SBI नंतर आता 'या' 3 बँकांनी कमी केले व्याज दर, 'इतका' द्यावा लागेल EMI

RBI, Repo rates - तुम्ही या बँकांकडून कर्ज घेऊ शकता. कारण त्यांनी त्यांचे व्याज दर कमी केलेत

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 05:26 PM IST

SBI नंतर आता 'या' 3 बँकांनी कमी केले व्याज दर, 'इतका' द्यावा लागेल EMI

मुंबई, 09 ऑगस्ट : RBI नं रेपो रेट कमी केल्यानंतर SBI नं व्याजदर कमी केलेत. त्यानंतर आता ओरिएंटल बँक ऑफ काॅमर्स ( OBC ), बँक ऑफ महाराष्ट्र आणि आयडीबीआय बँक (IDBI ) यांनी व्याजदरात (MCLR)मध्ये 0.05 टक्के ते 0.15 टक्क्यापर्यंत कपात केलीय. ओरिएंटल बँक ऑफ काॅमर्सनं विविध अवधींच्या कर्जावर एमसीएलआरमध्ये 0.10 टक्क्यापर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतलाय.

याशिवाय एक दिवसापासून ते सहा महिन्यापर्यंत वेगवेगळ्या अवधीसाठी एमसीएलआरमध्ये 0.05 टक्क्यांपासून 0.10 टक्क्यांची कमी आलीय. नवे दर 10 ऑगस्टपासून लागू होतील.

घर खरेदी करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, बिल्डर नाही फसवू शकणार

आयडीबीआय बँकेनं एक वर्षाच्या कर्जावर एमसीएलआर 0.10 टक्के कमी करून 8.95 टक्के केलाय.

तीन महिन्यांपासून तीन वर्षापर्यंतच्या व्याजदरांवर 0.05 पासून 0.15 टक्के कपात केलीय. एक दिवस आणि एक महिन्याच्या काळाच्या कर्जाचे दर बदलले नाहीत. नवे दर 12 ऑगस्टपासून लागू होतील.

Loading...

पेट्रोलच्या दरातली घसरण सुरूच, 'हे' आहेत आजचे दर

RBI नं रेपो रेटमध्ये कपात करण्याची घोषणा केलीय.रेपो रेट 0.35 टक्के कमी होऊन 5.40 टक्क्यांवर आलाय. RBIनं लागोपाठ चौथ्यांदा व्याजदरात कपात केलीय. गेल्या तीन बैठकीत MPC रेपो रेटमध्ये कपात केलीय. आरबीआयनं आर्थिक वर्ष 2019साठी जीडीपी ग्रोथ लक्ष्यही कमी केलंय.

व्याजदर कमी करणं म्हणजे बँका जेव्हा RBI कडून फंड घेतील तेव्हा त्यांना नव्या दरानं फंड मिळेल. स्वस्त दरात बँकांना मिळणाऱ्या फंडाचा फायदा बँक ग्राहकांना देते. यामुळे गृहकर्ज स्वस्त होतात आणि ईएमआयही कमी होतो. म्हणूनच रेपो रेट कमी झाल्यानं कर्ज घेणं स्वस्त होतं. पर्यायानं ईएमआय कमी होते.

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 113 महिन्यात दुप्पट होतील तुमचे पैसे

RBI नं महागाईत थोडी नरमी बघून पाॅलिसी रेट्समध्ये 0.35 टक्के कपात केलीय. त्यानंतर रेपो रेट 5.40 टक्के झाला. असं झाल्यामुळे सर्वसामान्यांसाठी बँकेकडून कर्ज घेणं स्वस्त होईल आणि EMI कमी होईल.

बुडालेली घरं आणि डोळ्यात पाणी, सांगलीच्या हरी'पूर'चा भीषण VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rbi
First Published: Aug 9, 2019 05:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...