फक्त 10 रुपयांमध्ये उघडा अकाउंट, बचत खात्यात मिळेल जास्त व्याज

फक्त 10 रुपयांमध्ये उघडा अकाउंट, बचत खात्यात मिळेल जास्त व्याज

तुम्ही आरडीमध्ये दर महिन्याला 2 हजार रुपये जमा करत असाल, तर तुमची एकूण गुंतवणूक 1.20 लाख रुपये होईल.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल : बँकेत रिकरिंग डिपाॅझिट अकाउंट उघडता येतं हे तर सगळ्यांना ठाऊक आहे. पण पोस्ट आॅफिसमध्ये अकाउंट उघडून तुम्ही तुमच्या बचतीवर व्याज घेऊ शकता. पोस्ट आॅफिसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही स्किम फायदेशीर समजली जाते.  कारण पोस्ट आॅफिसमध्ये गुंतवणूक केलेल्या पैशाच्या सुरक्षिततेची हमी सरकार घेतं. या योजनेत तुम्ही कितीही पैसे गुंतवू शकता. अगदी 10 रुपयांपासून तुम्ही गुंतवणूक करू शकता. जाणून घ्या याबद्दल-

बऱ्याच लोकांची महिन्याची बचत कमी असते ते पैसे बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवतात. त्यांना वाटतं यामुळे त्यांचे पैसे वाढतात. बँक सेव्हिंग अकाउंटमध्ये 3.5 ते 4 टक्के व्याज मिळतं. महागाईचा विचार करता ते खूप कमी आहे. अशात दुसरा मार्ग अवलंबला जातो, तो म्हणजे बँक एफडी. पण त्यात पैसे बऱ्याच वर्षाकरता लाॅक होतात. म्हणूनच पोस्ट आॅफिसमध्ये आरडी करणं हा उत्तम उपाय आहे. पोस्ट आॅफिसात 1 वर्ष ते 5 वर्ष आरडी स्किमवर 6.9 टक्के व्याज मिळतं.

सेव्हिंग अकाऊंट - बँक किंवा पोस्ट आॅफिसच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये दर महिन्याला 2 हजार रुपये भरलेत, तर 5 वर्षांनी ते 1.20 लाख रुपये होतील. 4 टक्के व्याजाच्या हिशेबानं 5 वर्षांत तुमचे पैसे 1,35,191 रुपये होतील. तुम्हाला 15191 रुपये व्याज मिळेल.

RD - तुम्ही आरडीमध्ये दर महिन्याला 2 हजार रुपये जमा करत असाल, तर तुमची एकूण गुंतवणूक 1.20 लाख रुपये होईल. पोस्ट आॅफिस आरडीमध्ये क्वार्टली कम्पाऊंडवर दर वर्षी 6.9 टक्के व्याज मिळू शकतं. याप्रमाणे तुमचे पैसे 5 वर्षांत जवळजवळ 1,44,305 रुपये होतील. म्हणजे तुम्हाला 24305 रुपये जास्त मिळतील.

आरडी अकाउंट पोस्ट आॅफिस, बँकेत जाऊन आॅनलाइनही उघडू शकता. तुम्ही मोबाईल अॅपवरूनही आरडी उघडू शकता. तुम्ही पोस्ट आॅफिसमध्ये आरडी सुरू करत असाल तर कॅश आणि चेक देऊन उघडू शकता. तुमचं अकाऊंट एका पोस्ट आॅफिसातून दुसऱ्या पोस्ट आॅफिसात ट्रान्सफर होऊ शकतं. दोन प्रौढ व्यक्तींच्या नावे जाॅइंट अकाऊंट तुम्ही उघडू शकता. आरडी अकाऊंट उघडण्याआधी तुम्ही कुठून किती व्याज मिळतंय हे तपासून पाहा. आरडीवर 10 हजारापेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर त्यावर कर लागू होऊ शकतो.

आरडीचे फायदे

रिकरिंग डिपाॅझिट गुंतवणुकीच्या सेव्हिंगवर अवलंबून असतं. तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवू शकता.

आरडीमध्ये सुरुवातीपासून शेवटापर्यंत व्याजदर समान राहतो. डिपाॅझिटवर व्याजदर सुरुवातीपासून लाॅकइन होतो. म्हणजे व्याजदर कमी झाला तरी आरडीवर फायदा होतो.

रिकरिंग डिपाॅझिटवर सेव्हिंग मॅनेजमेंट सोपं जातं. पुन्हा पुन्हा फिक्स्ड डिपाॅझिटच्या त्रासातून मुक्ती मिळते.

जास्तीत जास्त म्हणजे 10 वर्षांसाठी आरडी ठेवता येतं.

VIDEO: मतदानानंतर सुजय विखे यांची प्रतिक्रिया

First published: April 23, 2019, 12:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading