देशातल्या तीन मोठ्या बँकांची ग्राहकांना खास भेट, आता वाचतील तुमचे पैसे

pnb, sbi, icici - बँकेनं MCLR मध्ये वाढ केल्यानं त्याचा परिणाम ग्राहकांवर पडतोय. एप्रिल 2016नंतर ज्यांनी कर्ज घेतलंय त्यांना फायदा आहे

News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2019 07:18 PM IST

देशातल्या तीन मोठ्या बँकांची ग्राहकांना खास भेट, आता वाचतील तुमचे पैसे

मुंबई, 02 जुलै : देशाची मोठी सरकारी बँक पीएनबीनंतर आता सेंट्रल बँक आॅफ इंडियानं आपल्या ग्राहकांसाठी कर्जावर कमी ईएमआयची खास भेट दिलीय. बँकेनं एमसीएलआर कमी केलंय. तुम्ही गृहकर्ज, आॅटो आणि पर्सनल लोन घ्यायचा विचार करत असाल तर एक खुशखबर आहे. तुम्ही या बँकांचे ग्राहक असाल तर तुमचा फायदा नक्की होईल. बँकेनं MCLR मध्ये वाढ केल्यानं त्याचा परिणाम ग्राहकांवर पडतोय. एप्रिल 2016नंतर ज्यांनी कर्ज घेतलंय त्यांना फायदा आहे. एप्रिल 2016च्या आधी रिझर्व्ह बँकेद्वारा कर्ज देण्यासाठी कमीत कमी रेट बेस रेट होता. म्हणजे बँक याहून कमी दरावर ग्राहकांना कर्ज देऊ शकत नव्हती. 1 एप्रिल 2016पासून बँकिंग सिस्टिममध्ये MCLR लागू झाला. म्हणजे आता MCLRच्या आधारे कर्ज दिलं जाईल.

जाणून घेऊया तुमचं ईएमआय किती कमी होईल?

PNB - पंजाब नॅशनल बँकेनं RBIद्वारा रेपो रेट कमी केल्यानं पहिल्यांदा आपले व्याज दर कमी केले. वेगवेगळ्या कार्यकाळात  MCLRमध्ये 0.05 कपात केलीय, तर 1 वर्षासाठी MCLR 8.40 टक्के झालंय.

तीनही दलांमध्ये 78,291 पदं रिकामी, लवकरच भरती सुरू

बापरे, 1000 लोकांना कामावरून काढून टाकणार ही टेलिकाॅम कंपनी

Loading...

सेंट्रल बँक आॅफ इंडिया - SBI नं MCLR 8.50 टक्के झालीय.

ICICI बँक - कुठल्याही अवधीच्या कर्जावर MCLR कमी होऊन 8.65 टक्के झालंय.

10 वर्ष बँकेत पडून राहिलेल्या पैशांचं काय होतं?

बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट ठेवली तर नुकसान होऊ शकतं. सेव्हिंग अकाउंटमध्ये कमीत कमी रक्कम ठेवण्याचे बँकेचे नियम असतात. असं नाही केलं तर बँक दंड वसूल करते. अनेक बँकांमध्ये कमीत कमी बॅलन्स 10 हजार रुपये असतो. अशा वेळी तुमच्याकडे दोनपेक्षा जास्त अकाउंट असेल तर तुमची चिंता वाढू शकते. कारण सर्वसामान्यांना सेव्हिंग अकाउंटमध्ये 20 हजार रुपये जमा करणं कठीण होऊन जातं.

VIDEO : कार चालकांनो पाहा 'हा' व्हिडीओ, सावध राहा तुमचाही जाऊ शकतो जीव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pnb bank
First Published: Jul 2, 2019 07:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...