाइसमॅक्स आणि इतर गोष्टींवर 50 टक्के डिस्काउंट मिळतंय. याचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी AMEX50 प्रोमो कोड वापरावा. स्पाइसमॅक्स सीटसाठी अमेरिकन एक्स्प्रेस कार्डावर 500 रुपयांची सवलत मिळेल.
दर महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे असतील तर सुरू करा 'हा' व्यवसाय
स्पाइसजेट व्हेकेशन ऑफर
तुम्ही तिकीट मोबाइल अॅपवर बुक केलंत तर 1000 रुपये डिस्काउंटचं हाॅटेल व्हाउचर मिळेल. हे व्हाउचर ग्राहकांच्या ई मेल आयडीवर पाठवलं जाईल. 31 ऑफर 2019पर्यंत ही ऑफर लागू आहे.
VIDEO : यांच्या धाडसाला सलाम ! जीव धोक्यात घालून पुरातून आजीला काढलं बाहेर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Spicejet